Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

KavI bI

Hitguj » Language and Literature » पद्य » KavI bI « Previous Next »

Girishmusic
Friday, December 01, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाइ पाण्यावर काय म्हणुनि आल्या
का गं गंगा यमुनाहि या मिळाल्या
उभय पितरान्च्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला...

...मला ही एकच कविता येते कवी बी यान्ची,
आणखी कोणी पोस्ट करेल काय?


Robeenhood
Friday, December 01, 2006 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही कविता बी कवींची नाही असे मला वाटते..
बहुधा यशवन्तांची..

चू. भू. दे. घे.


Mdhananjay
Saturday, December 02, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही कविता बी यांचीच आहे. आचार्य अत्रे संपादित फुलांची ओंजळ या काव्यसंग्रहात ही कविता आहे.

Girishmusic
Tuesday, December 19, 2006 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याच कवितेची काही कडवी क्रमश्: :-

उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात
नंदनातिल हलविती वल्लरीला
कोण माझ्या बोलले छबेलीला

शुभ्र नक्षत्रे चन्द्र चान्दण्याची
दूड रचलेली चिमुकल्या मण्यान्ची
गडे भूईवर पडे गडबडून
काय आला उत्पात हा घडून

विभा विमला आपटे-प्रधानान्च्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनान्च्या
गौर चैत्रीची तशा सजुन येती
रेशमाची पोलकी छिटे लेती

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
अहा आली ही पहा भिकारीण...Girishmusic
Saturday, March 10, 2007 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुली असती शाळेतल्या चटोर
एकमेकीना बोलती कठोर
काय बाई चित्तात धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्याचे

रत्न सोने मातीत जन्म घेते
राजराजेश्वर निज शिरी धरीते
कमळ होते पन्कात, तरी येते
वसन्तश्री सत्कार करायाते

पन्क सम्पर्के कमळ का भिकारी?
धूलिसन्गे रत्न का भिकारी?
सूत्रसन्गे सुमहार का भिकारी?
कशी तू ही मग मजमुळे भिकारी?Girishmusic
Monday, June 25, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाल सरिता वधु वल्लरीसमान
नशीबाची चढतीच तव कमान
नारि रत्ने नरवीर असामान्य
याच येती उदयास मुलान्तून

भेट गंगा यमुनास होय जेथे
सरस्वतिही असणार सहज तेथे
रूप सद्गुण संगमी तुझ्या तैसे
भाग्य निश्चित असणार ते अपेसे


Add Your Message Here
Post:
Username: Posting Information:
This is a private posting area. Only registered users and moderators may post messages here.
Password:
Options: Automatically activate URLs in message
Action:

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions