Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 01, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » म्हणी » Archive through November 01, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Monday, October 30, 2006 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> पहिले पाढे ५५ ह्या म्हणीचा अर्थ
पुन्हा नव्याने पहिल्यापासुन सुरुवात करायला लागणे अशा अर्थाने ही वापरतात जेव्हा पहिला प्रयत्न ओम फस्स झालेला किन्वा फसलेला असतो!
आधिच लक्षान न ठेवण, म्हन्जेच पुढच पाठ मागच सपाट अशा व्यक्तीला पुन्हा पहिल्यापासुन पाढे पाठ करायला सुरुवात करावी लागते तर अशा बुद्दु मठ्ठ लोकान्च्या सन्दर्भात देखिल ही म्हण वापरतात!


Bee
Monday, October 30, 2006 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो का.. पण इथे ५५ चा काय संदर्भ असावा?

बर वर काळ सोकावतोचा अर्थ येत असेल तर तोही सांगावा..

धन्यवाद ऐलटी..


Limbutimbu
Monday, October 30, 2006 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> पण इथे ५५ चा काय संदर्भ असावा?
बहुतेक पाकिस्तानला दिलेल्या पन्चावन्न कोटीन्शी असावा! DDD
किन्वा प प चा पुनरुच्चारास सोप जाव म्हणुन ५५ असेल
किन्वा एक ते तीसचे पाढे आणि पावकी निमकी पाऊणकी सवायकी दीडकी अडिचकी वगैरे पाढे मिळुन ५५ होत असावेत! :-)


Limbutimbu
Monday, October 30, 2006 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> म्हातारी मेल्यचं दु : ख्ख नाही पण काळ सोकावतो
एखादी घटना घडली तरी त्या घटने ऐवजी त्या घटनेमागच्या कारणान्ची गम्भिर दखल घेण्यासाठी ही म्हण वापरतात!

Zakki
Monday, October 30, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते पहिले पाढे ५५ म्हणजे बरेचदा सुधारण्याचा प्रयत्न केल्यावर गोष्ट थोड्या वेळापुरती सुधारते पण नंतर पुन: पूर्वव्रत अनिष्ट मार्गाला लागते.
उदा. :
अरे मुलांनो भांडू नका, गप बसा म्हंटल्यावर पाच मिनिटे गप बसतात, पुन: भांडणे चालू.
कामाला वेळेवर येत जा, खाडे करू नको असे दटावल्यावर आठवडाभर मोलकरीण वेळच्या वेळी येते, खाडे करत नाही. पण नंतर पुन: पहिले पाढे ५५
झक्कींना अनेकदा सांगीतले, वयोमानाप्रमाणे वागा, उगाच लहानांत घुसून त्यांच्यासारखा बाष्कळपणा करू नका. की ते दोन दिवस ऐकतात नि पुन: पहिले पाढे ५५.

तसेच म्हातारी मेल्याचे दु:ख्ख नाही पण काळ सोकावतो, याचे उदाहरण म्हणजे, मोड न देता रिक्षेवाला तसाच निघून जाऊ दिला, तर आज एक दोन रुपये गेल्याचे दु:ख नाही पण उद्यापासून दररोजच तो आज एक दोन, उद्या पाच दहा असे करत कधीच मोड देणार नाही.



Zakki
Monday, October 30, 2006 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक उदाहरण:

एका अतिरेक्याला पकडून, त्यावर गुन्हा शाबित करून सुद्धा त्याला शिक्षा न देता सोडले, तर ती व्यक्ति सुटल्याचे दु:ख नाही पण अश्या वर्तणुकीने इतर अतिरेकी सोकावतील हे महत्वाचे.


Bee
Tuesday, October 31, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LT & ZAKKI THANKS माहितीबद्दल!

Nalini
Tuesday, October 31, 2006 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.

कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद मागावी कुणाकडे.

सोनाराने टोचले कान.

कुत्र्याचे शेपुट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच.

कडू कारले
तुपात तळले
साखरेत घोळले
तरी कडू ते कडूच.

रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.

भाकरी पहावी काठात आणि मुलगी पहावी ओठात.

लेकीचं लेकरु आणि कावळ्याचं पिल्लु सारखच.

लोक गाढवावरही बसु देत नाहीत आणि पायीही चालु देत नाहीत.

आई सरो अन मावशी उरो.

घरच्याच चिंचेने दात आंबलेत त्यात व्याह्याने धाडलाय वानवळा.

ज्याच कराव बरं तेच घालतं डोक्यात खोरं.

उंटावरून शेळ्या हाकने.

एक हिंदी म्हण..
बोलु ना बोलु
बोलु तो माँ मार खाये
ना बोलु तो बाप कुत्ता खाये|





Nalini
Wednesday, November 01, 2006 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उथळ पाण्याला खळखळाट फार.

नाकापेक्षा मोती जड.

आडातून निघुन फुपाट्यात पडणे.

कानामागुन आली आणि तिखट झाली.

कोल्हा काकाडीला राजी.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट.

नाचता येईना अंगण वाकडे.

आडात नाहीतर पोहर्‍यात कुठुन येणार?

अती तेथे माती.

अती शहाणा त्याचा बैल रिकामा.

आयत्या बिळावर नागोबा.

दुसर्‍याच्या टाळूवरचे लोणी खाणे.


Lopamudraa
Wednesday, November 01, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोलु ना बोलु
बोलु तो माँ मार खाये
ना बोलु तो बाप कुत्ता खाये|

या ठिकाणी.. मला वाटते काट खाये अस असाव..
आणी अशीच एक मराठी म्हण आहे.. आई जेउ घालीना बाप भिक मगु देइना..


Nalini
Wednesday, November 01, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या वरच्या म्हणीचा सारांश असा की नवरा एक बोकड आणुन देतो आणि मी परत येईस्तोवर करुन ठेवण्याची आज्ञा करतो. जरा कामाच्या नादात बायको त्याला बांधुन ठेवायचीच विसरते आणि तो पळून जातो. हे तिच्या लक्षात येते तेव्हा खूप शोधाशोध करुन ही तिला तो बोकड सापडत नाही. आता प्रश्न की नवर्‍याला काय सांगायचे? तो काहिच ऐकुन घेणार नाही. आपल्याला जिवे मारु शकतो. मग तिला एक कुत्र्याचे पिल्लु दिसते आणि ती त्याचेच जेवण बनवते. हे सगळे मुलाने पाहिलेले असते पण बिचार्‍याची स्थिती अशी असते की सांगू ही शकत नाही आणि गप्प ही बसवत नाही.
बोलु ना बोलु
बोलु तो माँ मार खाये
ना बोलु तो बाप कुत्ता खाये|


Dineshvs
Wednesday, November 01, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय मस्त म्हण आहे हि.

Rahul_1982
Wednesday, November 01, 2006 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

very good नलिनि
तुला ठाऊक असलेल्या, काही म्हणींच सारांश
post करशिल का? Please..
..thanks in advance

Sayuri
Wednesday, November 01, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'सो चूहें खाकर बिल्लि हाज को चली' ला समानार्थी मराठी म्हण/वाक्प्रचार आहे का?

Sashal
Wednesday, November 01, 2006 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही म्हण आहे की नाहि माहित नाहि पण अर्थ काहिसा तसाच आहे .. 'करून सवरून वर नमानिराळा' ..

Shyamli
Wednesday, November 01, 2006 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही अशि आहे ती म्हण

"करुन करुन भागले आणि देवपुजेला लागले"


Sayuri
Wednesday, November 01, 2006 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल आणि शामली, बरोबर ह्याच त्या. :-) Thanks.
मला काही केल्या आठवतच नव्ह्त्या.

Raina
Thursday, November 02, 2006 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी- म्हणी काय छान आहेत. अजून टाक ना pls .

Bee
Thursday, November 02, 2006 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेकीचं लेकरु आणि कावळ्याचं पिल्लु सारखच

नलू ताई, ह्या म्हणीचा अर्थ मी शब्दशः घेतला जो नक्कीच आवडला नाही. मला मथितार्थ सांगतेस का?

Psg
Thursday, November 02, 2006 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरच्याच चिंचेने दात आंबलेत त्यात व्याह्याने धाडलाय वानवळा.
नलिनी, 'वानवळा' म्हणजे काय?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators