Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 30, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » म्हणी » Archive through October 30, 2006 « Previous Next »

Robeenhood
Thursday, April 06, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय ते वाक्प्रचारच आहे. पण ही खाजवून खरूज काढण्याचे कारण नाही कळाले
हितगुजवरील विद्वतसभेत असा वाद झाल्याचे दिसत नाही....

दुसरे असे तुझ्या त्या गाण्याचे उत्तर लूकिन्ग फ़ाॅरच्या बी बी वर मी दिले आहे ते पाहिले का?


Mrinmayee
Thursday, April 06, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thank you thank you Robeenhood ! पण मला काही ते दिसलं नाही. तसंही मला माझ्या posting चा track ठेवताना गोंधळ होतो. नक्की कुठे ते सांगाल का? moderator, please हे इथून उडवू नका, जरी विषयाशी संमबंधित नसलं तरी. thank you !

Sanghamitra
Tuesday, April 11, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधे केबलवर एक नाटक लागलं होतं. नाटक सामान्य (खरं तर सुमारच) होतं पण त्यातली हिरवीण सारखी धडाधडा म्हणी वापरत होती.
देणं न घेणं आणि कंदिल लावून येणं (म्हणजे काय म्हणे?)
स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं बघायचं वाकून
वगैरे वगैरे. अजून पण होत्या, आठवल्या तर लिहीन.


Bee
Tuesday, April 11, 2006 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मे, खेडूत बाया माणसे म्हणींचा वापर शहरी लोकांपेक्षा अधिक चांगला करतात. माझ्या शेजारी पाटलीन काकू, दुर्गा ताई राहायच्या ज्या खेड्यात वाढल्यात. म्हणींचा वापर म्हणजे जवळपास वाक्यागणिक होत असे. त्यांच्याकडे म्हणींचा खजिना असे आणि अगदी चपखल वापरत. आपल्याला दहा वाक्य बोलावी लागत ती एकाच म्हणीत बसत.

Radha_t
Monday, June 05, 2006 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चार आण्याचे मासे अन १२ आण्याचा मसाला
एक मासा अन खंडीभर रस्सा
कोंबड झाकून ठेवल तरी फटफटायच रहात नाही


Ameyadeshpande
Friday, June 23, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मित्र आणि मी बोलत असताना "भरवशाच्या म्हशीला टोणगा" ह्या म्हणीवर चर्चा चालू होती... "टोणगा" चा नेमका काय अर्थ? आणि इथे तो कसा काय वापरात येतो?

आम्ही तर्कानी असा अर्थ लावला की टोणगा म्हणजे छोटं रेडकू आणि म्हैस बाळंत होणार असेल तर तिला म्हैसच होईल असा भरवसा असताना तिला टोणगा झाला.


Vinaydesai
Friday, June 23, 2006 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोणगा - रेडा, male

म्हैस ही दुधासाठी पाळली जाते.

रेडा शेतीसाठी वापरला गेला असला, तरी त्याठिकाणी बैलाची नियुक्ती जास्त असते. कारण रेड्याकडून काम करून घेणं कठिण असतं....

मी खूप पूर्वी (लहान असताना) एका डेअरीवर दुध आणायला जायचो तिकडे दिड दोनशे म्हशी असायच्या.. एकाद्या म्हशीला रेडा झाला तर ते लोक त्याला उपाशी ठेऊन मारून टाकायचे, आणि रेडी (female) झाली तर मात्र नीट वाढवायचे..



Ameyadeshpande
Friday, June 23, 2006 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर तर्क होता म्हणायचा :-)

Bee
Friday, July 21, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही म्हण आहे की कवितेच्या ओळी आहेत...

चाकवताची भाजी खद्-खद शिजे
राजाघरी महारिण निजे

म्हण असेल तर तिचा अर्थ काय होऊ शकेल. मझ्या मते प्रतिष्ठीत व्यक्तीचे फ़टलेले जे जगाला दिसत नाही ते उघडकीस आणायचा प्रसा केला गेला आहे. महारिणीच्या घरी तिची चाकवताची भाजी शिजते पण ह्याच महारिणीला बोल लावणारा राजा एकीकडे तिच्या शेजी झोपतो.


Soultrip
Friday, July 21, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं त्यातुन 'अशक्य असं घडतंय' हे ध्वनित करायचं असेल.

Bee
Friday, July 21, 2006 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे चाकवतcच्या भाजीचे खदखद शिजणे ही महारिणीची दैना दाखविते आहे. राजाघरी ती निजते ही राजाची दैना दाखविते आहे.

सोल, अर्थ नाही पटला.. थोडे विश्लेशन द्यायचे होते..


Harshad_78
Thursday, August 24, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ़ कर राधा. पण माझ्या माहिती नुसार ती म्हण "एक मासा आणि हंडीभर रस्सा" अशी आहे.

Robeenhood
Thursday, August 24, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भरवशाचे म्हशीला टोणगा ही म्हण अपेक्षाभंग या अर्थाने वापरली जाते. त्यामागे एक गोष्ट आहे. ती साधारण शेख चिल्लीच्या गोष्टीसारखी आहे. एक शेतकर्‍याची म्हैस गाभण असते. तो सारखा विचार करीत असे ही म्हैस व्यायल्यावर तिला पारडी होईल. मग मी तिला वाढवील. मग मी तिचे दूधही विकून पैसे मिळवील. पुन्हा तिला पारडी होईल. पुन्हा मी आणखी दूध विकील,जादापारड्या विकून पैसे मिळवील. मग मी घर बांधील वगैरे यंव करील अन त्यंव करील. त्यावर तो बरेच कर्जही करून ठेवतो. पुढे ती म्हैस व्यायल्यावर तिला होतो टोणगा!! आणि त्याचे सर्व मनोरथ धुळीला मिळतात.....

Saanjya
Wednesday, September 13, 2006 - 9:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Robeenhood,
म्हणीचा अर्थ अगदि बरोबर आहे, पण ती गॊष्ट थोडि विसंगत वाटतेय, गोष्ट थोडि स्वप्नाळु आहे तर म्हण आधी 'भरवसा' आणि मग आपेक्षाभंग दाखवते.. नेहमी चांगल्या धावा कराणारा तेंडल्या शून्यावर आऊट होणे वैगेरे उदाहरण जास्त चपखल बसेल..

साधारण याच अर्थाचि अजुन एक म्हण.. (थॊडि जास्तच "ग्रामीण" आहे)
'नावाजलेला गूरु देवळात ह** (घाण करणे)


Saanjya
Wednesday, September 13, 2006 - 10:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee,
चाकवत शिजली तरी आवाज होतो पण राजाघरी काहिहि झाले तरी चालते, असे म्हणायचे आहे का तुला..
पण ते अगदि नीट पटत नाहीत, अजुन थोडा संदर्भ हवा होता..




Bee
Thursday, September 14, 2006 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्ज्या, मला त्या म्हणीचा अजून नीट अर्थ लागला नाही. मी फ़क्त आपला एक अन्दाज बांधला की असे असू शकेल का? पण तू दिलेला अर्थ देखील छान वाटतो आहे. म्हणजे खरे असून बोलायची चोरी असा जो प्रकार असतो ना तसा..

Gajanandesai
Friday, September 15, 2006 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझं घर जळलं तर जळू दे, पण माझं वांगं भाजलं पाहिजे. :-)

Saanjya
Saturday, September 16, 2006 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिळेल ती गिळेल ;-)

Bee
Tuesday, October 03, 2006 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिले पाढे ५५ ह्या म्हणीचा अर्थ कुणास ठाव असेल तर इथे लिहा..

Bee
Monday, October 30, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हातारी मेल्यचं दु : ख्ख नाही पण काळ सोकावतो

ह्या म्हणीचा अर्थ काय होतो?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators