Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 10, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through October 10, 2006 « Previous Next »

Milindaa
Thursday, September 28, 2006 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. .. .. .. ..

Lalu
Thursday, September 28, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिन्दा, तुला त्या एपिसोड मधले नक्की काय आठवले म्हणून तू हसतो आहेस? :-)

Bee
Friday, September 29, 2006 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळी अंकाची कल्पना फ़क्त मराठीत लोकांमध्येच आहे का? माझी छाती अभिमानाने फ़ुलली.

शोनू, तुझा वेळ सत्कारणी लागला असे म्हण. बहुतेक उपासला मी म्हंटले तेच म्हणायचे होते म्हणून सेम का पिन्च :-) करेक्ट की नाही?

----------

असो.. मला एक कळत नाही, केरळ, तमिळनाडू असे आपण म्हणतो. पण ही दोन्ही राज्य भारतात आहेत आणि तिथली जनता केरल, तामिलनाडू असे म्हणतात. मग मराठीत कुणा तज्ञाने 'ल'चे 'ळ' केले आणि कशाच्या आधारावर? माझा एक तमिळ मित्र मला नेहमी नावे ठेवतो की तुम्ही लोकांनी हा 'ळ' नको तिथे वापरला आहे. मग मला आठवूण तमिलनाडू म्हणावे लागते. तर हे असे का?


Parop
Friday, September 29, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो, नवरात्री आणि दसर्‍याच्या हार्दीक शुभेच्छा!

Giriraj
Friday, September 29, 2006 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतिय अथवा मराठी संकल्पना अभारतियांना समजवायचा प्रकार एकदा GS च्या कृपेने आला होता... बाई होत्या मलेशिअयन आणि समजवायचे होते ते 'अंगात येणे'... मि कसं सांगितलं मलाच माहीत.. वर GS ने नन्तर त्याला सांगितल्यावर कसे explain करावे हे त्याच्या पद्धतिने सांगितले तेयाने तेव्हा आणि आताही हसू आवरत नाही :-)



Kashi
Saturday, September 30, 2006 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,पुढच्या शनिवार पासुन मराठीच्या क्लासला ये बघु..

Bee
Saturday, September 30, 2006 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी वर्ग घ्यायला का वर्गात बसायला :-) मला दोन्ही आवडेल.

Arch
Monday, October 02, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्रिंम चा अर्थ काय? सप्तशतीच्या पोथीत खूपदा आहे.

Bee
Tuesday, October 03, 2006 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर मी 'ल' चा 'ळ' का केला हे विचारले आहे. त्याची माहिती कुणाला असेल तर लिहा मंडळी. असे गप्प गप्प बसू नका :-)

Shonoo
Wednesday, October 04, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च

तो शब्द संस्कृत आहे का? rhym असा आहे का? मला इथे नीट दिसत नाहिये तो लिहिलेल hymn असेल किंवा hinm वगैरे असेल असं वाटतय. सप्तशतीची पोथी म्हणजे मागे जगनबुवांनी ज्या गाथा सप्तशती नामक पुस्तका बद्दल लिहिले होते तेच का?

सॉरी प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्नच फार झाले :-)



Kedarjoshi
Wednesday, October 04, 2006 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु बहुतेक तो र्‍हिम असा आहे.
ओम र्‍हिम व्र्हीम चांमुडायविच्चे


Shonoo
Wednesday, October 04, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार्:

धन्यवाद.

आता शब्दकोषात बघता येईल. घरी गेल्यावर (आठवल्यास) बघून सांगेन.


Vaatsaru
Wednesday, October 04, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहितीप्रमाणे हे सगळे 'बीजमंत्र' आहेत म्हणजे मंत्राच्या एकाच अक्षरात शक्ती सामावलेले, वैदिक लिखाणात ह्यांचे उल्लेख सापडतात पण नंतर (बहुधा) उग्र दैवतांच्या उपासनेसाठी जास्त वापर केला गेला असावा.
चू. भू. द्या. घ्या.


Asami
Wednesday, October 04, 2006 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाथा सप्तशती वेगळ्या प्रकारचे साहित्य अहे ना ?

Bee
Thursday, October 05, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेगळ्या प्रकारचे साहित्य म्हणजे काय असामी? फ़ार फ़ार तर अध्यात्मिक साहित्य म्हणता येईल.

मलाही हे बीजमंत्र वाटतात पण 'बीजमंत्र' हा शब्द लिहिताना स्मरत नव्हता.


Bee
Thursday, October 05, 2006 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुर्यनमस्कार घालताना त्याची बारा नावे आहेत त्यात देखील हे सर्व बीजमन्त्र येतात.

जसे

ओम ह्रिम खगाय नमः
ओम ह्रुम भास्कराय नमः
ओम ह्रिम आदित्याय नमः
ओम ह्रुम सुर्याय नमः
ओम ह्रिम पौष्णेय नमः

अशी बारा नावे आहेत.


Asami
Thursday, October 05, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते गाथा सप्तशती नावचा ग्रंथ ज्याच्या माहितीबाबत मेधा म्हणते आहे तो हाल सातवाहन राजाने लिहिला असून तो देवीची उपासना etc नसून प्रेमकथा आहे. सप्तशतीची पोथि वेगळी आहे.

हे पहा

Bee
Friday, October 06, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, तुझे धन्यवाद कसे मानावे कळत नाही. लिंक दिल्याबद्दल पुनश्च आभार!

शोनू, असामी - इथे जे सध्या online आहेत त्यांच्यासाठी मी वरील लिंक वर एक मजकुर सोडला आहे. जाऊन वाचा!

जी काही माहिती वाचली त्यावरुन असे वाटते की ही गाथा शृंगाररसात लिहिल्या गेली असावी. किंवा परिस्थितीपोटी केलेल्या स्वैराच्चाराचे वर्णण.. मला मैत्रेयिने जी माहिती तिथे लिहिली ती खूप आवडली.

ही गाथा सप्तशती मिळविण्याचा मी पुरेपुर प्रयास करणार आहे पण मी जी माहिती काढणार आहे ती जर इथे आधीच कुणी काढली असेल तर ती माहिती एकमेकांना इथे share करण्यास उदारता असावी.


Bee
Friday, October 06, 2006 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचतंत्र ग्रंथातील पाच तंत्रांबद्दल कुणाला माहिती देता येईल का? मराठीत अथपासून इतिपर्यंत म्हणजे समग्र पंचतंत्र असे काही आहे का?

Bee
Tuesday, October 10, 2006 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवचित चा नक्की अर्थ नकळत असा होतो की काही आणखी वेगळा होतो?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators