Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 25, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through September 25, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Monday, September 18, 2006 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks.. चिऊ....
एखादे उर्दु शब्दांचे अर्थ सांगणारे पुस्तक माहित आहे काग तुला...!असल्यास pl सांग!!!


Bee
Monday, September 18, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच चिऊ. मलाही तो शब्द मराठीतील कंगोरा शब्दासारखा वाटला पण माझ्याने वाक्याचा अर्थ लागला नाही. शिखर किंवा टोक असाही त्याचा अर्थ घेता येतो हे तुझ्या पोष्टवरून लक्षात आले आणि लगेच अर्थही लक्षात आला. धन्यवाद!

Chioo
Monday, September 18, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही गं वैशाली. मला उर्दूचे ज्ञान काहीच नाहीये. केवळ हौस म्हणून वाचते आणि त्यातले काही काही असे चुकूनच कळते. :-)

Psg
Monday, September 18, 2006 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्यावर 'खार खाऊन असणे' म्हणजे एखाद्याबद्दल मनात अढी असणे, राग असणे.. पण 'खार खाऊन'च का? हा 'खार' कोणता आणि 'खारच' का, अजून काही का नाही? कोणी सांगू शकेल? :-)

Lopamudraa
Monday, September 18, 2006 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान ग.. किती पटकन अर्थ सांगितलास..!!! तुला मी अजुन थोडा त्रास देइल मग अधुन मधुन..!!!

Shonoo
Monday, September 18, 2006 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्‍याच पूर्वी उर्दू वा फारसी शब्द देवनागरी स्क्रिप्ट मधे लिहून मग त्या शब्दांचा मराठीत अर्थ असलेली डिक्शनरी मिळत असे. आजकाल जर 'उर्दू डिक्शनरी' असं गूगल केलं तरी बर्‍याचशा शब्दांचे अर्थ मिळतात.


Chioo
Monday, September 18, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो. :-) कधीही. मला येत असला तर नक्की सांगेन. आणि शोनू म्हणते तसं फ़ार कठिण असला तर गूगलकी जय. :-)

Lopamudraa
Monday, September 18, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो का.. thanks .. शोनु आणि चिऊ..

Parop
Tuesday, September 19, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपमुद्रा... बर्‍याच उर्दू-मराठी डिक्शनरी उपलब्ध आहेत. मजजवळ अशीच एक poket डिक्शनरी आहे......

Upas
Wednesday, September 20, 2006 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुज्य ह्या शब्दाचा अर्थ काय?

Shyamli
Wednesday, September 20, 2006 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुज्य:-चतुर्विध मुक्तीतीतली एक(हीत जीवाचे ईश्वराशी तादात्म्य होते)

सायुज्यता:-सायुज्य मुक्तिची अवस्था

आभार शब्दरत्नाकर.... वा.गो. आपटे


Upas
Wednesday, September 20, 2006 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद श्यामली..

आणि मग चतुर्विध मुक्तितल्या इतर तीन मुक्ती कोणत्या?


Prafull
Wednesday, September 20, 2006 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलोकता
सरुपता
समीपता
सायुज्यता

चु.भु.द्या.घ्या.


Bee
Thursday, September 21, 2006 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, जर तुला यथासांग माहिती हवी असेल तर एकदा दासबोध उघडून बघ. आम्ही जेंव्हा दासबोधाचे वाचन केले होते त्यावेळी हे शब्द वारंवार येत. पुर्णपणे समजायला खूप मेहनत घेऊन वाचावे लागते नाहीतर फ़क्त वाचन होतं पुढे काही नाही.

Sayuri
Saturday, September 23, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'परिणिती' या शब्दाचा अर्थ काय? 'एखाद्या गोष्टीचा परिणाम किंवा शेवट' (outcome, result?)असा काहीसा अर्थ आहे का?

Asmaani
Saturday, September 23, 2006 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, ते परीणती आहे. "परिणिती" नाही. तुझा अर्थ बरोबर आहे.

Sayuri
Saturday, September 23, 2006 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अच्छा, ते परीणती आहे तर! आभारी आहे अस्मानी.

Shonoo
Saturday, September 23, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परिणती आहे ते, परीणती नव्हे

Shonoo
Saturday, September 23, 2006 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी दासबोध कुठला वाचला होतास? समर्थांचा ते माहिती आहे मला. पण संपादक किंवा प्रकाशक कोण ते विचारायचं होतं. डिसेंबर महिन्यात मुम्बै ला जाणार आहे तेंव्हा घेता येईल असा विचार आहे.

तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरी सुद्धा कोणती छान आहे ते माहिती असेल तर सांग.


Bee
Monday, September 25, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, आम्ही जो वाचला होता तो केशव बेलसरेंचा होता.

विहंत, विहंगम म्हणजे पक्षी. पण हा शब्द मी आजवर फ़क्त एकच संदर्भात वाचला आहे आणि तो म्हणजे Bird eye view . जसे की-

१) विमानातून त्या शहराचे विहंगम दृष्य नजरेला पडले.

२) टेकडीवरून दिसणारे विहंगम दृष्य फ़ारच मनोहर होते..

खास पक्षी म्हणून जर हा शब्द वापरायचा असेल तर तो कसा वापरता येईल. असे म्हणता येईल का?

तो निळा विहंगम सुंदर आहे..

मला हे वरील वाक्य जरा चुकीचे वाटते आहे.

तेंव्हा विहंगमची आणखी काही उदा. देता आलीत तर खूप सोपे जाईल हा शब्द आणखी वेगळ्या संदर्भात वापरताना..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators