Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
इतर चर्चा

Hitguj » Language and Literature » साहित्यिक » अनिल अवचट » इतर चर्चा « Previous Next »

Sayuri
Wednesday, September 13, 2006 - 1:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कोणीच अनिल अवचटांचे पंखे नाहीत काय?

ग्रेट लेखक!!मी त्यांची खालील पुस्तके वाचली आहेत.
माणसं
स्वत:विषयी
छंदांविषयी...(कदाचित मी चुकले असेन, पण मला वाटते, याच पुस्तकात, स्वयंपाककलेविषयी लिहिताना, त्यांनी साबुदाण्याच्या खिचडी बद्दल फ़ारच मस्त लिहिलं आहे.)
शिवाय त्यांचे मला वाटते 'गर्द' असे पण एक पुस्तक आहे...पण मी अजून ते वाचले नाही.
तसेच, अभय बंग, अरुण देशपांडे, Dr. बाविस्कर इ. महान व्यक्तिंविषयींचे लेख पण वाचलेत, पण पुस्तकाचं नाव आठवत नाही.:-(


Naatyaa
Wednesday, September 13, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, त्या पुस्तकाचे नाव आहे कार्यरत. मि पण अनिल अवचटांचा पंखा आहे.. माझ्याकडे त्यांची ९-१० पुस्तके आहेत. अजुन नंतर लिहिनच..

Bee
Wednesday, September 13, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१२वीला असताना मराठीच्या पुस्तकात त्यांचा एक धडा होता अमेरिकेविषयी. दिवाळी अंकात देखील ते नियमित लिहितात. कार्यरत मधील व्यक्ती जर ओळखीच्या असतील तर त्यांच्याबद्दल अजून माहिती वाचताना खूप छान वाटते. जसे अभय बंग बद्दल आधीच माहिती होतं म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी जे काही लिहिल ते कळत गेलं. त्यांची ९-१० पुस्तके आहेत का माहिती नाही. मला इतकीच ठावूक आहेत :

१) स्वतःविषयी, ( An Autobiography )
२) मोर
३) आप्त
४) कार्यरत
५) कोंडमारा
६) पूर्णिया

त्यांच्या पत्नी, स्व. सुनंदा अवचट, ह्यांच्यावर त्यांनी एक इतका इतका तरल लेख लिहिला आहे. तो जर मिळाला तर अवश्य वाचा. अगदी आरपार भेदून जातो तो लेख.

आपले अनुभव जसेच्या तसेच मांडणारा हा एक मस्त लेखक आहे.

१२वीला होता त्या धड्याचे नाव इथे कुणाला स्मरते का?


Naatyaa
Wednesday, September 13, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील post मधील पुस्तकांव्यतिरीक्त त्यांची मी वाचलेली बाकी काही पुस्तकं:

अमेरीका
छंदांविषयी
संभ्रम
धार्मिक
धागे उभे आडवे
प्रश्न आणी प्रश्न

त्यांची काही नविन पुस्तके सुद्ध नुकतीच आली आहेत (ती मी वाचलेली नाहीत):
मस्त मस्त उतार हा कवितासंग्रह आहे.
दिसलय ते
जगण्यातील काही


Sayuri
Wednesday, September 13, 2006 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय, 'कार्यरत'च ते. बरोबर. हो, आणि, 'अमेरिका' सुद्धा उत्तम आहे. खरंच, किती talented व्यक्ति आहे ही...स्वत: वैद्यकिय व्यवसायातील असण्याव्यतिरीक्त, बाकि विषयांचे ज्ञान किती! शिवाय, बासरी वाजवणे, ओरिगामी, चित्रकला, फ़ोटोग्राफ़ी ह्या बाजूही आहेतच!!

Sayuri
Wednesday, September 13, 2006 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कोंडमारा' आणि 'पूर्णिया' ही पुस्तके मी अजून वाचली नाहीत. काय विषयांवर आहेत ती?

Raigad
Thursday, September 14, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी त्यांची एक पंखा आहे! वर लिहिलेली सर्व पुस्तकं तर सुंदरच आहेत पण त्यांचे दरवर्षीच्या साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकातले लेखदेखील अप्रतिम! विशेषत्: वर म्हटलेला सुनंदाताईंवरचा, आणि जवळ्पास ७-८ वर्षापुर्वी आलेला AIDS वरचा लेख अगदी न विसरता येण्यासारखा!!!

Bee
Thursday, September 14, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी,

पुर्णियाबद्दल तुला इथे वाचयला मिळेल्:
http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b15658&;language=marathi

आणि कोंडमाराबद्दल इथे:
http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b39995&;language=marathi


Sayuri
Thursday, September 14, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी धन्यवाद! ही साइट माहीत नव्हती मला.

Vijaykulkarni
Tuesday, September 26, 2006 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सम्भ्रम हे पुस्तक मी वाचले आणी पन्खा बनून गेलो.


Raina
Tuesday, September 26, 2006 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छंद- पण फार छान पुस्तकं आहे- विशेषत: त्यातली त्यांची एकेक गोष्ट शिकण्यासाठीची धडपड- स्वयंपाक, ओरिगामी, बासरी, लाकडी शिल्प,फोटोग्राफी, वाचन वगैरे... पांढ-या शुभ्र मऊ साबूदाणा खिचडीच्या टिप्स- भेळवाला सुरेख टोमटो चिरतो म्हणून तसे शिकणे.. आपली सुरी घेऊन फिरणे वगैरे- अल्टिमेट... एक वाक्य अजून आठवते आहे- त्यांनी लिहिलय- पाककृतीच्या पुस्तकाच्या ज्या ज्या पानावर डाग पडले आहेत- ते ते पदार्थ आमच्या घरात करुन झालेत..
{अगदी, अगदी
}

Naatyaa
Wednesday, March 03, 2004 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिल अवcअटांचे 'आप्त' वाचले. त्यांच्या बाकी पुस्तकांइतकेच सुंदर आहे. त्यांना भेटलेल्या, जवळच्या वाटलेल्या व्यक्तिंबद्दल लिहिले आहे.
जेPपी आणी क्लासो ही दोन व्यक्तिचित्रे फारच आवडली.


A must read for Anil Avachat fans. BTW, pustak tase barech june ahe.

Sayuri
Monday, June 18, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिल अवचटांवरचा खास ब्लॉग. इथे त्यांनी काढलेली स्केचेससुद्धा आहेत. :-)

http://anilawachat.wordpress.com/

Vhj
Tuesday, August 07, 2007 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच अनिल' अवचटांशी गप्पा' या आर्यक्रमाला गेलो होतो. इतका अप्रतिम कार्यक्रम झाला. त्यांचे बोलणे, विचार,आणि वागण्यातला साधेपणा लगेचच लक्षात येतो.त्यांच्याकडे कला म्हणाल तर इतक्या कि आपला विश्वासच बसत नाही. लेखनाशिवाय बासरी, लाकूड कोरुन डिझाइन, ओरेगामी,स्वयंपाक.....

Meghdhara
Sunday, December 09, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा! इतके पंखा मित्र! बी, रायगड अगदी खरं आहे. सुनंदाला आठवताना हा लेख साप्ताहीक सकाळ २००० मधे आहे. कुणाला हवा असल्यास मी आनंदाने पोस्ट करेन. माझ्या किती तरी मित्र मैत्रीणींना मी हा लेख वाचायला दिला (लावला! :-)) आणि तेवढच किंवा त्याहुन जास्त कौतुक डॉ. सुनंदा अवचटंबद्दल वाटतं रे! सुनंदा अवचटांच्या आईबद्दल वाचूनही आश्चर्य वाटतं. ही जगावेगळी निरंकारी माणसं हेच खरं.
गेल्या वर्षीच्या मौज मधे अवचटांचा तीन मदतनीस हा अजून एक चांगला लेख आहे.
त्यांच्या प्रश्न आणि प्रश्न चा उल्लेख वर कुठे झालाय का?

मेघा


Mvrushali
Monday, December 10, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा,करणार का इथे पोस्ट?किंवा मेल करू शकशील का?मी मेल अड्रेस कळवेन जर इथे पोस्ट करता येत नसेल तर..
सुनंदा अवचटांच्या आईबद्दल कुठे आलय लिहून?धन्यवाद


Meghdhara
Monday, December 10, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्रुषाली माझ्या मेल वर पोस्टल पत्ता पाठवलास तर पोस्टाने पाठवीन.. :-( असं म्हणायचं होतं गं मला..! बाकी तसे काही शक्य नसल्यास तुझ्या मेल वर पोस्ट करेन.
तसं मला सांग म्हणजे वर्ड मधे सेव करायला सुरुवात करते.
इथे पोस्ट करायला कदाचीत परवानगी घ्यावी लागेल/ की नाही माहीत नाही.

मेघा


Karadkar
Monday, December 10, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पोकिंग माय नोज इन ज्यात त्यात हा पण तो लेख PDF स्वरुपात इथे आहे :-)

http://www.muktangan.org/pdfs/Sunandala.pdf


इथे ही भेट द्यायला विसरू नका http://anilawachat.wordpress.com/

Meghdhara
Tuesday, December 11, 2007 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा! नेकी और पुछ पुछ.. चांगल सांगितलस कराडकर. बाकी एवढा मोठ्ठा लेख वर्डमधे सेव करायला खुप वेळ लागला असता.
धन्यवाद.

मेघा





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators