Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 06, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through September 06, 2006 « Previous Next »

Vinaydesai
Tuesday, September 05, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'म्होरं या' याचा तो अपभ्रंश असावा.. संजय उपाध्येंच्या म्हणण्याप्रमाणे....



Moodi
Tuesday, September 05, 2006 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही नाही. चिंचवडचे सुप्रसिद्ध संत श्री मोरया गोसावि यांच्या नावावरुन ही मोरया सुरुवात झालीय. कारण त्यांना जेव्हा गणपतीची मूर्ती सापडली(चुभुदेघे) तेव्हा त्यांनी तिची प्राणप्रतिष्ठा करुन तिथे आधी छोटे मंदिर उभारले. जे पवना नदीच्या काठावर चिंचवड येथे आहे. तिथे दरवर्षी मोठा उत्सव असतो.

Maitreyee
Tuesday, September 05, 2006 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याही माहितीप्रमाने मोरया गोसावींचाच संबन्ध आहे त्या मोरया शी. जसे ' पुंडलिक वरदे हरी विठ्ठल' म्हणतात तसे

Ameyadeshpande
Tuesday, September 05, 2006 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! इकडे जेवणाच्या गोष्टी चालल्यात आणि मला ठावं न्हाय

Kedarjoshi
Tuesday, September 05, 2006 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रति + ष्ठापना
असे दोन शब्द नाहीत रे बी. तो एकच शब्द आहे. प्राणप्रतीष्ठा हा शब्द कमी मुदती साठी किंवा तेवढे एकच कार्य साधन्या साठी करतात जसे गणपती उत्सव. त्या देवतेला काही कालावधी साठी त्या प्रतीमेत येउन राहान्याची विनंती म्हणजे प्राणप्रतिष्ठा. त्या कालावधी नंतर परत त्या प्रतिमेतुन प्राण काढुन घेन्याचा विधी असतो व त्या मुर्ती किंवा प्रतिमेचे विसर्जन केले जाते. पण कुठलीही मुर्ती नेहमी साठी ठेवायची असेल तर प्रतिष्ठापणा करतात.

Bee
Wednesday, September 06, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, खूप सुंदर तर्‍हेने अर्थ सांगितलास.. मला ह्यातलं काहीचं माहिती नव्हत. धन्यवाद..

पण बर्‍याच ठिकाणी मुर्तींचे विसर्जन केले जात नाही. आता इथे भारतातून इतकी मोठी मुर्ती येते. तिचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे इथे allowed नसते किंवा इथल्या मंडळाला ती मुर्ती जपूण ठेवायची असते. अशावेळी मग प्राणप्रतिष्ठेचे उल्लंघन होते असे आहे का?

मोरया, 'पुंडलीक वरदा हारी विठ्ठल' ह्यांची पण माहिती मला ठवं नव्हती :-)


Bee
Wednesday, September 06, 2006 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेव्हा त्यांनी तिची प्राणप्रतिष्ठा करुन तिथे आधी छोटे मंदिर >>

मूडी वर तू प्राणप्रतिष्ठा लिहिले तिथे प्रतिष्ठापणा असे हवे होते. तुझ्याकरवी ही चुक मला मुळीच अपेक्षित नव्हती :-)

Bee
Wednesday, September 06, 2006 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"हे त्यांच्यावर निर्भय आहे" असे आपण "हे त्यांच्यावर अवलंबून आहे" अशा अर्थानी म्हणतो हे बरोबर की चुक? ही मूडी आणि तो लिम्बु मला चुकीत काढत आहेत.. बरोबर कुणीतरी सांगा..

Shyamli
Wednesday, September 06, 2006 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निर्भय नसतं रे बी...

निर्भर तरी ठीक आहे पण हा शब्द सुधा मराठी नाही हिंदी आहे



Lopamudraa
Wednesday, September 06, 2006 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली निर्भर हिंदी सुद्धा आहे पण मराठितही आपण हे ज्याच्या त्याच्यावर निर्भर(अवलंबुन) आहे.. असे म्हणतो ना.. अवलंबुन चेही दोन अर्थ आहेत नाहितर त्यावरुन अजुन शेपुट लांबायचे...मराठी भाषा वाकवली तशी वाकते...!!!

Shyamli
Wednesday, September 06, 2006 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन शेपुट लांबायचे...मराठी भाषा वाकवली तशी वाकते...!!! >>>>
हो हो हे मात्र खरय..........

Sonchafa
Wednesday, September 06, 2006 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप दिवसांपासून विचारणार होते पण राहून जात होते. अतिवृष्टीच्या बातम्या सांगत असताना वेगवेगळ्या टी.व्ही. चॅनल्स वर अमुक अमुक धरणातून एवढ्या पाण्याचा विसर्ग अस उल्लेख येत होता. ह विसर्ग शब्द का कोण जाणे मला नेहेमी खटकत होता. विसर्ग हे चिन्ह म्हणून माहित अहे पण इथे अर्थ समजत असला तरी तसा खरच शब्द आहे का ह्या संदर्भात?

Limbutimbu
Wednesday, September 06, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विसर्ग जरी चिन्हा करीता वापरीत असला तरी, विसर्ग चिन्ह दिल्याठिकाणी ज्या प्रमाणे उरलेला श्वास पुर्ण सोडुन उच्चारण केले जाते त्या श्वास सोडण्याच्या क्रियेला "विसर्ग" म्हणत असावेत! त्या दृष्टीने जास्तीचा राहीलेला श्वास जसा विसर्ग चिन्हाच्या ठीकाणी पुर्ण सोडुन दिला जातो, तसे जास्तीचे पाणी सोडुन देण्याच्या कृतीला "विसर्ग" म्हणणे बरोबर वाटते
"उत्सर्ग" हा अन्य शब्द हे पण उत्सर्गात स्वयम्पुर्ण क्रिया अपेक्षित हे जी विसर्गात नाही! विसर्ग घडवुन आणला जातो तर उत्सर्ग म्हन्जे गरम पाण्याची कारन्जी किन्वा राजापुरची गन्गा!
चु. भु. द्या. घ्या!

बी, तुला एक सान्गतो मी, तू V&C वर अज्जाबात जात जावु नकोस!
तिकडे "चिकन गुणीयाची" साथ हे!
DDD

Bee
Wednesday, September 06, 2006 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवलंबुन चेही दोन अर्थ आहेत नाहितर त्यावरुन अजुन शेपुट लांबायचे...

कुठले दोन अर्थ.. आणि लांबले शेपूट तरी काय फ़रक पडतो.. माहिती मिळतेच ना.. उगाच उखाळ्या पाखाळ्या आणि यव तव केल्यापेक्षा अशा ग्यान देऊ गोष्टी केल्या तर उलट चांगले आहे..

Lopamudraa
Wednesday, September 06, 2006 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बु... हो धरणात capacity पेक्षा जास्त पाणीराहणे धोकेदायक ठरते म्हणुन.. ते सोडले जाते..
उत्सर्ग आणि विसर्गचा फ़रक बरोबर सांगितलाय तु..मला अर्थ माहित होता पण शब्द सापडत नव्हते तु perfect पकडलाय...
बी अरे शेपुट अवघड शब्दावरुन लांबलेतर काही बिघडत नाही पण छोट्या छोट्या गोष्टीवर किती वेळ चर्चा करायची.. शेवटी वेळ सगळ्यात महत्वाची गोष्ट...!!!
..लिम्बु म्हणजे तुम्ही दोघही नाही जाणार का v&c वर...!!!


Limbutimbu
Wednesday, September 06, 2006 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> लिम्बु म्हणजे तुम्ही दोघही नाही जाणार का v&c वर...!!!
अग न जाऊन कस चालेल?
एरवी माशा मारतो, तर तिकडे जावुन मच्छर मारीन!
DDD

Shyamli
Wednesday, September 06, 2006 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

liMbubhaauu .. .. .. ..

Robeenhood
Wednesday, September 06, 2006 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाण्याचा विसर्ग हा शब्द इन्ग्रजी discharge या शब्दाचे भाषान्तर आहे. हा शासकीय प्रमाण भाषेतील शब्द असल्याने तो व्यवहारात अनुभवास येणार नाही...
जास्तीच्या पाण्याचा आणि त्याचा संबंध नाही. धरणातून पाणी कमी असतानाही म्हणजे शेतीसाठी अथवा पिण्यासासाठी वर्षभर सोडीतच असतात त्यालाही विसर्गच म्हणतात..
It is simply discharge of water from reservoir.


Limbutimbu
Wednesday, September 06, 2006 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर, मग डिस्कार्ड या इन्ग्रजी शब्दाला कोणता मराठी शब्द?
मी "जास्तीचा" असा उल्लेख खर तर श्वासा सन्दर्भाने केला होता, त्या आधी मी "विसर्ग" शब्द अशा पद्धतीने वापरणे चूक अस लिहिल होत, पोस्ट प्रीव्ह्यूमधे असताना श्वास सोडण्याची क्रिया आठवली अन मग विसर्ग शब्दाचा अर्थ लागला, जाणवला तो लिहीला! खर तर काहीही सोडुन देणे, वहावुन टाकणे इत्यादी अर्थ घेता येतिल ना?


Lopamudraa
Wednesday, September 06, 2006 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अच्छा.. हो का!!! ,मला वाटत होते फ़क्त जस्तिचे पाणी सोडण्यालाच म्हणतात..




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators