Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 22, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through August 22, 2006 « Previous Next »

Bee
Friday, August 18, 2006 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला विचारावयाचे होते की ९वारीच्या कुठल्या भागाला काष्टा म्हणतात. तो असतो हे आधीच माहिती होते पण 'ठ' आणि 'त' आहे इतकाच गोंधळ होता तो दूर झाला आता. जसे निर्‍या, पदर, शेव कशाला म्हणतात हे माहिती आहे तसे काष्टा कशाला म्हणतात ते मला माहिती नाही. बहुतेक पाठिचा कणा जिथे संपतो तिथे नऊवारीचा जो भाग खोचतात त्याला काष्टा म्हणत असावे.

दीपांजली, इतकाही मी 'ढ' किंवा 'काल्पनिक' वैगरे नाही बरं का.. :-)

कुणाला जर असे चार पाच शब्द एकत्रीत आलेले माहिती असेल तर लिहा इथे.. जसे मी वर रांधा.. लिहिले आहे तसे.

गोळे, मनिषा काष्ठाचा अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद.


Ajjuka
Friday, August 18, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काष्टा म्हणजे २ पायांच्या मधून पुढून मागे नेऊन मगे कमरेत खोचतत तो भाग. साडीचे, धोतराचे २ भाग केले जातात.
काष्टी लंगोटी हा अर्थ जर प्रचलित असेल तर ते obvious च नाही का?
कास या शब्दावरून हा शब्द आला असावा.
काष्ठी म्हणजे वर दिल्याप्रमाणेच लाकडात.


Pinaz
Friday, August 18, 2006 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो एक "डी कास्टा" पण असतो म्हणे अरुण साधूच्या पुस्तकात.

Bee
Tuesday, August 22, 2006 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काल विद्दुलत्ता अकलुजकर ह्या बहुतेक कॅनडात राहतात त्यांचे 'यथा काष्ठ च् काष्ठ' असे फ़क्त पुस्तकाचे नाव वाचले. काय अर्थ आहे त्याचा मंडळी.. मी त्याचा एक अर्थ घेतला सरळसरळ पण तुम्ही हसाल..

जसे लाकडासारखे लाकूड.. :-( :-) हसावे की रडावे..


Manishalimaye
Tuesday, August 22, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
तुम्ही वाचलेलं हे पुस्तक माणसा माणसांतील रुणानुबंधावर होते का? किंवा ओळ्खी-पाळखी वगैरे विषांयांवर ते आधी सांगा. मग मी मला वाटतो तो अर्थ सांगते


Bee
Tuesday, August 22, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा,

भूषण केळकर ह्यांनी मागिल वर्षी 'निवडक तीन' असा एक काव्यसंग्रह प्रकाशित केला होता. जे कवी खूप कमी आणि दर्जेदार लिहितात त्यांच्या फ़क्त ३च कविता घायच्यात आणि अशा सगळ्या कवींच्या कविता एकत्रीत काव्यसंग्रहाने प्रकाशित करायच्या असा त्यांचा प्रयत्न होता. तर त्या निवडक तीन मध्ये मी विद्दुलत्ता अकलुजकरांच्याही कविता वाचल्यात. खाली त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती होती. त्यात कळले त्यांनी यथा काष्ठ च् काष्ठ हे पुस्तकं लिहिलं आहे. इथे ते पुस्तक मिळेल असे वाटत नाही. मी जसा माझा अर्थ सांगितला धाडस करुन तसे तुही सांग. फ़ार फ़ार तर इथे लोकं हसतील पण एकूण माहिती आपल्याच मिळते, आपलेच भले होते त्यातून. नाहीतर अज्ञान जवळ ठेवूनच आपण पुढे जातो :-) बापरे किती बोललो :-)


Manishalimaye
Tuesday, August 22, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यथा.......
म्हणजे तात्पुरते तेवढ्यापुरतेच.
माणस माणसांतील रुणानुबंधांबाबत असे म्हणतात. जशी दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. पण पुन्हा ते परत कधिच भेटत नाहीत.आअपल्यालाही अशी कित्येक माणसे भेटतात जी तेवढ्यापुरती खुप जवळचीही वाटतात पण मग काळाच्या ओघात आपण त्यांना विसरुनही जातो. इतके की काहींची नावेही आता आपल्याला आठवत नसतात.तेवढ्यापुरती निर्माण झालेली ती नातीही सहजच मिटुन जातात.
पुन्हा न जुळण्यासाठी, विस्मरणात जातात.म्हणजे ते संबंध "यथा.....
हुश.......
दमले
किती लिहिल ना मी
थोड्क्यात--तात्पुरते निर्माण झालेले संबंधम्हणजे यथा....


Bee
Tuesday, August 22, 2006 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुश्श कशाला.. किती छान लिहिलस. मला पटले कारण लेखिका गेल्या कित्येक वर्षांपासून परदेशात राहतात. त्यांच्याबाबतीत असे होऊ शकते. तेंव्हा तुझे विवेचन आवडले. कदाचित चुकुही शकते पण तू केलेला प्रयास चांगला आहे. धन्यवाद!

Chioo
Tuesday, August 22, 2006 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, हा मूळ संस्कृत श्लोक आहे.

यथा काष्ठं च काष्ठं
समेयातां महादधौ
समेत्य च व्यपेयातां
तद्वत(त चा पाय मोडलेला) भूतसमागम: :

याचेच गदिमानी,
दोन ओडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी त्यान पुन्हा नाही भेट(?)

असे भाषांतर केले आहे. मनिषाने दिलेला अर्थ बरोबर आहे.


Bee
Tuesday, August 22, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर पाय मोडायचा असेल तर .h वापरायचे आणि जर विसर्ग हवा असेल तर aH वापरायचे.

चिऊ, मी आत्ता विचारच करतो होतो की मुळ श्लोक कुठे मिळेल. जणू तुला माझ्यामनातले कळले. धन्यवाद..


Manishalimaye
Tuesday, August 22, 2006 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ धन्यवाद हा श्लोक इथे दिल्याबद्दल मलाही द्यावासा वाटत होता पण नीट १००टक्के देवनागरी व्यवस्थित लिहिता येत नाही ॅहुकीचे लिहिले गेले आणि भलताच अर्थ गेला तर

[आणि शिवाय टायपुन टायपुन दमायलाही होत बोटेही दुखु लागतात ते वेगळेच]


Bee
Tuesday, August 22, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा, इथे तेही बरोबर केले जाते. नंतर कुणीतरी चिकित्सक व्यक्ती आपले वाचतो आणि नीट बरोबर करुन सांगतो, कुणी तेच पोष्ट्स परत नीट लिहितो. असेही इथे घडते. मागे मी नाही का विभाज्य आणि विभाजक मध्ये चुक केली होती तेंव्हा रविने मला सांगितले होते. तेंव्हा प्रामाणिक प्रयत्न करत रहायचे.

Maitreyee
Tuesday, August 22, 2006 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या 'काष्ठ' वर रिसर्च सुरू आहे का बी :-)

Bee
Tuesday, August 22, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या रिसर्च नाही मैत्रेयी सर्च सुरू आहे.. lets be-positive :-)

Giriraj
Tuesday, August 22, 2006 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१) मला बी कुठे भेटू शकेल? :-)
२) .h न देता पाय मोडायचा असेल तर कसा मोडावा?



Shonoo
Tuesday, August 22, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी
ग दि मां चे वर उल्लेखित गाणे गीत रामायणात आहे दैव जात दु:खे भरता दोष ना कुणाचा.

तुला जर शक्य असेल तर नीट लक्षपूर्वक गीतरामायणातील सगळी गाणी ऐक. अतिशय सुरेख, चपखल शब्द योजना आणि सुधीर फडके यांचे शुद्ध उच्चार. श आणि ष मधला फरक सुद्धा त्यांच्या आवाजात स्पष्ट जाणवतो. पुस्तक जर वाचायला मिळाले तर अत्युत्तम.



Satyen_velankar
Tuesday, August 22, 2006 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mazhyakade gee4tramayanache pustak ahe!

Maitreyee
Tuesday, August 22, 2006 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, तुला बी जळी स्थळी काष्ठी पाषाणी दिसू लागलाय का? बाकी मायबोलीवर तुमची 'दोन ओंडक्यांची भेट' झाली आता परत प्रत्यक्षात पण होईल हे कसे सांगावे :-)


Manishalimaye
Tuesday, August 22, 2006 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी वास्तव म्हणजे जसे आहे तसे प्रत्यक्ष
वस्तव्य म्हणजे एखाद्या ठिकाणी रहाणे.


Kandapohe
Tuesday, August 22, 2006 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.h न देता पाय मोडायचा असेल तर कसा मोडावा? >>
ऑप्शन १ : सुपारी देवून
ऑप्शन २ : स्वतः मारहाण करून
ऑप्शन ३ : काठीने
ऑप्शन ४ : गुर्हाळात घालून

प्रात्यक्षीक हवे असल्यास मेल वर वेळ ठरवावी.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators