Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 16, 2006

Hitguj » Language and Literature » पद्य » संदीप खरे » Archive through July 16, 2006 « Previous Next »

Kshipra
Saturday, April 29, 2006 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग्गो बाई ढग्गो बाई ऐकली का? लहान मुलांची आहे पण र्‍हिदम एकदम मस्त आहे. सर्व मोठी माणसे देखील ताल धरतात त्या कवितेवर. एकदम मजेशीर आहे.जरूर ऐका.

Yuvrajshekhar
Monday, May 01, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मोर्चा नेला नाही...मी संपही केला नाही
मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना
कुणी पोटातून चिडताना,कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होऊनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखील मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे,मूळ-फांद्या जिथल्या तेथे
पावसाळ्यात हिरवा झालो,थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सात्विक सदरा,तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजूनी रूळते अदृश्य, लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो,मी देवालाही भ्यालो
मी मनातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही!आंबाही झालो नाही!


Sunilsavan
Tuesday, May 02, 2006 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल यश. ला प्रोग्राम होता. सर्व गाणी अप्रतिम.

Amikashi
Tuesday, May 02, 2006 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मी पण आलो होतो यश ला. काही नविन रचना होत्या. अग्गो बाई,बालकविता छान वाटली. मला 'सान्ग सख्या रे' कोणी देईल का?

Neela
Wednesday, May 03, 2006 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सान्ग सख़्या रे आहे का ती अजुन तैशीच गर्द राईपरी

सान्ग सख़्या रे अजुन का डोळ्यातून तीचिया झुलते अंबर?
सान्ग अजुनही निजेभोवती तिच्या रातराणीचे अस्तर?
सान्ग अजुनही तशीच का ती अस्मानीच्या निळाईपरी?

फ़ुले स्पर्शता येते का रे अजुन बोटामधूनी थरथर?
तिच्या स्वरानी होते का रे सान्ज अवेळी अजून कातर?
अजुनही ती घुमते का रे वेळुमधल्या धुन्द शीळेपरी?

वयास वळ्णावर नेणारा घाट तिचा तो अजुन का रे?
सलज्ज हिरव्या कवितेजैसा थाट तिचा तो अजुन का रे?
अजुन का ती जाळत जाते रान कोवळे जणु वणव्यापरी?

सान्ग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळुपरी
आणिक उमटून गेली होती लाली अवघ्या तारुण्यावरी
तिने ठेवला आहे का रे जपुन क्षण तो मोरपिसापरी

अता बोलणे आणि वागणे यातील फ़रकाइतुके अंतर
पडले तरिही जाणवते मज कवितेतून तिचीच थरथर
सान्ग तिला मी आठवतो का तिजवर रचलेल्या कवितेपरी


Sunilsavan
Saturday, May 06, 2006 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala MP3 havyat. Koni pathvel ka? Pl.
shivapurkars@gmail.com var pathava.

Rmd
Wednesday, May 10, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

konala "chal jiva raat zali" ya ganyache lyrics mahiti ahet ka?

Amikashi
Thursday, May 11, 2006 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रानो, २४ मे ला, आ बो का चा २०० वा प्रयोग, गणेश क्रीडा मन्ड्ळ ला आहे. वेळ आणि तिकीटे कळेलच.

Aj_onnet
Thursday, May 11, 2006 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२०० वा प्रयोग! वा!
१०० व्या प्रयोगाला आम्ही काही मायबोलीकर एकत्र गेलो होतो. यावेळी पण असा काही plan करायचा का?


Amikashi
Friday, May 12, 2006 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्कीच करुयात. तिकिटे उपलब्ध आणि कुठे ते कळाल्यावर किती घ्यायची ते ठरवुयात.

Mad_madan
Saturday, May 20, 2006 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे भलते अवघड असते ......

गाडी सुटली रुमाल हलले क्षणात डोळे टचकन् ओले,
गाडी सुटली पडले चेहरे क्षण साधाया हसरे झाले,
गाडी सुटली हातामधुनी हात कापरा तरी सुटेना,
अंतरातली हळवी माया तुटू दे म्हटले तरी तुटेना,
का रे इतका लळा लवुनी नंतर् अ मग ही गाडी सुटते ,
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते,
गाडी गेली फ़लाटावरी आठवणींचा कचरा झाला,
गाडी गेली डोळ्यांमधल्या निर्धाराचा पारा फुटला....हे भलते अवघड असते, कुणी प्रचंड आवडणारे ते दूर दूर जाताना,
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना,
डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखूनी कंठी,
तुम्ही केविलवाणे हसता, अन् तुम्हास नियती हसते,
हे भलते अवघड असते ..........

तरी असतो पकडायाचा हातात रुमाल गुलाबी,
वाऱ्यावर फडकवताना,पायाची चालती गाडी,
ती खिडकीतून बघणारी,अन् स्वतःमधे रमलेली,
गजरा माळावा इतुके, ती सहज अलविदा म्हणते,
हे भलते अवघड असते ..........

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू,
इतक्यात म्हणे ती माझ्या, कधी गावा येशील का तू,
ती सहजच म्हणुनी जाते, मग सहजच हळवी होते,
गजऱ्यातील् होन कळ्या अन्, हलकेच ओंजळीत देते,
हे भलते अवघड असते ..........


कळते की गेली वेळ, ना आता सुटणे गाठ,
अपुल्याच मनातील स्वप्ने, घेउन मिटावी मुठ,
हि मुठ उघडण्यापुर्वी चल निघूया पाऊल म्हणते,
पण पाऊल निघण्यापूर्वी, गाडीच अचानक निघते,
हे भलते अवघड असते ..........

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी,
ओठांवर शील दिवानी बेफिकीर पण थरथरती,
पण क्षणक्षण वाढत असते अंतर हे तुमच्या मधले,
मित्रांशी हसताना ही, हे दुःख चरचरत असते,
हे भलते अवघड असते ..........


Sagarghalsasi
Thursday, May 25, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

THIS IS THE BEST POEM WRITTEN BY SANDEEP
I HAVE HEARD IT FOR LOT OF TIMES
THANKS MADAN AS U HAVE POSTED IT HERE AS I CANT WRITE IN MARATHI MUCH THE WORDS GET MISSING
THANKS MADAN

Gauravlaturkar
Friday, July 07, 2006 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाकडे Blank Call हि कविता आहे का?

Yashfun
Saturday, July 08, 2006 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

blank call is the best ! i hav that kavita inform me ur mail id & i'll ffd it to you !
also please
KONAKADE YE YE NA YE YE NA YENA YE NA YE YE NA !! aahe ka ? please lyrics kinwa mp3 pathaval ka ? maza
patta-yash.fun@gmail.com

Gauravlaturkar
Monday, July 10, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा पत्ता:
gauravlaturkar@yahoo.co.in
dhanyavaad yasha.

Ddeodikar
Tuesday, July 11, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हसलो म्हनजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हनजे दूखी न्हवतो ऐसे नाही
हसलो म्हनजे फक्त स्वत:च्या फजीतिवर्ती
निरलज्यागत दिधली होती ताली
हसलो कारन शक्यच नव्हते दुसरे काही
दोल्यामधे पानी नव्हते ऐसे नाही


Ddeodikar
Tuesday, July 11, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aaga bai Dhagabai Lagali Kal
Dhagal Unhachi Kevadhi Zal
Thodi Na Thodaki Lagli Phar
Dongaracya Dolyala Panyachi Dhar

Vara Vara Gara Gara So So Sum
Dholya Dholya Dhagat Dho Dho Dhum
vij Bai Ahsi kahi Toryamadhe Khadi
Aakashyachya Pathivar Cham Cham Chadi

Khol Khol Jaminiche Ughadun Dar
Bud Bud Bedkanchi Bad Bad Phar
Dumbayala Dabkyacha Karuya Talav
Sabun Bibun Nako Thoda Chikhal Lagav

Gauravlaturkar
Friday, July 14, 2006 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्ल्यान्क कोल
हल्ली अवेळीच येतो कधी फोन कळतच नाही आणि बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलिकडे कोणी, ऐकू येत फ़क्त डोळ्यातल पाणी
कळतच नाही मलाही थोडेसे काही, मीही पुढे काही बोलतच नाही
फोनच्या तारेतुन शान्तता वाहते, खुप खुप आतून जुन काही तरी सान्गते

नदी नि शेत नि वार्याची गिरकी, दोघान्नी घेतलेली पावसाची फ़िरकी
वाळुवर काढलेली प्राण्यान्ची चित्र, तुझ्यापुढे मी तुझा खोडलेला मित्र
टपला नि खोड्या नि रुसवे नि राग, एक्दा तरी सहज म्हणुन
शहाण्यासारख वाग

हसायचे ढीगभर नि लोळून लोळून, बोलायच थोड पण घोळून घोळून
वडाच झाड नि बसायला पार, थन्डीमधे काढायची उन्हाला धार
कोफ़ीपेक्शा थोडे बोलायचे कडू, पहायचे येते का हसताना रडू
बोलायची गाणी नि तोलायची चित्रे, नुसतीच सही करून धाडायची पत्रे

क्शणान्ना द्यायची घुन्ग्रान्ची लय, प्राणान्ना यायची कवितेची सय
माणुस आहेस गलत पण बोलतोस सही, पावसामधे भिजलेली कवितान्ची वही
पुन्हा लिहिलीस का नाही, काय रे? काही आठवतय का नाही?

शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही हातसुद्धा जितका बोलत नाही..
हल्ली असा...
दोन्हीकडे अबोला आणि मध्यात कल्लोळ, छातीमधे घुसमटतात हम्बरड्यान्चे लोळ
ऐकू येतात कोन्डलेले काही श्वास फ़क्त, कोणासाठी तरी खोल दुखावलेल रक्त

गरम होतात डोळे नि थरथरतो हात, सरकन निघते क्शणान्ची कात
उलटे नि सुलटे कोसळते काही, मुक्यानेच म्हणतो.. बस आता नाही

फ़ार नाही चालतो मिनिटे अवघी तीन, तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण, डोळे झाले जुने पण पाणी नवीन
डोळे झाले जुने पण पाणी नवीन, डोळे झाले जुने पण पाणी नवीन

हल्ली अवेळीच येतो कधी फोन कळतच नाही आणि बोलतय कोण


Ddeodikar
Sunday, July 16, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanx gaurav for BLANK CALL.

Ddeodikar
Sunday, July 16, 2006 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanx to yash aslo for BLANK CALL
 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators