Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 02, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through June 02, 2006 « Previous Next »

Zakki
Thursday, April 27, 2006 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थात् माझे सगळे ज्ञान १९५९ साली मी जे शिकलो त्यावर आधारित आहे. आता जर ते अमरकोष नि पाणिनी कालबाह्य नि unacceptable ठरले असतील, तर माझे सगळेच लिखाण व्यर्थ! admin ना सांगून उडवून टाका!

Robeenhood
Friday, April 28, 2006 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भले,भले बोवाजी भले!(यालाच ते सरदारजी बल्ले बल्ले म्हणतात.)तुम्ही खाशी हाणलीत. बंगालीत भद्र लोक म्हनजे सभ्य.खानदानी लोक.म्हणून मी आपला हितगुज वरील लोकाना भद्र लोक समजत होतो.पण तुम्ही अमरकोषातील दोरीने त्याना भलत्याच दावणीला बांधलं की वो.

तात्पर्य एकाच शब्दाचे अनेक अर्थ हा काही जो घोळ भाषेच्या पेप्रात असतो त्याचे हे आविष्करण म्हणावे काय?

एनी वे पण तुमच्या पोस्टने हितगुजने एक वेगळी उंची गाठलीय यात शंका नाही. ब्राव्हो!
तुम्ही अमरसिंहाचे नाव घेतले तेव्हा मला तो समाजवादी पक्षाचा अमरसिंह आठवला!म्हटले काय हे भुतामुखी भागवत? पण पुढे उलगडा झाला.
बुलडोझर शब्दाला सरकारी भाषेत बलिवर्दसंयंत्र असा एक छान शब्द आहे.


Vaatsaru
Friday, April 28, 2006 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वश्री रॉबिनहूड आणि झक्की ह्यांचे मनोमीलन. अभूतपूर्व :-)
पण दोघांचेही विवेचन सुरेख


Limbutimbu
Friday, April 28, 2006 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा झक्की! छान विवेचन! अन अजुन लक्षात हे तुमच्या हे विशेष! पुस्तके पण बाळगुन आहात का?

Ameyadeshpande
Friday, April 28, 2006 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा झक्की ४० वर्षांपुर्वी शिकलेल्या गोष्टी इतक्या छान सांगितल्यात!
तुम्ही सांगितलेल्या त्या समानार्थी शब्दांमधल्या "शाखामृग" शब्दाचाही उल्लेख गीतरामायणात आहे... gadima.com वर गेलात तर हेही सांगितलय की गदिमांनी गीतरामायणासाठी मूळ संस्कृत रामायणाचा आधार घेतलाच होता...

वाली ला राम झाडा आडुन बाण मारतात त्यानंतर वाली त्यांना म्हणतो असा लपून बाण मारण्याचा अधर्म तुम्ही का केलात...
त्यावर रामांनी दिलेल्या उत्तरातलं हे एक कडवं आहे...

नृपति खेळती वनी मृग येते
लपुनि मारिती बाण पशू ते
दोष कासया त्या क्रिडेतें
शाखामृग तू क्रूर पशूहुन
वालीवध ना खलनिर्दालन...




Sanghamitra
Friday, April 28, 2006 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा काय मजा आली हे सगळं वाचताना.
रॉबीन, झक्की खूपच मनोरंजक आणि सुटसुटीत माहीती दिलीत.
अमेय बरोबर मला तेच विचारायचं होतं की रामाशी बेडकांची निष्ठा कसली? तशी एखादी रामायणाची उपकथा असेल तर ती कळावी असा हेतू होता. पण आता ते स्पष्टच झालं.


Upas
Thursday, May 11, 2006 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगायोग म्हणजे परवाच श्री राम रानडे यांजकडून हा एक नवीन संदर्भ कळला..
मंथरेचा मुलगा मंडूक (मंडूक म्हणजेच बेडूक.. ) मंथरा जरी रामाला वनात धाडण्यात कारणीभूत असली तरी मंडूक रामभक्त असतो.. तो मारुतीच्या पाठीवर बसून लंकेत जातो.. आणि तिथेच रहातो..
तसेच जेव्हा राम रावणावर विजय मिळवतो पण शेवटी सीतेचा त्याग करायचे ठरवतो तेव्हा मंडूक रामावर प्रचंड प्रक्षुब्ध होतो.. वाल्मिकी रामायणात मंडुकाचा उल्लेख आहे असे कळते!!


Aappa
Friday, May 19, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" नक्षत्र " या शब्दाचा अर्थ कोणी सांगेल का???
जितके जास्त अर्थ सांगाल तेवढे बरे होईल :-).


Pooh
Friday, May 19, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्षत्र म्हणजे जे कधीही आपल्या स्थानावरून हलत नाही ते. (संस्कृत मधे "न क्षरति यस्य नक्षत्र:")

Vadini
Wednesday, May 24, 2006 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nakshatra ya shabda-che taara-anek taare,soorya,moti,27 motyan-chi maal ase sandarbha-nusar badalanare vividh arth Sanskrit shabda-koshat aadhaltat.

Bee
Friday, May 26, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला १७५६ चा संदर्भ कुणी सांगू शकेल का? जसे की तुझ्यासारखे मी १७५६ बघितलेत असे आपण वाद घालताना म्हणतो. धन्यवाद!

Aj_onnet
Friday, May 26, 2006 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी १७६० हा आकडा अश्याच संदर्भात ऐकला आहे!
का प्रदेशानुसार हा आकडा बदलतो?
मलाही त्याबद्दल जाणुन घ्यायला आवडेल.


Bee
Friday, May 26, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही १७५६च आकडा आहे तो अजय.. :-)

Maudee
Friday, May 26, 2006 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण १७६० हाच आकडा ऐकला आहे....

Pha
Friday, May 26, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१७६० आणि ५६ हे वेगवेगळे दोन आकडे वेगवेगळ्या म्हणी / वाक्प्रचारांत वापरले जातात.
१. नकटीच्या लग्नाला १७६० विघ्नं.
२. 'तुमच्यासारखे ५६ लोक पाहिलेत' वगैरे वाक्यांममध्ये जिथे तुमच्यासारखे 'य' लोक पाहिलेत असं सुचवायचं असतं तेव्हा.


Asami
Friday, May 26, 2006 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नकटीच्या लग्नाला सत्राशे विघ्ने असे आहे न ते ?

Ameyadeshpande
Friday, May 26, 2006 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर आधी वाटलं इथे १८५७ चा उठाव किंवा तसं काहीतरी बोलणं चाललयं :-)

बाकी मी ही १७६० आणि ५६ हे दोनच आकडे ऐकून आहे...


Robeenhood
Saturday, May 27, 2006 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठीत 'क्ष' व्यक्ती अथवा कोणी एक सामान्य माणूस असा उल्लेख करताना अथवा उदाहरण देताना सोमाजी गोमाजी कापसे अश्या नावाचा उल्लेख असतो. ह्या सोमाजी गोमाजी कापसे चा मूळ सन्दर्भ काय आहे? विशेष म्हणजे महाराष्ट्रात हे नाव सर्वत्र वापरले जाते. निदान मागच्या पिढीत तरी. बहुधा मागच्या पिढीतील एखाद्या पाठ्य पुस्तकात त्याचा सन्दर्भ असावा...

Bee
Friday, June 02, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामसुम, सुमसाम पैकी नक्की कुठला शब्द बरोबर आहे की दोन्ही शब्द बरोबर आहेत?

मी चित्रपट बघितला किंवा मी चित्रपट पाहिला ह्या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखाच होतो. तर बघणे आणि पाहणे ह्या दोन क्रियेत नक्की फ़रक कुठे आहे?

काहीजण पाहणेला पहाणे असे म्हणतात हे चुक की बरोबर?


Chioo
Friday, June 02, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala vatate, 'baghane' mhanaje ekhadi gosht muddam jaun baghane. tyamule kahi dakhavtana aapan 'bagh' mhanato. 'paha' mhanat nahi. 'priye paha' he ganyasathi. 'priye bagh' he ganyat changale nahi vatanar. :-)

'pahane' mhanaje 'najares padane'. hi kriya muddam ghadat nahi.

aani mala 'saamsum' ha shabd jast barobar vatato aahe.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators