Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 27, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through April 27, 2006 « Previous Next »

Ameyadeshpande
Tuesday, April 25, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

robeenhood तुम्ही मराठी Ph.D आहात काय? प्रत्येक शब्दाचं मुळ माहितीये तुम्हाला!

Nitu_teen
Wednesday, April 26, 2006 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Great Robeenhood! एकदम अचुक स्पष्टीकरण.


Sanghamitra
Wednesday, April 26, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिन धन्यवाद.
बरोबर आहेत तुम्ही दिलेले दोन्ही शब्दांचे अर्थ.
पण बेडकांच्या निष्ठेचे कळले नाही.
- संघमित्रा


Milindaa
Wednesday, April 26, 2006 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय च्या श्लोकात बेडकांच्या निष्ठेबद्दल उल्लेख आहे त्यासंबंधी तो बोलतोय.

रॉबीनहूड, चांगली माहिती दिलीस.


Robeenhood
Wednesday, April 26, 2006 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी,

अमेयचा मूळ श्लोक गीतरामायणातला दिसतोय.. चु.भू.दे.घे.


Ameyadeshpande
Wednesday, April 26, 2006 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो तो गीतरामायणातला "सन्मित्र राघवांचा" हा श्लोक आहे.
बेडकाची निष्ठा असा अर्थ इथे घेतला तर का कुणास ठाऊक पण तो इथे अगदी व्यवस्थित बसतो आहे असं वाटत नाहिये. संघमित्रा तुला हेच म्हणायचं होतं का?


Robeenhood
Thursday, April 27, 2006 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युरेका! युरेका!!
(घाबरू नका, कपडे अंगावर आहेत.......)
वाल्मिकी रामायणातच पुढील उल्लेख आहे...

विदिता नौ गुणा विद्वान,सुग्रीवस्य महात्मना...
तम एव च आवाम मार्गाव: सुग्रीवम प्लवंगेश्वरम....

महान अशा आत्म्याचे,विद्वान सुग्रीवाचे सर्व गुण आपल्या दोघाना(राम आणि लक्षमण) माहीत आहेत.आम्ही देखील त्या महात्म्याच्या, मर्कटांच्या ईश्वराच्या सुग्रीवाच्या शोधात आहोत...

यावरोन प्लवंग म्हणजे माकड हेही दिसते...

गीतरामायण बहुतांशी वाल्मिकीच्या रामायनावर आधारित असल्याने हेही सुसंगत दिसते.

हनुमानाच्या अनेक नावापैकी प्लवंग गमय हे ही एक नाव आहे म्हणजे प्लवंग म्हणजे माकड हाही अर्थ आहे असे दिसते.

मात्र निष्ठा प्लवंगमांची हाशब्द मात्रा पूर्ण करण्यासाठी वापरलाय की काय कुणास ठाऊक. कारण तो निष्ठा प्लवंगांची असा पाहिजे असे मला वाटते कारण प्लवंगम हा शब्द संस्कृत अकारान्त सामन्य नाम आहे त्याला प्रत्यय जोड्ताना मराठीत आणि संकृतातही म नन्तर प्रत्यय कसा येईल?

वरील श्लोकात प्लवंगमेश्वर असा शब्द न वापरता प्लवंगेश्वर असा शब्द वापरला आहे हे या दृष्टीने महत्वाचे आहे कोणी या वर लिहू शकेल काय? विशेषता महान वैय्या करणी झक्की बाबा नागपुरी अथवा वेलणकर...
एनी वे सुसंगत अर्थ तर सापडला

प्लवंग नावाचे संवत्सरही आहे...


Ameyadeshpande
Thursday, April 27, 2006 - 1:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Robeenhood अतिशय सुरेख आणि सखोल स्पष्टीकरण दिलय तुम्ही! hats off to you!
मला ह्यातलाच आणखी एका कडव्यातला शब्द कळाला नाहिये. मतितार्थ कळू शकतो पण नक्की शब्दांचा अर्थ माहीत नाहिये.

बाहुंत राहूच्या मी निस्तेज अंशुमाली
गतराज्य लाभ होता होईन शक्तिशाली
माझेच शौर्य सांगू माझ्या मुखे कशाला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला

ह्यातला पहिल्या वाक्यामधला "अंशुमाली" म्हणजे काय? आणि "बाहूत राहूच्या मी निस्तेज अंशुमाली" ह्या वाक्याचा शब्दार्थ काय होतो सांगाल का?


Robeenhood
Thursday, April 27, 2006 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंशुमाली म्हणजे सूर्य.
राहू आणि केतू हे दोन राक्षस सूर्याला खातात.त्याला आपण ग्रहण म्हणतो. त्याचे प्रकार आहेत खग्रास म्हणजे पूर्ण खाणे. यात पूर्ण सूर्य झाकला जातो.खंडग्रास म्हणजे अंशता खाणे यात सूर्य पार्टली झाकला जातोऽर्थात विज्ञानाच्या दृष्टीने हा खेळ सावल्यांचा आहे.
पण ग्रहणाविषयीचे सर्वच शब्द खाण्याशी संबंधीत आह्त. ग्रहण,ग्रास,खग्रास,खन्डग्रास.ई

म्हणजे राहू सूर्याला खातो ही कल्पना.

आता राहूच्या बाहूत आलेला सूर्य हा निस्तेज होतोच ना म्हणजे ग्रहणाचे वेळी सूर्याचे तेज कमी होते.खग्रास ग्रहणाच्या वेळी तर काही मिनिटे अंधार पडून चांदण्याही दिसतात!

देवांनी समुद्रमन्थन केले त्यातून अनेक रत्ने निघाली त्यातले एक म्हणजे अमृत. ते प्राशन करण्यासाठी देव बसले असताना एक राक्षस सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये देवाचे रूप धारण करून बसला.सूर्याने व चंद्राने त्याला ओळखले. विष्णूने त्याचे डोके उडविले पन तोपर्यन्त त्याने थोडे अमृत प्राशन केले होते त्यामुळे तो पुढे अमर झाला.तेव्हापासून हा दैत्य सूर्य आणि चंद्राचा सूड घेण्यासाठी प्रयत्नात असतो. जवळ आल्यावर तो त्याना खाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या डोक्याला राहू तर शेपटाला केतू असे म्हणतात.
हिन्दू भविष्यशात्रानुसार राहू आणि केतू हे दोन अदृश्य ग्रह आहेत. तुम्ही पत्रिका पाहिली तर हे दोन्ही महाभाग त्यात दिसतील.त्याची फले मला माहीत नाहीत माझा त्या प्रकारावर विश्वास नाही.
अस्ट्राॅनाॅमीनुसार चंद्राचे ध्रुव उत्तर व दक्षिण याना राहू व केतू अशी नावे दिलेली आहेत


Nitu_teen
Thursday, April 27, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहूड, स्पष्टीकरण पटतयं, पण एकाच शब्दाचे बेडुक आणि माकड असे दोन अर्थ कसे असू शकतात?

Lopamudraa
Thursday, April 27, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, वा... मस्त स्प्ष्टीकरण... छान लिहिलेय... एखादे ललीत लिहिल्यासारखे...

Maitreyee
Thursday, April 27, 2006 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मला माहित नव्हते प्लवंग शब्दाबद्दल! छान महिती RH .
अमेय, त्या श्लोकात असे म्हणायचेय की राज्य गेलेला(मूळचा शक्तिशाली) सुग्रीव हा ग्रहण लागलेल्या सूर्यासारखा निस्तेज झाला होता..


Shonoo
Thursday, April 27, 2006 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपटे यांच्या संस्कृत-इंग्रजी शब्दकोषामधे विप्लव याचा अर्थ पाण्यात तरंगणारा असा दिला आहे.
काही वेळा मी त्याचा अर्थ कमळ असाही ऐकला आहे.

वा गो आपटे यांच्या मराठी विस्तारित शब्द रत्नाकर मधे प्लवंगम म्हणजे माकड असा अर्थ दिला आहे.

Interestingly संस्कृत शब्दकोषामधे प्लव, प्लवंग, प्लवंगम हे काही सापडले नाहीत.


Ameyadeshpande
Thursday, April 27, 2006 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Robeenhood धन्यवाद... तुमचं उत्तर नेहमीप्रमाणेच पुर्णत्व असलेलं आहे!
अंशुमाली म्हणजे सूर्य हे वाचल्यावर लगेचच लक्षात आला अर्थ... खरंतर अंशुमन म्हणजे पण सूर्य... आणि थोडं वाचल्यावर कळालं की अंशू म्हणजे प्रकाशरेषा आणि अंशूल म्हणजे दैदिप्यमान व्यक्तीमत्व.

हे सगळे शब्द कोणत्या तरी संस्कृत मूळ शब्दावरून निघालेत का?


Robeenhood
Thursday, April 27, 2006 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितू, एकाच शब्दाचे एकमेकाशी संबन्ध नसलेले दोन अर्थ कितीतरी ठिकाणी होतात.

उदा- गज.,पाद,कर


Maitreyee
Thursday, April 27, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नेट वर शोधल्यावर अजून एक संस्कृत शब्द्कोश सापडला :
इथे पहा
प्लव या मूळ क्रियापदाचा (संस्कृत धातू चा )अर्थ पोहणे, तरंगणे असा आहे. बेडूक, कमळ चा संदर्भ लागतो पण माकड आणि प्लव धातूचा संदर्भ कळला नाही! कदाचित तरंगणे या अर्थाने कायम उड्या मारणारे(=तरंगणारे) म्हणून की काय कुणास ठाऊक!

Gajanandesai
Thursday, April 27, 2006 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी मग मी घोटाळा करत नसलो तर- प्लवंग हे पाण्यात तरंगणार्‍या एका शेवाळाचेही नाव आहे. ते उथळ समुद्रतळाशी वाढते(तेथे सूर्यप्रकाश पोहोचणे शक्य असल्यामुळे) असे काहीसे भूगोलाच्या पुस्तकात होते(मत्स्यशेती). पण तेव्हा मला वाटायचे तो इंग्रजी शब्द आहे. CBDG

रॉबीन, होऊ दे अजून युरेका! युरेका!!


Zakki
Thursday, April 27, 2006 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री अमरसिंह यांनी अमरकोष नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. अमरकोश यास तुम्ही संस्कृतचा Thesaurus म्हणू शकता. कारण त्यात समानार्थी शब्द दिले आहेत. त्यात तृतीय कांडात २६१० नंबरच्या ओळीत म्हंटले आहे 'कपिभेकौ प्लवंगमौ' म्हणजे कपि:, भेक: नि प्लवंगम: हे समानार्थी आहेत. तसेच ९९३, ९९४ या ओळींवरून कपि:, प्लवंग: शाखामृग:, वलिमुख:, मर्कट:, वानर: इ. शब्द समानार्थी आहेत.
म्हणजे गणितात तो कुठलातरी नियम आहे ना की अ = ब नि ब = क, तर अ = क. तसे प्लवंगम म्हणजे माकड! चू. भू. द्या. घ्या.



Zakki
Thursday, April 27, 2006 - 11:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण खरी गंमत तर पुढेच आहे.
५१४ व्या ओळीत म्हंटले आहे, 'भेकेमण्डूकवर्षाभू इ.' म्हणजे भेक: मण्डूक: हे पण समानार्थी! घ्या. लावा तुमचे तर्कट, नि गणिताचे नियम, नि म्हणा प्लवंगम: म्हणजे भेक: म्हणजे बेडूक!


Zakki
Thursday, April 27, 2006 - 11:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण एकाच शब्दाचे अनेक अर्थ हे बहुधा बर्‍याच भाषांमधे असते. जसे उपरनिर्दिष्ट अमरकोषात १८२५ व्या ओळीत म्हंटले आहे, उक्षा भद्रो बलीवर्द: रुषभो वृषभो वृष:|

भद्र म्हणजे सभ्य माणूस हे आपण बर्‍याच संस्कृत पुस्तकात वाचलेच असेल, पण इथे चक्क भद्र म्हणजे उक्षा म्हणजे वृषभ म्हणजे 'बैल' असे लिहिले आहे!

उक्षा म्हणजे बैल, का? तर एका जैन साधूने त्याच्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या श्लोकात म्हंटले होते,
'लूनबालधिरप्युक्षा किं नो उत्पुच्छयतेतराम्!'

म्हणजे ज्याच्या शेपटिचा गोंडा कापलेला अहे असा बैल सुद्धा आपली शेपटी अधिकाधिक उंच करत असतो. तसा मी पण अज्ञानी, पण देवाबद्दल लिहितो आहे!

हे आमच्या पुस्तकात होते. आमच्या गुरुजींनी सांगितले की हे जर परिक्षेत आले तर खालील तळटीप लिहा:
की हा जैन साधू ग्रामीण लोकांसाठी लिहित होता. कारण सुसंस्कृत, उच्चभ्रू लोकांसाठी कालीदासाने त्याच्या पुस्तकात लिहिले होते,
'तितीर्षूर्दुस्तरम् मोहादुडुपेनास्मी सागरम्'

म्हणजे केवळ मोहात पडल्यामुळे मी दुस्तर असा सागरसुद्धा उडुप म्हणजे लहानश्या होडीतून पार तरून जाण्याची आशा करतो आहे! म्हणून मी हे माझ्या आवाक्याबाहेरचे विवेचन करतो आहे! काय पण नम्रता, नाहीतर मी! इथे एव्हढे विद्वान लोक असताना मी आपला लिहितोच आहे!






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators