Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 21, 2006

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through April 21, 2006 « Previous Next »

Maanus
Wednesday, February 15, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिमला म्हनजे काय?

बुगडी माझी सांडली ग, गाणे ऐकतोय, त्यात ती म्हनते,

पैरन फेटा अन पाठीत शिमला.

पैरन म्हनजे काय ते पन कुणी सांगीतले तर बरे होईल


Vaatsaru
Wednesday, February 15, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

to ' iXamalaa ' nasaUna ' Xaomalaa ' Asao Aaho mhNajao ÔoT\yaacao qaÜDo laÜMbaNaaro TÜk pazIvarÊ AaiNa pOrNa mhNajao ' baMDIvajaa ' XaT-.
caU. BaU. Va. Gyaa.


Bee
Thursday, February 16, 2006 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वाश्रमीचे ह्या शब्दाची फ़ोड आणि त्याचा अर्थ मला कुणी सांगेल का? धन्यवाद!

नेमस्तक, अहो हा प्रश्न अगदी depth मधे मी शब्दार्थ ह्याच बीबीवर विचारला आणि इथे बघतो तर ते पोष्ट दिसत नाही.


Gajanandesai
Thursday, February 16, 2006 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, ते Looking for या विभागात विचारले होते ना?

Bee
Thursday, February 16, 2006 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन, धन्यवाद. मला वाटले मी इथेच तो शब्द विचारला.
/hitguj/messages/35/1426.html?1140083682 इथे आहे ती लिंक. मैत्रेयीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

Mrunmayi
Friday, February 24, 2006 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला इथे १६ फ़ेब. पर्यंतचे posting दिसते आहे. पण bb तर update झालेला दिसतोय. असं का ?

Bee
Tuesday, February 28, 2006 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याकडे खारुताईवर काहीतरी खास प्रेम दिसते. बाकी इतर प्रांतात तिला गिलहरी म्हणतात. पण आपल्याकडे तिला ताई म्हणतात. ह्याची काही कथा वगैरे कुणाला माहिती आहे का? खारुताईचे खरे नाव तरी काय? माझ्या मित्राने मला आज खारुताईला पाहून विचारले तुम्ही हिला मराठीत काय म्हणता मी त्याला म्हंटले खारूदीदी आणि तो खूप हसला :-)

Moodi
Tuesday, February 28, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव जाणे!! मी तिला खारोटी, खारुटली, चावकुटी काहीही म्हणते प्रेमाने.


Dswati
Tuesday, February 28, 2006 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याकडे लहान मुलांना गोष्टी सांगताना गोष्टीतल्या पात्राला दादा , ताई , काका , मामा , आजी असे संबोधतात. उदाहरणार्थ चिऊताई, कावळेदादा, बगळेदादा. हे प्राणी वा पक्षी त्यांना माहितीचे असल्यामुळे मुलांना त्याची जवळीक वाटून, ती गोष्ट आवडीने ऐकतात. मुख्यत्: जेवताना गोष्टीत रममाण झाल्यामुळे, इकडे तिकडे पळण्याच्या आत जेवण होते. खारूताई हा त्यातलाच प्रकार असावा.

Robeenhood
Friday, March 10, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा आणि वाटसरा,
पैरण म्हणजे ग्रामीण भागातील जुन्या पद्धतीचा शर्टच.बन्डीवजा.
हा शब्द बहुधा पर्शियन आहे. मूळ शब्द आहे पैराहन. पुढे त्याचे पेहरन झाले. भान्डरकर रोड व प्रभात रोडच्या १५ व्या गल्लीच्या लिन्क मधे पेहरन नावाचे दुकानच आहे अर्थात तिथे पैरणी मिळत नाहीत ते सोड

गालिबच्या एका शेरात आहे

चिपक रहा है बदनपर लहूसे पैराहन
हमारी जेबको अब हाजते रफू क्या है....

म्हणजे माझी पैरन रक्ताने भिजून शरीराला चिकटली आहे आता त्या पैरणीच्या खिशाला रफू करायची तरी काय गरज आहे


Ahojoshi
Friday, March 31, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निमन्त्रण आणि आमन्त्रण यातिल फ़रक कोणी सागु शकेल का
धन्यवाद


Milindaa
Friday, March 31, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहोजोशी, वर जे असंख्य आर्काईव्ज दिसताहेत ना, त्यात आहे बघा... थोडं शोधावं लागेल

Bee
Friday, March 31, 2006 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यामते आमंत्रण म्हणजे बोलावणे mean an invitation आणि निमंत्रण म्हणजे विनंतीपर बोलावणे. जसे की kind request for your important presence .

Dakshina
Friday, March 31, 2006 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक समान प्रश्नं
प्रगट झाला की प्रकट झाला?



Arjun0306
Sunday, April 02, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भडभुंजा म्हणजे काय? हा शब्द बरेच दिवसात ऐकीवात आला नाही.

Hawa_hawai
Sunday, April 02, 2006 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भडभुंजा म्हणजे लाह्या, कुरमुरे बनवणारा.

Arjun0306
Sunday, April 02, 2006 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हव_हवै, धन्यवाद.म्हणजे माझ्या भावाने मायक्रोवेव्हमधे पॉप कॉर्न केले तर त्याला भडभुंजा म्हणायचे का?
गंमत म्हणून विचारले, कृपया राग मानू नये. आता मी त्याला भडभुंज्या म्हणूनच हाक मारीन.

Kandapohe
Monday, April 03, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भडभुंजा म्हणजे लाह्या, कुरमुरे बनवणारा. >>
अगदी बरोबर हवे. फरसाणाच्या दुकानातील माणुस. (आम्ही तेलकट माणसाला पण भडभुंजा म्हणतो.) :-)


Vinaydesai
Monday, April 03, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवी म्हणून वापरण्यासारखा साधा सरळ शब्द.... भाषेची कमाल


Mvdeshmukh
Friday, April 21, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"भीड" ला मराठीत प्रतीशब्द कुणाला माहीती आहे का




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators