Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Goalkonda

Hitguj » Language and Literature » पद्य » Goalkonda « Previous Next »

Goalkonda
Thursday, March 02, 2006 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकाश आज सारे बहरी फ़ुलून गेले

फ़ुल एक जे उधळ्ले
आकाश भरुन गेले
या चान्दण्या तयाच्या
आकाश दिपून गेले

मन हे विभोर झाले
पाहुन सत्य सारे
फ़ुल हे आमोल बा रे!
मन मन्दीरीच सजले

दिसती कवी किती हे
पाहुन त्रुप्ती झाली
आज या मनास माझ्या
किती भव्य स्वप्न पडले

आकाश आज सारे बहरी फ़ुलुन गेले

ग़ोलकोन्डा


Goalkonda
Sunday, March 05, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ध्यानी ना राहिले!

भंगले स्वप्न ते,मनी ना राहिले
व्यर्थची ओढ ही, ध्यानी ना राहिले धृ||

संयमा वाहिले, आणि जे पाहिले
त्याहुनी वेगळे, अनुभवि राहिले
व्यर्थ ती भावना, प्रेम ना राहिले १||

तुझी रे भावना, कोण जाणे या जगी?
स्वार्थ तो साधण्या,राह्ती ते ऊगी
संपले भंगले, राहिली राख ती
लावूनी भाळी तू, मिटवी नयन आपुले २||

गोलकोन्डा


Goalkonda
Saturday, April 29, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनंत वेगच न्यारा!

संथ धरेची संथच धारा
पान्थस्थाशी देई निवारा धृ||

अविरत वारा वहातो सारा
कुठे संथ तर कुठे भरारा
गर गर फ़िरवित अथान्ग सागर
अवनितलही उचली भराभर
संथतेशी नच देई थारा १||

संथ शान्त अशी पर्जन्याची
वृष्टी होई अती सौजन्याची
कधी येतो गर्जत अविरत तो
पूराने संसार ऊधळीतो
जीवा शीवाला नच दे थारा २||

असे चालते सृष्टीमाजी
शान्ती कधी तर क्रुरही गाजी
युग चक्राची चाके सारी
फ़िरती अविरत ना विश्रान्ती
अनंत वेगच न्यारा ३||

गोलकोन्डाGoalkonda
Thursday, May 18, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरुणा!
जीवन सर्वाचे,तू वरुणा जीवन सर्वाचे||धृ||
तृण तुझ्याविन ही मरगळ्ते
वृक्ष राई निष्पर्ण बनूनी
चराचराचे प्राण संपविते
वरुणा जीवन सर्वाचे||१||
तू जर नसता रवी तळ्पतो
ज्वाळचे जणु लोट ऊधळितो
नध्या नी नाले आटवून सारे
जलहीन सृष्टी जाळीत वारे
भष्म करी साचे, वरुणा जीवन सर्वाचे||२||
मृगजळाचे राजे चाले
रुप सृष्टीचे खलास झाले
सश्य श्यामला या धरतीचे
स्वप्न रुप भासले मनीचे
तू नसतानाचे,वरुणा जीवन सर्वाचे||३||
तू जर नसशील काही न येथे
राज्य संपले या सृष्टीचे
शुष्क धरेला म्हणण्या कोणी
'गृह एकटा ईतरावानी'
कोण जगी साचे,वरुणा जीवन सर्वाचे||४||
गोलकोन्डा
Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators