Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मनोहर सप्रे

Hitguj » Language and Literature » पद्य » मनोहर सप्रे « Previous Next »

Pkarandikar50
Saturday, February 25, 2006 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोहर सप्रे यान्ची व्यन्गचित्रकार म्हणून ओळख करून देण्याची काहीच गरज नसवी. ते एक अत्यन्त मर्मग्राही वाचक, लेखक आणि विचारवन्तहि आहेत. ते अतिशय सुन्दर गद्य लिहितात हे नागपुर कडच्या मण्डळींना माहीत असेलच कारण ते नागपुरच्या तरुण भारत मधे बर्याचदा लिहितात. त्यान्ची पत्रे अगदी सन्ग्राह्य आणि पुन:पुन्हा वाचावी अशी असतात.मला आलेल्या एका पत्रात त्यांनी काव्य प्रकाराविषयी लिहेलय.ते असे:
ज्यामुळे कविता अपरिहायअ व्हावी असे काही मोजके क्षण माझ्याही आयुष्यात येऊन गेलेत. केवळ मोहापयी यातले एक उदाहण इथे देतोय. फारा वर्षांपूर्वी माझा एक जेलर मित्र माझ्याकडे पाहुणा म्हणून यायचा होता. पण ऐनवेळी त्याचं येणं रद्द झालं. कारण नेमक्या आदल्या रात्री त्याच्या तुरुन्गातून एक कैदी पसार झाल्यान त्याला जागेवरून हलता येत नव्हतं. वास्तविक ही एक क्षुल्लक बाब पण तीनं माझ्या मनात मात्र विचारांचं मोहोळ उठवलं. बन्दिस्त कैदी मोकळा हो ऊ शकतो नि मोकळा जेलर जागेवरून हलू शकत नाही या विरोधाभासाच्या नव्या जाणिवेनं मला स्वत:भोवतीचे अदृश्य गज दिसू लागले नि मी हादरलो, शहारलो. तत्क्षणीच ओळीन्चा एक
traumatic imprint मनावर उमटला. त्या ओळी अशा:

सरळ रेषांसारखे गज आहेत पण
तुरुन्ग अलीकडे की पलीकडे
ते मात्र माहीत नाही.
तरीही-
अलिकडचे पलिकडच्यांना नि-
पलिकडचे अलिकडच्यांना
मोकळं समजतात.
खरं तर मोकळं कुणीच नाही,
आणि असतीलच तर
फक्त गजच तेवढे मोकळे आहेत.
इति मनोहर सप्रे.

बापू करन्दिकर.


Ninavi
Saturday, February 25, 2006 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!!!
धन्यवाद, बापू.


Shyamli
Sunday, February 26, 2006 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच धन्यावाद बापु....
अजुन असतिल तर टाका ना please


Pkarandikar50
Saturday, March 04, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोहर सप्र्यांच्या आणखी कविता माझ्याकडे नाहीत पण कवितेबद्दल त्यांनी केलेल एक अतिशय सुन्दर भाष्य आहे. ते अस

भाग पहिला:
एखाद-दुसर्‍या कवितेमुळे आपण कवि असल्याचा गैरसमज हो ऊन मग त्या केल्याच पाहिजेत या हट्टातून कुंथत कविता करण्यापेक्षा कविता हो ऊ देण हे खात्रीन बर! अभिव्यक्तीची आत्यंतिक निकड हे एकमेव कारक खर्‍या कवितेला पुरेस असत. म्हणूनच तुम्ही नित्य कविता लिहिता का नाही, त्या प्रसिद्धियोग्य असतात किंवा नाही, तसंच इतरांना रुचतात की नाही या सगळ्याच बाबी व्यक्तिबाह्य म्हणून गैरलागू ठरतात. याच अर्थान रिल्के हा ऑस्ट्रियन कवि म्हणतो, ' कलेच सुख इतरेजनांच्या प्रतिसादात नाही; तर ते तिच्या निर्मिती-प्रक्रियेतच दाटून असत. कलेचा आविष्कार हा आंतरिक गरजेतून होत असतो. ' या प्रमाणे उत्तेजित होण्याचे क्षण सातत्यान ज्यांच्या आयुष्यात येतात ते गिनीयस होत. आपण प्रमाणान त्यांच्यातले नसलो तरी प्रकारान असण हेहि काही कमी भाग्याच नाही.
इति मनोहर सप्रे.


Pkarandikar50
Saturday, March 04, 2006 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this messageमनोहर सप्रे: भाग दुसरा

कविता म्हणजे केवळ शब्दान्ची जडण-घडण नव्हे. तीत दडलेल्या प्रतिमा हा तिचा गाभा असतो म्हणून कवितेतल्या शब्द-प्रतिमात जर तिच्या जन्मसंदर्भांची धग जाणवून देण्याची कुवत असेल तर मात्र ते कवितेच अस्सलपण. अशी कविता केवळ शब्दात मावत नाही तसच शब्दांबरोबर संपतही नाही. केवळ कविच नव्हे तर वाचकातही स्वत:चा ट्रेल कायम राखणारी कविता हि अभिजात मानावी लागते. हे तितक्या धडपणे मला सांगता यायच नाही म्हणून यासाठी मी जी.एंचे शब्द दत्तक घेतोय. ते म्हणतात, ' मी कवितेबद्दल एक वैयक्तिक टेस्ट ठरवली आहे. कवितेचा शेवटचा शब्द आला आणि ती कविता संपली असे ज्या वेळी मला वाटते तेंव्हा ती कविता मी ताबडतोब खड्डा करून पुरून टाकतो. कविता वाचून संपल्यावर मन बावरल पाहीजे, व्यथित, व्याकूळ, तृप्त झाल पाहीजे. '
मी रॉबर्ट ग्रेव्हजची एक कविता वाचली. आगगाडीतून जात असता धडधडा निरनिराली दृश्ये डोळ्यापुढून जातात. झाडे, शेते, झोपड्या, क्षणभर मान वर करून स्थिर क्षणावरून कालप्रवाहाकडे पाहणारी माणसे इ.इ. मध्येच लखकन एक दृश्य येते, शरीर मोहरून उठते. टेकडीच्या उतारावर एक घर आहे; त्याला शोभेसे आवार आहे. दारात मलबरीचे एक झाड. त्यावेळी सार्‍या आयुष्याला कळी आल्यासारखे वाटते. बस्स. हेच आपले घर. इथे आपण राहणार, जगणार! त्या आनन्दात मन ओरडू लागते, 'अरे, गाडी थांबवा; मला इथे उतरायच आहे; मला त्या घरात जायच आहे'. पण आगगाडी निर्विकार धावते. ते क्षणस्वप्न जीवाला कायमच दुखवून नाहीसे होते. घाईने आपण पुढल्या स्टेशनवर उतरून परत येतो. त्या घराकडे हताशपणे पहातो. आपण पाहिलेल्या वेळीच जणू आपल्यासाठीच, रिकामे, वाट पहात असलेले घर दुसर्‍याचे झालेले असते! ' अलास इट इस लेट, ऑलरेडी बोल्डर टेनन्टस आर ऍट द गेट. '
बस्स. हेच फळ, हीच इतिश्री! नेहेमीची एक रुटीन कविता म्हणून मी ती वाचायला घेतली. पण सारा दिवस तीने मला त्रस्त केले. हे कुणाचे आत्मचरित्र आहे?ग्रेव्हजचे? माझे? छट. प्रत्येकाचे. (पुढे चालू)
इति मनोहर सप्रे.
बापू.


Pkarandikar50
Sunday, March 05, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मनोहर सप्रे भाग तिसरा

ग्रेव्हजला वरील ओळी कुठल्या संदर्भात नि निमित्तान सुचल्यात ते तोच जाणे पण त्यात जी.एंसारख्या एका संवेदनाशील मनाला उत्तेजित करण्याच सामर्थ्य खचितच असाव म्हणूच तर माझ्या मनात त्या वाचल्यावर इमॅजेरीचा एक ट्रेल निर्माण झाला. अस निमितमात्र होण हीच कवितेतली खरी शक्ती.
ग्रेव्हेजची कविता मी त्याच्या बोल्डर' या शब्दप्रयोगाला ठेचाळलो. वाटून गेल, ग्रेव्हजला बोल्डर अए वजी डिफरंट अदर वा अनदर असा पर्याय सहज वापरता येत असूनही त्यान हेच विशेषण वापराव ही सहज बाब नसावी. त्यातून त्याला काही वेगळच सूचित करायच असाव. हव हवस वाटणार घर, 'योगायोगान' दिसताच त्याकड आतुरतेतन धावणारा एक आणि त्याचा शोधा घेत, ठेचाळत, त्याच्या अगोदर पोचणारा दुसरा कोणी हा प्रकारभेद जक्स्टापोज करून त्याला दाखवायचा असावा. माझ्या मते, यामुळेच बोल्डनेस अभावी अकारण होणार्‍या सगळ्याच शोकांतिका,न्च प्रतिनिधित्व केल्यान ग्रेव्हजच्या त्या ओळी युनिव्हर्सल' झाल्यात.
फक्त एकाच बेंचवर एका सुन्दर कमनीय स्त्रीदेहाशेजारी एक रिकामी जागा असावी. ती पटकावण्याचा मोह होऊनही धाडस नसाव, आणि ते एकवटत असताना, नेमक्या त्या क्षणी कुणा धस्चोटान बिनधास्तपणे तिथे पोचून अन्ग सैललाव, किंवा मनोमन झुरत प्रेम करूनही ते व्यक्त करण्याच धडस न झाल्यान तिन वाट पाहून अखेर अन्य कुणाचा हात हाती घेतल्याच मागाहून कळाव. किंवा खुळा मोह टाळण्याच्या क्षणिक आनंदासाठी हातात आलेल लॉटरी तिकिट खाली टाकाव नि नेमक तेच उचलण्यार्‍याला लाखांच बक्षिस लागल्याच कळाव याला कमनशिबापेक्षाही धाडसाचा अभाव हेच कारण आहे. पण ते विसरून, दुर्दैवाचा बोल नशिबाला लावून मोकळे होणरेच बव्हंशी दिसतात. खुद्द मीहि बरेचदा हेच केलय हे मला ग्रेव्हजच्या ओळींनी उमगून दिल. किंमत मोजायला तयार नसणार्‍यांनी स्वप्न बघितली तर शोकांतिका अशा अटळ होतत, याच सार्वत्रिक भाष्य म्हणून माझ्यापरीस ग्रेव्हजच्या कवितेला मोल आहे.(समाप्त)
इति ंअनोहर सप्रे.
बापू.


Diiptie
Monday, March 06, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापु मनोहर सप्रेंचं शब्द चित्र किती खास आहे
विशेश म्हणजे शैलि अगदी समोर बसून बोलत असल्यासारखी वाटते.


Ninavi
Monday, March 06, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा! अतीशय वाचनीय आणि विचारप्रवर्तक. धन्यवाद बापू.
यांचं पुस्तक वगैरे आहे का?


Giriraj
Tuesday, March 07, 2006 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह बापू! छानच सुरवात केलीत!
अजून काहि साहित्य असेल तर टाका ना!

कविता तर अप्रतिम!

(कृपया मेल चेक करा!)
Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators