Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
धार्मिक कार्य - शंकानिरसन ...

Hitguj » Religion » धार्मिक कार्य - शंकानिरसन « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 22, 200335 11-22-03  11:38 am
Archive through June 02, 200535 06-02-05  12:30 pm
Archive through September 01, 200620 09-01-06  12:10 pm

Narayanp
Friday, September 01, 2006 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या कुटुंबात फ़क्त मुलीच आहेत, त्यांच्या माहेरी पुढे देवांचे काय होते? (हा माझ्या अजुन एका मैत्रिणीला पडलेला प्रश्न, कारण तिला भाऊ नाही, त्या दोघी बहिणी आहेत)


देवांचे काय होणार तो सर्वव्यापी आहे.
चान्दिचे देव असतील तर मुलगी सासरी घेऊन जाईल नाहीतर गन्गेत विसर्जन करेल


Narayanp
Friday, September 01, 2006 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या कुटुंबात फ़क्त मुलीच आहेत, त्यांच्या माहेरी पुढे देवांचे काय होते? (हा माझ्या अजुन एका मैत्रिणीला पडलेला प्रश्न, कारण तिला भाऊ नाही, त्या दोघी बहिणी आहेत)


देवांचे काय होणार तो सर्वव्यापी आहे.
चान्दिचे देव असतील तर मुलगी सासरी घेऊन जाईल नाहीतर गन्गेत विसर्जन करेल


Vinaydesai
Friday, September 01, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृष्ण असा लिहावा.. kRiShNa


Maneesh
Saturday, September 09, 2006 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृपया मला आपण थोडी माहीती सांगाल का? आणि त्यासाठी हा बीबी योग्य आहे का?

भरणी श्राद्ध कुणाचे व कधी घातले जाते? म्हणजे वर्ष श्राद्धा अगोदर की त्या नंतर येणार्‍या महालय श्राद्धाच्या वेळी?

तसेच जर वर्ष श्राद्धाच्या नंतर घालावयाचे असेल तर फ़क्त भरणी श्राद्धच घालतात की मृत्युच्या वेळच्या तिथीचे महालयही केले जाते?

कृपया जाणकारांनी माहीती द्यावी!

मनिष पाठक


Kandapohe
Thursday, September 14, 2006 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिकू, शक्यतो घरातील बालकृष्ण, लक्ष्मी व वडीलोपार्जीत चालत आलेली काही देव तुम्ही तिकडे घेवून जावे. इतर देव यथासांग पूजा करून नदीमधे विसर्जन केले तरी चालते.

Chiku
Friday, September 15, 2006 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांदापोहे,
तोच तर प्रश्न आहे, कुठले देव वडिलोपार्जीत आहेत हे सांगणारे मोठे कुणी नाही.


Jayvijay
Saturday, September 16, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maneesh माफ करा, मला लगेच माहिती मिळवता आली नाही, आत्ता सांगतो
व्यक्ती गेल्यानंतर प्रथम वर्ष श्राद्धाच्या आधी, दरम्यान पितृ पंधरवडा येतो, त्या वेळेस मृतकाच्या मृत्यु वेळच्या तिथी नुसार त्या तिथीला भरणी श्राद्ध करतात
हे एकदाच केले जाते
जरी हे केले तरी वर्ष श्राद्ध करावे लागते
भरणी श्राद्ध करण्या मागचा हेतू मुक्ती किंवा मोक्ष मिळण्यास वर्षश्राद्धा पर्यंत न थांबता मधेच येत असलेल्या पितृ पंधरवड्यातील तिथीचा वापर केला जातो

या व्यतिरिक्त पितृ पंधरवड्यात महालय घातले जाते.
ज्या यजमानाकडे घातले जाते त्या यजमानाच्या व त्याच्या पत्नीकडच्या मागिल सात पिढ्यांकरीता हे केले जाते.
सर्व ज्ञात पुर्वजांची नावे नात्याच्या क्रमाप्रमाणे घेवुन तर्पण केले जाते.
महालय विधीसाठीची तिथी आणि मृतकाच्या मृत्यु तिथीचा तसा फारसा संबंध नाही तर यजमान व भटजी यांचे सोईप्रमाणे तिथि, काळवेळ निवडली जाते व त्या एकाच दिवशी सर्व पितरांना तर्पण केले जाते.
मात्र दुर्दैवाने, कुणाचे भरणी श्राद्ध करण्याची वेळ आली असता नजिकच्या काळातील त्या मृतकाच्या भरणी करताच्या तिथीलाच महालयही उरकले जाते.
काहीसा अशाच प्रकारचा विधि श्रावणीच्या वेळेसही असतो
मला जेवढी मिळाली ती माहिती आपणांस सांगितली तरीही जाणकारांकडून खात्री व अधिक खुलासा करुन घ्यावा ही विनंती


Maneesh
Saturday, September 16, 2006 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद जयंत,

फ़ारच उपयुक्त व सविस्तर माहीती दीलीत त्याबद्दल पुनश्च धन्यवाद. परंतु सध्या माझ्या वाचनात आलेल्या शास्त्र काय सांगते, या पुस्तकात असे लिहीलेले आढळले की भरणी श्राद्ध हे वर्ष श्राद्धानंतर करतात. पण त्यात खुलासा केलेला नाही की वर्षश्राद्धा अगोदर प्रत्येक महीन्याला जर पक्ष श्राद्ध केले, तर भरणी श्राद्ध वर्षश्राद्धा अगोदर करता येते का?

अजुनही कुणाला याबाबत काही माहीत असेल तर जरूर जरुर कळवावे.

धन्यवाद!

मनिष पाठक


Jayvijay
Saturday, September 16, 2006 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maneesh आपण पुरविलेला तपशील लक्षात घेतला आहे.

अधिक खात्री करीता धर्मसिंधू ग्रंथामधे काय सांगितले आहे ते एक दोन दिवसात बघुन कळवितो


Jayvijay
Monday, September 18, 2006 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maneesh मी वर आधी दिलेल्या माहितीबद्दल खात्री करुन घेतली आहे व ती माहिती निर्णयसागर व धर्मसिंधू या ग्रंथांप्रमाणे बरोबर आहे.
मासिक पक्ष इच्छेनुसार करावा, बंधन नाही.
भरणि अत्यावश्यक मानले आहे. ते वर्षश्राद्धाच्या आधीच येते.
वर्षश्राद्ध देखिल आवश्यक मानले आहे.
महालय वडीलांचे मृत्युतिथीला करतात.
वडील हयात असता, आजोबांची तिथी याप्रमाणे नजिकच्या वडीलांकडील मृत पितराची तिथी घेवुन त्या तिथिला महालय करतात.
स्त्री मृत असता तिचे भरणी श्राद्ध करावे की नाही या बाबत निर्णयसागर हरकत नाही असे म्हणते तर धर्मसिंधू गरजच नाही असे म्हणते.


Moodi
Monday, September 18, 2006 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनीष तुम्हाला जयविजय यांनी बरोबर उत्तर दिलेच आहे. मी पण काल विचारले घरी तेव्हा कळले की त्याची तारीख येऊन गेलीय. ते चतुर्थीला होते. बायकांचे करीत नाहीत म्हणे. आता सर्वपित्री अमावस्या येईल तेव्हा करा.

Maneesh
Tuesday, September 19, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद जयंत व मूडीताई,

कृपया मला अहो जाहो करु नये मी आपल्यापेक्षा लहानच आहे.

जयंत तरीही अजुन एक प्रश्न हे वडीलांचे भरणी श्राद्ध, भरणीची तिथी (चतुर्थी) निघुन गेल्यामुळे ज्याप्रमाणे मूडीताईंनी सांगितले तसे अमावस्येला केलेले चालते का? किंवा दुसरा काही उपाय?

कारण मी इथे (मुंबईत) चौकशी केली तेव्हा मला काही जणांकडून वर्षश्राद्धा अगोदर व काही जणांकडून वर्षश्राद्धा नंतर करतात अशी संभ्रमात टाकणारी माहीती मिळाली व त्यामुळे भरणी श्राद्ध करावयाचे राहुन गेले. तर ते सर्वपित्री अमावस्येला केलेले चालेल का?? आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत.

मनिष पाठक


Jayvijay
Wednesday, September 20, 2006 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maneesh मुडींनी सुचविल्याप्रमाणे भरणीची तिथी होवुन गेल्यामुळे सर्वपित्रीला भरणी करावी
माझे माहितीप्रमाणे यास अन्य उपाय नाही.


Maneesh
Wednesday, September 20, 2006 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनश्च धन्यवाद जयंत!

मनिश पाठक


Manyah
Monday, November 20, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला काहि प्रश्न विचारायचे आहेत.
१. मन्गलसुत्र का घालतात त्याच्या मन्यान्चा रन्ग काला का.....
२. हिन्दु धर्मा मधे काहि जातिना मान्साहार अमान्य आहे तर काहि जातिन्ना फ़क्त शाकाहार मान्य आहे.. असे का?Aaftaab
Monday, March 26, 2007 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जावळ या विधीचा अर्थ काय?
ते कधी करावे? मूल एक वर्षाचे होण्याआधी की नंतर केले तर चालते?
यावेळी पूर्ण केस कापताना लहान बाळाला त्रास होत नाही का? थोडे शास्त्राला कापले तर चालतात का?Suniti_in
Monday, May 28, 2007 - 10:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चतुर्थी करायचे बंद करायचे असेल तर त्याचे उद्यापण करावे लागते का? ते कसे करावे कुणाला माहित आहेत का?
सिध्दिविनायकाच्या फोटो ची पूजा करताना काही शास्र पाळावे लागते का?


Zakki
Wednesday, September 05, 2007 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या शनिवारी (८ सप्टेंबरला) 'प्रदोष' आहे. 'प्रदोष' म्हणजे काय? त्या दिवशी धार्मिक कार्ये करावीत का, की नाही?

Upas
Wednesday, September 05, 2007 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रदोष तर सारखेच येत असतात.. शिवरात्र जशी प्रत्येक महिन्यात येते पण माघतली ती महाशिवरत्र तसं काहीसं..

मला वाटतं शुक्ल तसेच वद्य दोन्ही पक्षातील त्रयोदशींना प्रदोष म्हणतात.. पण वद्य पक्षातल्या त्रयोदशीला मास प्रदोष..
झक्की, प्रदोष हा शिवाराधनेचा काळ.. चांगलाच असावा!

हे बघा बरं उपयोगी पडतय का?

Vidyarthi
Thursday, September 27, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

JayVijay/Moodi,
Mhaja ek prashna aahe, Mhaji aai, 2nd nov 2006 la geli tya veli kartik dvadashi hoti(time of death)12:40, dupar .
Aata varsha shradha karaycha aahe. guruji ni sangitala aahe ki tithi pramane 21 november 2007 la he karya karava lagel. english calender pramane varsha ultun jaate, sneha chya wa natyatlya kahi vadildharya mandalicha maat aahe ki varsha shradha he 2 november chya aadhi(mhanje varsha purna whaichya aat kaarave).
gurujincha maate (aamchyakadche ashi karya karanare bhataji)Addhik mahina aalyani, he 21 november la karava lagel, tari me mhajya aaicha varsha shradha calender year pura whaichya aat karava ki shastra pramane 21 november la karava, gharat mich mhota anni chota aslyane( me ekulta ekk mulga aahe wa wadilancha nidhan adich varshya purvi zhala hota).mala nirnay ghyaila thoda t
ras hoto aahe. tari krupa karun hya waar aapla hindu shastra kai sangate te zara sangal ka....pls.

Vidyarthi

Pillu
Thursday, September 27, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहीती प्रमाणे आपल्या आईचे वर्ष श्राध्द ईंग्रजी महीन्या प्रमाणे न करता तिथी प्रमाणेच करणे उचित होईल कारण शास्त्र असे सांगते या पुस्तकात याचा स्पष्ट उल्लेख आहे.

Anamikajayraj
Saturday, December 01, 2007 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोळा सोमवार व्रताचे उद्यापन कसे करतात कोणी मला सांगू शकेल काय? येत्या सोमवारी मला या व्रताचे उद्यापन करावयाचे आहे तरी लवकरात लवकर सांगणे. या दिवशीसुध्दा पूर्ण दिवस उपवास करतात का?

Rudraksha
Thursday, May 08, 2008 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रात:संध्या कशी करावी ह्या बद्दल इंटरनेटवर कुठे माहिती आहे का?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators