Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 20, 2007

Hitguj » Religion » माझे आध्यात्मिक अनुभव » Archive through December 20, 2007 « Previous Next »

Mrdmahesh
Thursday, December 06, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या अनुमोदन.
प्रिती नामस्मरण नेटाने चालू ठेवा. तुम्ही नक्की लवकरच यातून बाहेर याल.. श्री स्वामी तुम्हाला यातून लवकर बाहेर काढो. ही श्री स्वामींचरणी प्रार्थना..
मला असं वाटतं:
आपल्या बरोबर इतर कोणी असो की नसो, परमेश्वर नेहमीच आपली साथ करतो. फक्त त्याला साद घालायचा अवकाश.. तो ही आपल्याच मन:शांती साठी.. तो आपल्याला या दु:खद प्रसंगातून व्यवस्थित बाहेर काढत असतो. फक्त आपल्याला ते कळत नसतं.. माझा पाय प्लॅस्टर मध्ये होता.. खूप दुखायचं कधी कधी.. पण आत काय चाललं होतं हे मला कुठे कळत होतं.. प्लॅस्टर काढल्यानंतर डॉक्टरांनी एक्स्-रे काढून पाहिला अन् तेच खूश झाले.. ९५% रिकव्हरी झाली होती.. परमेश्वर असंच बाहेर काढतो.. माझ्या बाबतीत ९५% झाली असेल कारण ते माझे भोग आहेत. पण सगळ्यांचच असं नसतं १००% सुद्धा होते.. प्रत्येकाला चांगल्या / वाईट भोगातून जावंच लागतं. दोन्ही प्रकारचे भोग भोगताना त्या परमेश्वराला विसरू नये.. आणि त्याला न विसरण्याचा एक साधा सोपा उपाय म्हणजे नामस्मरण!..


Ss_sandip
Saturday, December 08, 2007 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khup khup chaan vatla sakali sakali tumche saglyache anubhav vaachun,
Zakki (Kaka kinva baba) che anubhav fakta ethlech nahi purna maaybolivarche khuup chaan astat.
Divya aani Preeti, Parmeshwar aaplyala saglyanna problems sobat sahan karaychi pan shakti deto fakta aapn nemke teva aaplyamadhil tya shaktila ignore kelela asta
Aso,
Asech postat raha saglyanni aapaple anubhav.
Etarnaa tyatun prerna milte.


Divya
Saturday, December 08, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर मी लिहीलय कि मायबोलीवर अनुल्लेख केला गेला. पण त्यातही चांगली लोक आहेत ज्यांनी त्यावेळेला सामावुन घेतले. त्यात बरेच जण आहेत त्यांचे मी आभार नाही मानले तर तो कृत्घ्नपणाच होईल. पण मायबोली great आहे. एवढ्या सगळ्यांना एकत्र आणलय.

Pillu
Tuesday, December 18, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी कसे आहात सगळे

फार दिवसांनी मी इकडे येतोय

काल घेतलेला अनुभव
समर्थांच्या क्रुपेने मला शनीवारी अक्कलकोटला जाण्याचा योग आला. खरे तर मी बरेच काही ठरवुन गेलो की चान्स मिळालाच आहे तर बरीच काही सेवा करु यात. पण मी ठरवणे आणी समर्थांनी ठरवणे वेगळेच असते. मला काहीही करायला संधीच मिळाली नाही.मी हिरमुसलो पण म्हणतात ना नाईलाज को ईलाज क्या.
रस्त्याने माझ्या बरोबर असलेले एक कुटूंब ( खरे यांच्या मुळेच जायला मीळाले ) त्यांच्या पंढरपुरला जाताना किंवा तिकडे गेल्या नंतरचे आलेले वाईट अनुभव याची चर्चा चालली होती. मी ही माझा अनुभव सांगीतला सारांश अनुभव कुनाचाच चांगला नव्हता. नाही म्हणायला माझा अनुभव एकदा मात्र खुपच छान आला होता.

तर आम्ही अक्कलकोटवरुन ३ वाजता निघालो. आणी आमचा भेन्ड्या खेळाचा जोरात मुड होता मोहोळ पाशी आलो पहातो तर तिथे प्रचंड प्रमाणात ट्राफीक जाम झाले होते. किमान दिड तास आम्ही तसुभरही हाललो नव्हतो. त्याच वेळी एक ग्रुहस्थ आमच्या कडे आले ( इतके जण असताना नेमके आमच्या कडेच का आले? हे अजुन कळालेले नाही) आणी म्हणाले.तुम्ही असे करा की तुमची गाडी डाव्या बाजुने घ्या आणी. पुढे एक चौक लागेल त्याच्या ऊजव्या बाजुने जावा म्हणजे तुम्ही इंदापुरला जाताल ईकडे गर्दी जास्त नाही. आम्ही आज्ञाधारका प्रमाणे दाव्या बाजुने गाडी घातली. गाडी चालक हाही आमच्या भेंड्या मधे रंगुन गेला होता साधारण आम्ही १५ किमी गेलो असेल तरीही तो चौक काही लागेना चालक थोडासा गडबडला त्याला कळुन चुकले होते की आपण रस्ता चुकलोय तेव्हा एका माणसाला त्याने विचारले की हा रस्ता कुठे जातो आम्हाला इंदापुरला जायचे आहे तो माणुस आम्हाकडे विचित्र नजरेने पाहु लागला " अहो दादा ह्यो रस्ता ईंदापुराला न्हाई पंढरपुराकडं जातो नव्हं! मग मात्र आम्ही हादरलो कारण एक तर आम्हाला पंढरपुरला जायचे नव्हते आणी ऊशिरही खुप झाला होता त्याही पेक्ष्या आम्हाला आलेल्या वाईट अनुभवाची पुनराव्रुती करायची नव्हती. पण पंढरपुर तर ४ किमीच राहीले होते शेवटी आम्हाला या मार्गे जाण्याशिवाय पर्याय नव्हताच. चंद्रभागा नदी ओलांडली आणी नगरप्रवेष कर मागाणार्‍या माणसाने आम्हाला अडवले. आम्ही म्हाणालो बाबा आम्हाला काही तुझ्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे नाही आम्ही सरळ निघुन जाणार आहोत त्यानेही आम्हाला मग काही न बोलता सोडुन दिले. तेव्हढ्यात आमच्यातला एक जण म्हणाला अरे आपण किमान कळसाचे तरी दर्शन घेउन जाउ यात नाही तर आपले काही खरे नाही. सर्वांनी मग चालेल म्हणुन होकार भरला एका सेकंदात माझ्या डोक्यात प्रकाश पडला अरे आपला नविन ओळख झालेला भाऊ इथेच राहातो तर त्याला विचारावे का की दर्शन मिळेल का लवकर म्हणुन. लगेच त्याला फोन लावला त्यानेही सांगीतले की तुम्ही तिथे या मी तो पर्यंत व्यवस्था करतो. १० मिनिटात तो आला आणी आम्हाला पांडुरंगाचे छान दर्शन घडवले. त्याची एव्हढी ओळख होती की आम्ही देवा जवळ कहीही अडथळा न येता १५ मिनिट होतो गर्दी एव्हढी होती की आम्च्या माग्ची बाई आम्ही मधेच घुसतो आहोत हे पाहुन म्हणाली अरे बाबा आम्ही सकाळी ६ वाजल्या बिगर अनपाण्याचे हुभे हावोत अन तुम्ही काय राज्जाचे ल्योक लागुन गेलासा व्ह्यय मंधी घुसायला. खरे तर मला ही माझाच राग आला का घुसलो आपण पण हे सगळे होऊन गेले होते त्याला विलाज नव्हता
मधे १ दिवस गेला आणी आज पहाटे हा प्रसंग स्वप्नात जश्याचा तसा आला फरक एव्हढाच की रस्ता सांगणार्‍या त्या माणसाच्या जागी पांडुरंग होते आणी दर्शन घेताना पांडुरंगाच्या जागी स्वामी होते.



Ladtushar
Tuesday, December 18, 2007 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूपच छान!

|| बोला पुंडलिका वारी हरी वीठ्ठ्ल, न्यानबा तुकाराम, महाराज की जय, पांडुरंग महाराज की जय, स्वामी अक्कलकोट महाराज की जय , दत्तगुरु महाराज की जय || :-)

काही वर्षा पूर्वी माझा ही असा योग आला होता अक्कलकोटला जाण्याचा. मला मुबई वरुन अचानक बहीणीने बोलावून घेतले आम्ही चाललो आहोत तू पण चल. मी कसा तरी धावत पळत गाड़ी पकडून पुण्याला गेलो अणि तिथून लगेचच अक्कलकोटला गेलो. सर्व कही अचनाकाच! अगदी स्वमिंच्या समधिची ही सेवा घडली. अभिषेक वैगारे करून आम्ही निघालो मी काही रुपये तिथल्या पुजर्यला दिले माझ्या नातेवाईकांच्या नावाने अभिषेक करण्या साथी पण नंतर काही पत्राने अंगारा वैगारे आला नाही. असो माला समाधान मिळाले होते. तत्पुर्वी माझे अजोबा एकदा अजारी असताना स्वमिच उभे राहिले होते. तशी माझ्या अजोबंची स्वामिनवर खुप श्रद्धा, लहान पणा पासून स्वमिंच्या गोष्टी सांगत असत. ते जाऊ नाही शकले परंतु माला स्वामिनी बोलाउन घेउन सेवा करून घेतली. अशी माझी आजी मंहणते. माझ्या हातातुन प्रथमच सेवा घडल्या मुले मी तर खूपच प्रसन्न होतो . बघू अत्ता स्वामी पुन्हा कधी बोलवतात...




Preetib
Tuesday, December 18, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala pan ek anubhav share karawasa vatat aahe.

Majhi assignment sampli hoti USA madhali ani navin milat navati. Mag parat indiala yawa lagnar hota mala.
Me khup upset hote. Me roj Swamincha jap ani upasana karayache. A miracle happened, I got new assignment for the same client in USA.
Sagle chakit jhale. He swamikrupach aahe.

Kal majha ek mitra mala vicharat hota.
He sagla ashakya aahe..ani etka smooth hona mhanaje miracle. Tu kahi vachtes ka Devacha.

Me sangeetala me Swamichi upasana suru keli aahe. Teva to mhanala mag barobar...tyanchi Krupa aahe.

Jai Jai Shree Swami Samartha.

Manuswini
Wednesday, December 19, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पण स्वामी समर्थांवर खुप श्रद्धा आहे. मी रोज पूजा पाठ करत नाही.

पण एक विचारायचे होते / आहे, मला स्वामींचा एक विशिष्ट फोटो पाहीला की भास होतो की ते रागावले आहेत. तुम्हा कोणाला असे वाटलेय कधी?
specially त्यांचा बसलेला फोटो.


Ladtushar
Wednesday, December 19, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रीति, मनु.. तुमचे अनुभव ही खूपच छान आहेत!

मी पुण्यात असताना शंकर महाराज मठात जात असे, तिथेच मी meditation, ध्यान धारणा, सुदर्शन चक्र यांन बद्दल थोड़े फार शिकलो. नंतर खंड पडल्या मुले अधून मधून गेलो की माला ही फोटो पाहीला की असेच वाटायचे की स्वामी रागावाले आहेत. स्वामी हे खुप उग्र अणि क्रोधी स्वभाचेच होते असे मी एकले आहे. परन्तु भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वमिचेच मन्हणे आहे. अत्ता वेळे अभावी ते माझ्या कडून ही हे सर्व होत नाही, अणि साध्य देशा बाहेर असल्या मुले काही खुप दिवसात मठात ही गेलो नाही. पण स्मरण करत राहतो, जेव्हा जमेल तेव्हा.

Preetib
Wednesday, December 19, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manu, Tushar..
Mala hi anubhav aahe...mala pan asach bhas hoto...

Mahesh..tumhi yabddal kahi sangu shakal ka..


Divya
Wednesday, December 19, 2007 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, हसराच फ़ोटो बघायचा स्वामींचा.
आमच्या घराजवळच्या मठात स्वामींचे प्रसन्न चेहर्याचे मोठे तैलचित्र आहे. त्यातले स्वामी आणि या विकतच्या फ़ोटोंमधले स्वामी खुप वेगळे दिसतात. माझी मैत्रीण खुप भक्त होती त्यांची, तिने मात्र तसाच फ़ोटो घरात ही ठेवला होता. फ़ोटों मधे सुद्धा फ़रक असु शकतो का?


Mrdmahesh
Wednesday, December 19, 2007 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-)
बर्‍याच जणांना स्वामी रागावलेले आहेत असे वाटते परंतु ते तसे नाहीत.. आपण कसं कपाळावर आठ्या आणून पहातो (विशेषत: उन्हात) तसाच हा प्रकार आहे. आणि एका चित्रावरून दुसरे चित्र, त्यावरून तिसरे चित्र असं करत गेल्यामुळे मूळ स्वरूपात असा बदल घडत गेला की "स्वामी रागावलेले दिसतात" असे त्याचे रूप झाले. आणि त्याला स्वामींच्या स्वभावाची जोड मिळाली आणि सगळ्यांना वाटू लागले की स्वामी रागावलेले दिसत आहेत.. प्रत्यक्षात तसं नाहीये.. श्री स्वामी अतिशय स्वच्छंदी, लहरी होते, फटकून वागत. त्यांची नजरही भेदक होती. (अर्थात त्यांनी हे सोंग मुद्दाम केले होते. हेतू हा की लोकांनी आपल्या कच्छपि न लागता नामसाधना करावी, तिकडे जास्त लक्ष द्यावे. आणि त्याही परिस्थितीत कोणी भक्त त्यांची सेवा करत असे तर मग ते त्याच्यासाठी मेणाहून मऊ असायचे. श्री गोंदवलेकर महाराजांचे गुरु श्री तुकामाई तर अशा वेषात गावभर हिंडत की त्यांना सगळा गाव "येडा तुक्या" म्हणत असे. त्यातलाच हा प्रकार.). मला स्वत:ला श्री स्वामी कधीच रागावलेले दिसले नाहीत.. उलट असं वाटतं की कपाळाला आठ्या आणून बारीक नजरेने ते माझ्याकडे बघत मला विचारत आहेत "का रे बाबा छान चाल्लंय ना तुझं? काही त्रास तर नाही ना तुला?" (आपणही बर्‍याच वेळा असं कुणा कुणाला विचारत असतो. आठवून पहा. :-)).
या सगळ्या विभूतिंचा सिद्धांत असा आहे की:
चमत्कार केले की लोक गोळा होतात. मग प्रत्येक जण आपापल्या ऐहिक सुखासाठी, सांसारिक दु:खे नष्ट करण्यासाठी त्यांची सेवा, मनधरणी करतात जे की यांना टाळता येत नाही. ते त्यांना पूर्ण करणे भाग पडते. परंतु काही दु:खे अशी असतात की जे त्यांचे भोग असतात ते भोगूनच पूर्ण करायचे असतात. अशावेळी या विभूती त्यात हस्तक्षेप करत नाहीत. पण हे त्या लोकांना सांगूनही कळत नाही. अशावेळी लोकांपासून फटकून रहाणे, विचित्रासारखे वागणे जेणेकरून लोक आपल्याकडे निव्वळ प्रश्न सोडवण्यासाठी येणार नाहीत. ज्याला आपली सांसारिक दु:खे सोसून, खरंच परमार्थ साधायचा असतो तो बरोब्बर यांना धरून रहातो, सेवा करतो, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालतो (अर्थात हे खूप अवघड आहे), असं करून या विभूतिंना प्रसन्न करून घेतो आणि हेच खरं या विभूतिंना लोकांकडून अपेक्षित असतं.


Mrdmahesh
Wednesday, December 19, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, प्रीती,
असा फोटो (खरंतर चित्र) जर तुम्ही पाहिला तर तो फोटोतला दोष आहे असं समजून चाला. श्री स्वामींचे हा ओरिजिनल b/w फोटो पहाल तर तुम्हाला हे पटेल.




Preetib
Wednesday, December 19, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mahesh..
Thanks for this photo.

Mrdmahesh
Wednesday, December 19, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा आणखी एक... मी काढलेला फोटो.. यात कसे सुंदर दिसतात स्वामी! :-)


Ladtushar
Wednesday, December 19, 2007 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो खरच की महेश, किती छान मुद्रा आहे स्वमिंची या फोटो मधे. सेव्ह करून घेतला. :-)
आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.

Mrdmahesh
Wednesday, December 19, 2007 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद प्रीती, तुषार. असेच इथे येत रहा.. आपले अनुभव सांगत रहा.. जेणेकडून मला आणि इतरांना ही वेळोवेळी स्फूर्ति मिळत राहील. :-)

Zakasrao
Wednesday, December 19, 2007 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश तो ओरिजिनल ब्लॅक व्हाइट फ़ोटो कुठून मिळवलास??
बराच फ़रक दिसतो की सध्या मिळणार्‍या फ़ोटॉत आणि त्यात. :-)
तु काढलेला फ़ोटॉ कुठे काढलाय??
अक्कलकोटला का??



Manuswini
Wednesday, December 19, 2007 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेजजी, हाच तर फोटो आहे माझ्याकडे.(अगदी शेवटची पोस्ट आहे ना तो फोटो झाडाखाली बसलेला).
मी चरित्रात वाचलेले की स्वामींचा स्वभाव उग्र आहे म्हणून.

माझी आई सांगते, तसे काही मनात आणु नकोस जेव्हा मी माझे फ़ीलींग्स आईला सांगीतले.
मग माझा तो भास असेल. उगाच माझ्या मनात guilty feeling असेल की का ग इतके दिवस आलीस नाही नी आता त्रास आहे म्हणून आलीस ना असे काही?

तुम्ही तो दादरचा मठ पाहीला आहे?


Mrdmahesh
Thursday, December 20, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|| श्री स्वामी समर्थ ||
झकास, मनुस्विनी,
तो ओरिजिनल b/w फोटो आणि इतर ओरिजिनल फोटो तुम्हाला
श्री स्वामी समर्थ या लिंकवर पहायला मिळतील.
मी काढलेला दुसरा फोटो कोणत्यातरी मठातला आहे. मला नक्की आठवत नाहीये. आणि मी दादरच्या मठात गेलेलो नाहिये अजून.
मला असं वाटतं की ही श्री स्वामींबद्दलची चर्चा आपण "धार्मिक:व्यक्ती:श्री स्वामी समर्थ" या BB वर करूया का? कारण तिथे ही चर्चा करणे उचित होईल.
माझी मॉडरेटर्सना विनंती आहे की माझे श्री स्वामींचे फोटो असलेले मेसेजेस "धार्मिक:व्यक्ती:श्री स्वामी समर्थ" या BB वर हलवावेत. चर्चेच्या ओघात मी इथे पोस्ट केले.
काय मंडळी? तुम्हाला काय वाटतं?
आणि मनुस्विनी, मला जी वगैरे म्हणू नका.. अवघडल्यासारखं होतं :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators