Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 21, 2007

Hitguj » Religion » General » Archive through June 21, 2007 « Previous Next »

Moodi
Monday, May 29, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की माहिती नाही हो जास्त काही. पण जे तुम्हाला गाढव म्हणतात, त्यांच्याकडे कशाला लक्ष देता? नाहीतर तुम्ही पण सेरास सवासेर का होत नाही? समोरचा फांदीवर बसला असेल तर आपण पानात दडुन त्याला भॉक करावे. म्हणजे तू डाल डाल मै पात पात...

Soultrip
Thursday, June 01, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अष्टविनायकाची tour करण्यासाठी प्रसन्न travels शिवाय दुसरे कोठले options (I mean, Volvo/Neeta/Metrolink bus etc. departing from Pune) आहेत काय?

Maudee
Tuesday, August 08, 2006 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे कुठे लिहायच हे न कळल्याने इथे लिहित्येय.

कोणि मला "असतो मा सद्गमय" चा पुर्ण श्लोक आणि अर्थ सान्गू शकते का??


Meenu
Tuesday, August 08, 2006 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maudee मला पुर्ण नाही माहीती बहुधा पण तो श्लोक येतो तेवढा लिहीते

असतो मा सद्गमय | तमसो मा ज्योतीर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |

साधारण अर्थ असा आहे .. मला असत्याकडुन सत्याकडे, अंधाराकडुन प्रकाशाकडे, मृत्यु कडुन अमृतत्वाकडे ने .. अशी प्रार्थना आहे

हे बहुतेक अपुर्ण आहे. अजुन एक चरण असावा. अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यया अमृतं अश्नुते | हा आहे की काय कोण जाणे याचाच पुढचा चरण. म्हणजे अवीद्या अज्ञान हा मृत्यु व विद्या हेच अमृत आहे.


Madhavm
Tuesday, August 22, 2006 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी मला 'धूप दीप झाला आता कर्पूर आरती" ही आरती पूर्ण सांगू शकेल का?

Yedaa
Tuesday, August 22, 2006 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'तमसो मा...' च अर्थ मिनू ने वर दिलाच आहे. तरीही.....
संस्कृत श्लोकांसाठी हा
blog बघा
http://samskrtam.wordpress.com

ह्याच लेखकाचा http://learnsanskrit.wordpress.com/
म्हणून पण एक blog आहे.
very nice resource !!

Prashantnk
Wednesday, August 23, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्पूर आरती--

धूप दीप झाला आता कर्पूर आरती/
रामा कर्पूर आरती/
सहस्त्र सिंहासनी बैसले जानकीपती/
बैसले अयोध्यानृपती//ध्रु.//
कर्पूरवडीसम मानस माझे निर्मळ राहू दे/
रामा निर्मळ राहू दे/
कर्पूरवडीचा भावभक्तिचा सुगंध वाहू दे/
रामा सुगंध वाहू दे/
कर्पूरवडीची लावून ज्योत, पाहीन तव मूर्ति/
रामा पाहीन तव मूर्ति/
सहस्त्र सिंहासनी बैसले जानकीपती/
बैसले अयोध्यानृपती//१//
ध्यान कळेना,ज्ञान कळेना ना कळे काही/
रामा ना कळे काही/
शब्दरूपी गुंफ़ुनि माला वाहतो पायी/
रामा वाहतो पायी/
मुखी नाम, नेत्री ध्यान, हृदयी तव मूर्ति/
रामा हृदयी तव मूर्ति/
सहस्त्र सिंहासनी बैसले जानकीपती/
बैसले अयोध्यानृपती//२//

कर्पूरगौरं करुणावतारं,
संसारसारं भुजगेन्द्रहारम्/
सदावसन्तं हृदयारविन्दे,
भवं भवानीसहितं नमामि//
कर्पूरारार्तिक्यदीपं समर्पयामि//


Madhavm
Wednesday, August 23, 2006 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशान्त, अनेक अनेक धन्यवाद. मला ही आरती कधीची हवी होती. खूप आधी ऐकली होती पण तेंव्हा लिहायची राहून गेली होती. आज तुमच्याकडून मिळाली.

Aditiabhay
Wednesday, August 23, 2006 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्यसने मित्र परिक्षा शूर परिक्षा रणान्गणे भवती
विनये भ्रुत्य परिक्षा दान परिक्षाच दुर्भिक्षे


Aditiabhay
Wednesday, August 23, 2006 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार झक्की साहेब, आता आपली प्रक्रुती कशी आहे? बरेच दिवस झाले आपली भेट होउन, नाही? प्रशान्त, आपण दिलेल्या आरती बद्दल आणि त्याची मागणी केलेल्यांना सुद्धा शतश: धन्यवाद. - अदिती

Zakki
Thursday, August 24, 2006 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार अदिति अभय. माझी प्रकृति उत्तम! धन्यवाद. तुम्ही कसे आहात?

सध्या नामस्मरण चालू आहे. अजून बाकी काही नाही. मूळच्या आळशी स्वभावाला कर्मकांडे करणे जमत नाही. त्यापेक्षा हा मार्ग सोपा.


Prajakta_amogh
Thursday, August 24, 2006 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I m in Germany Frankfurt .Pls guide me if I will not get 'WALU' then shall I take regular Mahadev Pinda for pooja fro Hartalika?


Limbutimbu
Wednesday, November 01, 2006 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रविवार, सुर्याचा वार
सोमवार, शिवाचा वार
मन्गळवार देवीचा वार
गुरुवार, दत्ताचा वार
शुक्रवार, लक्षुमीचा वार
शनीवार, मारुतीचा वार
रहातो बुधवार!
बुधवारी कोणती देव देवता पुजतात / भजतात?
:-)

Nalini
Wednesday, November 01, 2006 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वार       नक्षत्र      देवासाठी अर्पण
सोमवार    चंद्र      शिव
मंगळवार   मंगळ    गणपती
बुधवार     बुध      कृष्ण
गुरुवार    गुरु      श्री दत्त गुरु
शुक्रवार    शुक्र     लक्ष्मी
शनिवार   शनि     हनुमान
रविवार    सुर्य     सुर्य

Puneri_njkar
Thursday, December 28, 2006 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

NJ मधे कुठे दुर्वा मिळतात का? मिळत असतील तर कुठे?

Gurudasb
Thursday, December 28, 2006 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एडिसन मध्ये बुटाला यांचे शॉपमध्ये चौकशी करणे .

Sheshhnag
Friday, December 29, 2006 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nalini....
वार नक्षत्र देवासाठी अर्पण
सोमवार चंद्र शिव
मंगळवार मंगळ गणपती
बुधवार बुध कृष्ण
गुरुवार गुरु श्री दत्त गुरु
शुक्रवार शुक्र लक्ष्मी
शनिवार शनि हनुमान
रविवार सुर्य सुर्य

थोडीशी दुरुस्ती...
चंद्रादि हे नक्षत्र नाहीत, ग्रह आहेत.
मंगळवार गणपती तसेच देवीचाही दिवस मानतात.
बुधवारी श्रीकृष्णाच्या पांडुरंगादि अवतारांचा दिवस मानला जातो.
शनिवारी हनुमान आणि शनिचा दिवस मानतात.
रविवार सूर्य तसेच खंडोबाचाही दिवस मानतात.


Aschig
Tuesday, June 12, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

There is a state of mind, known to religious men, but to no others, in which
the will to assert ourselves and hold our own has been displaced by a
willingness to close our mouths and be as nothing in the floods and
waterspouts of God. In this state of mind, what we most dreaded has become the
habitation of our safety, and the hour of our moral death has turned into our
spiritual birthday. The time for tension in our soul is over, and that of
happy relaxation, of calm deep breathing, of an eternal present, with no
discordant future to be anxious about, has arrived.

William James,
The varieties of religious experience, Chapter 2


Aschig
Wednesday, June 20, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.economist.com/daily/columns/greenview/displaystory.cfm?story_id=9354014

Cremating in an environment-friendly way

Of course, donating your body and not burning it is the best.


Saurabh
Thursday, June 21, 2007 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

it is interesting that in delhi, this system is almost exlcusively used for cremating 'unclaimed' corpses! why not use electric/gas crematoriums for 'unclaimed'?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators