Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 17, 2007

Hitguj » Religion » माझे आध्यात्मिक अनुभव » Archive through October 17, 2007 « Previous Next »

Maudee
Tuesday, May 15, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा.. ख़ूप दिवसानी आलेय इथे.. आणि एका ख़ूपच गहिर्‍या विषयावर चर्चा चालू आहे.... मी संPउर्ण वाचले नाही पण वाचेन....
प्रशान्त नेहेमीप्रमाणे तुझे विवेचन छानच...

जाता जाता... मला तुम्हा सर्वाना सांगायला आनंद होत आहे की मी स्वामीकृपेने 4 april ला कन्यारत्नास जन्म दिला:-)


Ybelgaonkar
Wednesday, May 16, 2007 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाम्स्मरण आणि प्रतिमा ह्या दोन्ही गोष्टी साधन आहेत साध्य नाही. विश्वास ही एकच गोष्ट मार्ग दाखवु शकते.

Pillu
Thursday, May 17, 2007 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ
सर्व स्वामी भक्तांनी आज पासुन जपास सुरवात केली असेल अशी आशा बाळगतो.कुणाला काही या जपा बद्दल काही माहिती हवी असल्यास क्रुपया संपर्क साधावा हि नम्र विनंती

माऊडी हार्दिक अभिनंदन तुझ्या कन्येबद्दल ऐकले आहे. म्हणतात ना शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी. तर या गोमटीला आमच्या हार्दिक शुभेच्छा


Ybelgaonkar
Thursday, May 17, 2007 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कर पिल्लु

मल ह्या जपा बद्दल थोडेशी माहिती द्याल का नेमका जप कुथला ते सान्गाल का कि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हस जप चालेल


Pillu
Friday, May 18, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ
नमस्कार श्री बेळगावकर
जप ह फक्त श्री स्वामी समर्थ असाच करवयाचा आहे. आणि तो मज कडे दि.९ जुन पर्यंत पोहोचला पाहिजे. मेल नाही करता आली तर मला मोबाईलवर कळवावा.
या जपाची संख्या जास्त असल्यामुळे जेव्हढे म्हणुन स्वामी भक्तांना या सेवेत सहभागी होता येईल त्या सर्वांचे स्वागतच असेल.म्हणुन सर्व स्वामीभक्तांना कळविल्यास उत्तम


Chinya1985
Saturday, June 02, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एका प्रदर्शनासाठी गंगा देविचे फ़ोटो हवे आहेत. त्यामधे गंगा कमळावर किन्वा मगरीवर बसलेली हवी आहे.फ़ोटो high resolution चा असल्यास जास्त बरे. आपल्याकडे असल्यास पाठवावेत अथवा internet वरिल link द्यावी्ए फ़ोटो २-३ दिवसात मिळाल्यास बरे होइल. plz help
ए मैल करा-
chinya1985@rediffmail.com


Mrdmahesh
Tuesday, June 05, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,
आज बर्‍याच दिवसांनी इथे यायला जमलं.. खूप काम आहे म्हणून यायला जमत नाहीये :-(
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत गेलो असता, तिथे तुकोबारायांच्या खालील ओळी वाचायला मिळाल्या.. कुणी निरुपण करेल का? प्रशांत??

झाला प्रेतरूप शरीराचा भाव
लक्षियेला ठाव स्मशानीचा || १||
रडती रात्रंदिवस कामक्रोध माय
म्हणती हाय हाय यमधर्म || २||
वैराग्याच्या शेणी लागल्या शरिरा
ज्ञानाग्नी लागला ब्रम्हत्वेसी || ३||
फिरविला घट फोडिला चरणी
महावाक्य ध्वनी बोंब झाली || ४||
दिली तिळांजुळी कुलनामरूपासि
शरीर ज्याचे त्यासी समर्पिले || ५||
तुका म्हणे रक्षा झाली आपोआप
उजळिला दीप गुरुकृपा || ६||

यातली पाचवी ओवी खूपच भावस्पर्शी आहे. वाचताना अंगावर काटाच आला....


Pillu
Tuesday, June 05, 2007 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

नमस्कार स्वामी भक्तगण हो. मागे मी या सदरात स्वामी नाम जपा बद्दल विनंती केली होती त्या प्रमाणे ९ जुन हि तारीख जवळ आली आहे क्रुपया आपला जप मला माझ्या मोबाईल वर अथवा ई मेल वर कळवावा हि पुनश्च विनंती


Prashantnk
Thursday, June 07, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्गंधा, माउडी,
हार्दिक अभिनंदन!


Prashantnk
Thursday, June 07, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश,
संतश्रेष्ठ श्रीतुकाराममहाराजांचा वरील अभंग अभ्यासताना खालील संदर्भ पहाता येतील,

१)महावाक्य-

अ) प्रज्ञानं-ब्रह्म (ऋग्वेद),
आ) अहं-ब्रह्मास्मि (यजुर्वेद),
इ) तत्वमसि (सामवेद),
ई) अयमात्मा-ब्रह्म (अथर्ववेद).

२)ध्वनी- मूळ प्रणव, ॐ कार.

३) षड्रिपु- काम,क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर.

४) शरीर, घट (पिण्डदेह)- स्थूल,सूक्ष्म(लिंग),कारण(पर),महाकारण.

५) ज्ञानाग्नी लागला,उजळिला दीप - म्हणजेच 'आत्मज्ञान' झाले.

श्रीतुकारामांची 'आत्मज्ञान' प्राप्तिनंतरची 'नेमकी' अनुभुती-अवस्था, या अभंगात व्यक्त झालेली आहे.


Mrdmahesh
Thursday, June 14, 2007 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद प्रशांत :-)
सुंदर विवेचन.


Mrudgandha6
Tuesday, July 03, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


नमस्कार.कसे आहत सगळे? माफ़ करा काहि दिवस भेटीला नाहि येउ शकले.माझे लग्न झाल्याचे धनुदादांनी सांगितलेच आहे.माझा pc बन्द असल्यामुळे मला तुम्हा सर्वांना निमत्रन देण्याची इच्छा असूनहि निरोप देता आला नाहि. phone no. ही नव्हते.तुम्ही मला माफ़ कराल याची खात्रि आहे.बरेच काहि लिहिलेले दिसतेय.खूप छान वातले आज इथे येवुन.गडबडीत आहे. निवांत भेटेन. :-)
}

Mrdmahesh
Thursday, July 05, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्गंधा,
परत एकदा हार्दिक अभिनंदन... मध्यंतरीच्या काळातले काही अनुभव? आता इथे येत रहाशीलच यात शंकाच नाही.
आज थोडा वेळ मिळाला आहे तेव्हा मला फेब्रुवारी महिन्यात आलेला अनुभव सांगतो...
आम्ही काही मंडळी मिळून आपापल्या गाड्या घेऊन श्री क्षेत्र गोंदवले येथे गेलो होतो. तिथे १ दिवस मुक्काम करून सगळे परत निघालो. रणरणत्या उन्हाची दुपारची वेळ होती. आमची एक गाडी पुढे गेली होती, एक मागून येत होती. प्रवास छान चालला होता गोंदवल्या पासून २० किमी पुढे आलो होतो. पण इतक्यात थोडा खराब रस्ता लागला आणि काही कळायच्या आत गाडी पंक्चर झाली. निश्चिंत मनाने गाडी कडेला घेतली आणि स्टेपनी काढली पहातो तर काय स्टेपनीत हवाच नव्हती. त्यामुळे माझ्या निश्चिंतपणातलीही हवा गेली. माझी सेकंडहॅंड अल्टो होती कशीबशी चालायची. तेवढ्यात मागून येणारी गाडी पण आली. ती सॅंट्रो होती. त्यातली मंडळी पण बाहेर आली. त्यांनी पाहिलं आणि ते आमच्याबरोबरच मदती साठी थांबले. सॅंट्रोतल्या मित्राच्या मदतीने गाडीचे चाक काढले. विचार असा होता की सॅंट्रो घेऊन परत गोंदवल्याला जावे पंक्चर काढावे अन् परत यावे. पण अडचण अशी होती की एवढ्या उन्हात अशा निर्मनुष्य जागी बरोबर असलेल्या महिलांना एकटं सोडून जाणं शक्य नव्हतं. बरं कोणी दुसरं वाहनही येताना दिसेना. काय करावं समजत नव्हतं. नुसतीच चर्चा चालू होती. आम्ही मनात श्री स्वामींचं (स्वामी समर्थ) नामस्मरण करत होतो. तेवढ्यावेळात माझ्या सॅंट्रोवाल्या मित्राला कल्पना सुचली तो म्हणाला आपण सॅंट्रोची स्टेपनी लागते का ते पाहू.... झालं लगेच त्याची स्टेपनी काढली अन् अल्टोला लावू लागलो.. ती नीट बसेना.. परत स्वामींच नाव घेतलं अन् काय आश्चर्य, ती खटकन चपखल बसली. सॅंट्रो चं चाक लावून गाडी थोडी फिरवली (टेस्ट केली). अन् ते चाक लावून पुढे ४० किमी गाडी चालवली. तिथल्या गावात पंक्चर काढले स्टेपनीत हवा भरली. मस्त चहा पिऊन पुण्याकडे रवाना झालो.
आमच्यातल्या कोणालाही हे माहित नव्हतं की असं सॅंट्रो चं चाक अल्टोला लागतं म्हणून. पण केवळ सद्गुरुंवरच्या श्रद्धेने आणि कृपेने आम्हाला मार्ग गवसला.
त्याच महिन्यात श्री सद्गुरु कृपेनेच या गाडीला चांगली किंमत आली आणि मी नवी गाडी घेऊ शकलो..


Mrudgandha6
Sunday, July 15, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे गायब झाले सगळे जण?

Pillu
Monday, July 16, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ
गायब वगैरे काही नाही बहुतेक सर्वांना पुश करनारे कुनी हवे असावेत. असो तुझा अनुभव छानच होता मी पण आज दुपारी थोडावेळ मिळाला की माझा कालचा माळशेज घाटातला अनुभव लिहिन.


Maudee
Wednesday, July 18, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. .. मृद्गंधा अभिनंदन....

Mandarp
Thursday, July 19, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो,

अश्या लोकांपासून सावध रहा.
स्वामींचे नाव वापरुन कसे फसवतात हे लोक ते पहा.


http://www.esakal.com/esakal/07192007/Pune72937D8C85.htm


Mrdmahesh
Thursday, July 19, 2007 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बाईला श्री स्वामी नक्कीच "पाहून" घेतील यात शंकाच नाही.
धनंजय,
तुमच्या माळशेज घाटातल्या अनुभवाची वाट पहातोय.
मागच्या गुरुवारचा एक अनुभव सांगतो
आमच्या मठात मी आरतीला गेलो होतो. आरती संपली होती आणि गुरुपादुकाष्टक, मंत्रपुष्पांजली इ. चालू होते. मी डोळे मिटून बसलो अन् थोड्याच वेळात मला भगवान शंकराची मोठी पिंड दिसू लागली. तीवर दुधाचा अभिषेक चालू आहे असे दिसले. दूध अगदी भरभरून पडत होते. ते पहाण्यात इतका दंग झालो होतो की अक्षता वहायची वेळ कधी झाली ते कळालेच नाही. बाजूच्या काकांनी मला हात लावून हलवले तेव्हा मी भानावर आलो. मला जे दिसले ते महत्वाचे नाही. तेवढ्यावेळात माझं मन पूर्णपणे पिंडीवर एकाग्र झाला होतं हे महत्वाचे वाटते. थोडी अधिक चौकशी केल्यावर असं कळालं की त्यादिवशी प्रदोष होता आणि प्रदोषाच्या दिवशी श्री शंकराची आराधना करावी असं म्हणतात...


Pillu
Thursday, August 16, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

पुण्यातील सर्व स्वामी भक्तांना विनम्र विनंती

रविवार दिनांक १९ ८२००७ रोजी मांजरी येथिल मठात श्रावण मासानिमीत्त श्री स्वामींचरणी सव्वा लाख तुळ्सीदल वाहण्याचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. ज्या कुणा स्वामीभक्तांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यानी ९८२२६१४९५० या मोबाईल वर संपर्क करावा.

वेळ आहे सकाळी ८.३० ते दुपारी १२.३०


Pillu
Wednesday, October 17, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

काय हे कुठे आहेत सगळे माझ्या सहित सर्वांनी या बी बी वर येणे बंद केले आहे काय

असो मी तरी सुरुवात करतो.

रफीक शेख वय वर्ष २९ रा. महादेव नगर मांजरी, नुकतेच म्हणजे वर्षापुर्वी लग्न झालेल याची ही कहाणी आहे.


खरे तर मला माहित नाही पण लक्षात यायला परवाची ईद उजाडली. याची पत्नी ( नाव माहित नाही ) स्वामींच्या मंदिरात किती दिवसांपासुन येत होती हे ही माहित नाही. ईदच्या दिवशी ही एका ताटात लाडू, एका ताटात पेढे, वगैरे बरेच जिन्नस घेउन मंदिरात आली. एक सुंदर शाल ही सोबत होती. माझे सप्तशतीचे पठण चालु होते. या वेळीच " काका हे घ्या आणी माझ्या अब्बांना चढवा ( ती स्वामींना अब्बा म्हणत होती ) मी तर दचकलोच कारण मुस्लीम स्त्री आणी ती ही मंदिरात हे अनपेक्षित होते. मी तिला खुणेनेच थांब म्हणालो पठण संपल्या नंतर मी हे काय आणी कश्या करता आहे हे विचारले ती म्हणाली काका ये मेरा मर्द है. इसके वजहसे ये सब कुछ है. " मग तिने सविस्तर सांगण्यास सुर्वात केली. मझा नवरा गेली सहा महिन्या पासुन बेपत्ता होता बरेच प्रयत्न करुन ही तो सापडला नव्हता पण मला एकाने सांगीतले की तु स्वामींकडे जा. ते तुला नक्की मदत करतील पण मी तयार नव्हते कारण आमच्या समाजाच्या हे विरुध्द हे होते, पण मी मझ्या सासुला विश्वासात घेउन एथे येउ लागले मला ईथे काय करतात हे माहीत नही पण मी फक्त अब्बाना विनंती करायचे त्यांच्यावर पुर्ण विश्वाश टाकुन मी जात असे. आनी नेमका गुरुवारी माझा नवरा सहा महिन्यांनी परत आला. म्हणुन हे मझ्या अब्बांना हि त्यांच्या लेकरा कडुन भेट द्यायची आहे. नाही म्हणु नका मी यात शिरखुर्मा पन आणला आहे आणि अंघोळ करुन कुणाला न शिवता मी हे केले आहे

मी तिच्या डोळ्यातले भाव पाहुन नाही म्हणणे शक्यच नव्ह्ते. ती सर्व ताटे मी घेतली आणि स्वामींना अर्पण केली. माझ्या पत्नीचा विरोध असतांनाही. नंतर मी तिच्या नवर्‍या कडे वळालो आणि विचारले का रे बाबा कुठे होता तु सहा महिने त्यानी सांगीतलेली कहाणी ऐकुन तर मी सर्दच झालो.

त्याच्या वर येका मराठी स्त्रीचे एकतर्फी प्रेम होते हा तिला बधत नाही म्हणल्या नंतर त्या बाईने याला काहीतरी वस्तु खाण्यातुन दिली ( अर्था हे मागुन माहीत पडले ) आणी हा पठ्ठ्या हैदरबाद मधे तिच्या बरोबर राहु लाग़ला. याला घराची अजीबात आठ्वण येत नसे. एकदिवास एक फकीर याला काठीनी मारु लागला आनी हरामखोर ईधरकु आके बैठा है. आउर मेरी बेटी को छोडके ईधरकु मजा मारता है चल घर चल, हे तो फकीर ८ दिवस त्यला मारुन सांगायचा पण याच्या डोकात काही शिरतच नव्हते शेवटी त्या फकीराने त्याला बेदम चोपले त्या माराने तो बेशुद्ध पडला आणि जेव्हा तो सुद्धीवर आला तेव्हा त्याला घरा कडील सर्व आठवले. खुप भांडण करुन तेथुन निघुन तो पुन्हा आपल्या घरी आला आणि जेंव्हा तो मंदीरात त्याच्या बयको समवेत आला तेव्ह तो ओरडुन म्हाणाला हाच हाच तो फकीर जो मला मारत होता. यानेच मला मला मारले आणि घरी येण्याची सद्बुद्धी दिली.

स्वामी काय करतील याला नेम नाही पण मला अजुनही हे कळाले नाही की अशी काही शक्ती आहेका की जी सहा महिने त्याला बान्धुन ठेवू शकते. जाणकारांनी याचा खुलासा करावा.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators