Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 10, 2007

Hitguj » Religion » माझे आध्यात्मिक अनुभव » Archive through May 10, 2007 « Previous Next »

Mrdmahesh
Thursday, May 03, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा.. अतिशय सुंदर ओळी... त्यातल्या त्यात शेवटाची ओळ फार महत्वाची...
पिल्लू, येऊ द्यात आणखी..
सध्या जास्तीचा जप करणे जमत नाहीये.. तरी पण प्रयत्नपूर्वक करायचा असं ठरवलंय.. बघू आता कसं जमतंय ते..


Pillu
Thursday, May 03, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वामी महाराज की जय
पुष्प ३ रे
एक श्लोकी स्वामी चरीतम
अक्कलकोट निवास दत्तनगरे मूलस्थले आसनम
संसारे अभयप्रदानम करणं ईशक्रुपावर्धनम
भक्तोद्धारण कार्यमेव हि गुरो: सामर्थ्य लीलाम्रुतम
अवतारो परमेश्वरस्य खलु तं वंदे क्रुपाकारणम




(माफ करा मला या म चा पाय कसा मोडयचा हे माहित नाही क्रुपया समजुन घेणे हि विनंती )


पुष्प ३ रे

स्वामी भक्त असे मानतात की स्वामींचा अवतार हा वारुळातुन प्रकट होऊन झाला

नव्हे हे वारुळ
देवाचे देऊळ
शिव घननिळ बैसे माजी १

चरितार्थासाठी
कुठार प्रहार
होई अवतार
समर्थांचा २

ज्याला जैसे हवे
देवाचे दर्शन
त्या त्या रुपी दर्शन
भक्तां देती ३


ईश्वरी सत्तेचे
क्रुपेचेही ज्ञान
हेची पसायदान
स्वामी हस्ते ४



Pillu
Thursday, May 03, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश बाबा तु तर डोळ्यातुन पाणी काढलस खरेच आहे.यातील प्रत्येक ओळीत खुप अर्थ आहे. थांबा आणि वाचत रहा चुकल्यास सांगत रहा

खुप दिवसानी तु ईथे आलास म्हनुन डोळ्यात पाणी आले. बाकी काही नाही.


Divya
Thursday, May 03, 2007 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही बीबींवर नामस्मरणाबद्दल न पटणारे विचार वाचले. नामस्मरण म्हणजे रोग, भोन्दुगिरी, भोळसटपणा असल काहीतरी. मला या गोष्टीवर पुर्ण आक्षेप घ्यावासा वाटतो कारण नामस्मरण करणार्यांना आपण अगदीच टाकाउ काहीतरी निरर्थक अस करत आहोत अस वाटु नये.
खुप लोकांचा scientifically proove केलेल्याच गोष्टीवर विश्वास बसतो. तर तस science नामस्मरणाला ही लागु होतच. जेंव्हा नाम घेता तेंव्हा तुमचे मनातील विचारांच भरकटण नक्कीच कमी होत. + ve आणि - ve विचारांचा आपल्या शरीरावर नक्कीच परिणाम होतो हे आता मानसशास्त्रातही proove झालय. मग नामस्मरणानी जर तुम्ही तुमच्या भरकटणार्या विचारांवर काबु ठेवु शकलात तर sychologist कडे जायची कधीच वेळ येणार नाही कि उगाच BP, heart problems सारखे रोग तुम्हाला लागणार नाहीत. माणसाच्या विचार करण्याच प्रमाण एका मर्यादेपेक्षा जर जास्त झाल तर त्या तणावांचा effect शरीरावर झाल्या शिवाय रहात नाही. पण नामस्मरण करायला श्रद्धा लागते, मग ती कशावरही असली तरी चालते, गुरु, देव, किंवा निर्गुण निराकार परमेश्वर जो नास्तिकांच्या मते या जगाला चालवणारी शक्ती. पुण्य गोळा करायसाठी नामस्मरण करायचे नसुन आपल्या मनातील विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी करायचे आहे. मला असे अजिबात वाटत नाही की नामस्मरणाने पुण्य बिण्य वाढते, पण तुमची चित्तशुद्धी ( जी +ve विचारने तुमचे राग, लोभ, मत्सर... हे दोष शांत होतात त्याने होते) आणि चित्तशुद्धी झाल्याने तुमच्या हातुन प्रत्येक कर्म हे चांगल्या भावनेने आणि व्यवस्थित केले जाते. खर नामस्मरणाला विरोध करणार्या लोकांचा science वर विश्वास असतो मग त्याच दृष्टीकोनातुन अध्यात्मा कडे का बघु नये हे समजत नाही. वाईट या गोष्टीचे वाटते कि अध्यात्मात देखील करायचि कोणतीही गोष्ट ही समजुन न घेता करण्याने अन्धश्रद्धा वाढली पण म्हणुन सगळच भोंदुगिरी आणि फ़सव नाहीये. आज अधुनिक जग ज्या level पर्यंत येउन पोचल त्याला हातभार लावणारे सर्व scientist हे खरे कर्मयोगी आहेत. कशाचा तरी सतत ध्यास घेतल्यानेच त्यांच्याकडुन शोध लागले. खुप scientist ना तर त्यांच्या हयातीत असताना त्यांच्या कामाचे credit मिळाले नाही पण नंतर च्या पिढ्यांचे जीणे सुसह्य केले आहे. ते लोक हे कृष्णाच्या गीतेप्रमाणे खरे कर्मयोगी. सर्व सामान्य माणुस जो खर काही करत तर नाही पण स्वताला शहाण समजण्यातच धन्य मानतो त्यांनी जर अशा लोकांची चरित्र वाचली तर हेच दिसुन येइल की ते किती नम्र होते, जरी काही तरी invention त्यांनी केली असली तरी माणसाच्या मर्यादा त्यांनी ओळखल्या होत्या. आपण काय शोधु शकलो या पेक्षा आपल्याल अजुन ज्ञात नसलेल्या गोष्टी खुप आहेत. तीच नम्रता आपल्याकडिल संतां मधे दिसली. खरच अहं गेल्याशिवाय नम्रता येण कठीणच. नुसत नामस्मरण नका करु त्याने काहीही हाशील होणार नाही त्याला कर्माची जोडही तितकीच महत्वाची आहे. पुण्य हे कर्माचे फ़लित स्वरुप आहे. आपल्या वाट्याला आलेल कर्म लहान मोठ न समजता मन लावुन करण हाच खर धर्म आहे, बाकी हिन्दु, मुस्लिम ही नुसती लेबल आहेत माणसानी स्वताला चिटकवलेली. अगदी साधा स्वैपाक करायचे का काम असेना कि office मधले नीट मनापासुन करा हेच आपल अध्यात्म सांगत.
मी लिहीलेले माझ्या आज पर्यन्तच्या अनुभवावर लिहीले. काही गोष्टी चुकल्या असल्यास क्षमस्व.
जय श्रीकृष्णार्पणमस्तु.


Pillu
Friday, May 04, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री स्वामी समर्थ

कालच ईथे म्हणालो होतो की स्वामींच्या प्रकट होण्याबद्द्ल कुणाला माहीत नाही.
नाही जन्म,नाही नाम,
नाही कोणी माता पिता,
प्रकटला अद्भुतसा
ब्रंम्हाडाचा हाची पिता.
ते अक्कलकोट मधे वास्तव्यास असताना कोणा एका भक्ताने त्यांना हाच प्रश्न विचारला होता आणि स्वारी पण खुशित होती.मग काय माय माऊली काय म्हणते ते पाहुयात.
पुष्प ४ थे

माझ्या देहाची कुंडली करुन तुमचे काम करुन टाका. माझा सगुण देह कसा आहे ते जाणुन घ्या.
नृसिंहभान हे नाम माझे, नृसिंहभान हे नाम धृ
देह असे मम मेष राषिचा
आद्य नाडिचा देवगणांचा
मंगळ माझा राशी स्वामी
काश्यप गोत्री स्मृर्तगामी
द्वितीयेस जो चैत्र शुद्धदिन
अश्विनि नक्षत्रांचे गगन
दो घटिकेचा गुरुवार दिन
चरण प्रीतियोगाचे घटन
संवत्सर बहुधान्य म्हणोनी त्या काळाचे नाम १!!

बालरुप जो आठ वयाला
हस्तिनापुरी तो अवतरला
योगी ब्राम्हण यजुर्वेदि मी
प्रकट जाहलो छेलीग्रामी
मी तर साधू मुनि संन्यासी
नको परीक्षा जास्त चौकशी
मज ना घेणे जातिपातिशी
नाते माझे आकाशासी
मुक्कामाचे ठिकाण माझे तुमचे अंतर्याम
चंद्रसुर्य उदयास्त न जेथे, स्थान परम मम धाम २!!

उपदेश्:
बाह्यरुप जाणिले आता मज आतुनिया ओळख
निराकार निर्गुण निरंकुश निरंजना अल्लख
माझ्या भक्ता, चिवडु नको रे पार्थिवास आता
करी साधना मिळवण्यास त्या निर्गुण भगवंता


Mansmi18
Wednesday, May 09, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या,

तुमच्याशी मी १००% सहमत आहे. मी इतर बीबी वर पोस्ट करणे सोडले आहे.

जसे सन्त तुकाराम म्हणतात

अठरा पुराणाचे पोटी
नामाविण नाही गोठी
हाकारोनी सान्गे तुका
नाम घेता राहु नका
आता तुकोबान्चे नाही ऐकायचे तर कोणाचे?

नामस्मरणाविरुद्ध लिहिणार्यान्कडे दुर्लक्ष केलेले बरे.

||श्री सद्गुरुनाथ महाराज कि जय्||


Vikas_chaudhari
Wednesday, May 09, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार दिव्व्या, :-)

पुण्य गोळा करायसाठी नामस्मरण करायचे नसुन आपल्या मनातील विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी करायचे आहे. १०० टक्के बरोबर.

नामस्मरण हा मनातील विचारांवर नियंत्रण मिळवण्याचा एक उपाय आहे. दुसरेही चांगले उपाय असु शकतील. नामस्मरणासाठी श्रद्धेची गरज आहे. पण विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाही. जसे की मी कशावरही श्रद्धा न ठेवता किंवा नामस्मरण न करता फ़क्त माझ्या श्वासाकडे लक्ष केन्द्रीत केलं आणि मनाला निर्विचार केलं तर मला तोच परिणाम साधता येइल का? नामस्मरणासाठी मला हिंदु, मुस्लीम, ख्रिश्चन इ. बनण्याची आवश्यकता असु शकेल पण श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पर्यायाने मनातील विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसं काही बनण्याची गरज नाही. मग मी नामस्मरणाच्या कुबडीचा आधार का घ्यावा? माझा श्वास मरेपर्यंत तरी शाश्वत आहे आणि त्याची अनुभूती मी स्वत: घेउ शकतो पण जे नाम मी स्मरेन ते शाश्वत आहे की अशाश्वत त्याची अनुभूती मला नाही.


Divya
Wednesday, May 09, 2007 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जसे की मी कशावरही श्रद्धा न ठेवता किंवा नामस्मरण न करता फ़क्त माझ्या श्वासाकडे लक्ष केन्द्रीत केलं आणि मनाला निर्विचार केलं तर मला तोच परिणाम साधता येइल का?
हो येउ शकेल पण तो मार्ग खुप अवघड आहे. त्यात खुप कष्ट, यातना आहेत कारण अस सोहंभावालाच झोंबण फ़क्त हठयोगींनाच जमल. पण ते सर्व सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचे आहे. मला नाही वाटत हे कलियुगात कुणाला साध्य होउ शकेल. ज्ञानेश्वरीच्या भक्तीयोगाच्या अध्यायात आहे या मार्गाने जाणार्यांचे वर्णन.
आणि येरतेही पांडवा| देहारुढोनी सोहंभावा||
झोंबती निरवयवा| अक्षराची||
इथुन पुढच्या काही ओव्या या पद्धतीने उपासना करणार्यांच्या स्थितीचे वर्णन करतात. पुढे लगेच भक्तीयोगाचे महत्व सांगीतले आहे.
जेवढ सोप दिसत तेवढ सोप नाही आणि नसतही. मनाला लगाम घालण, आवरणच इतक अवघड आहे तिथे ते निर्वीचार होण खुप लांबच राहीले. म्हणुन नामस्मरणाचा आधार घ्यायचा.
दुसरेही मार्ग आहेत पण हा त्यातल्या त्यात सोपा आणि सुरक्षित मार्ग.


Vikas_chaudhari
Wednesday, May 09, 2007 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण हा त्यातल्या त्यात सोपा आणि सुरक्षित मार्ग.

मार्ग सोपा हे अगदी मान्य पण तो जर अंतिम ध्येय फ़क्त मनाला शांत करणे येव्हढच असेल तर. विकार आणि पीडा ह्यांना धर्म किंवा जातीचे बंधन नाही तसेच त्याच्या इलाजावरही नाही मग नामस्मरणाने ते बंधन घालून घ्यायची गरज काय? योग्य मार्गदर्शन, नियमीतपणा आणि शिस्त नसेल तर कोणत्याही मार्गाचा उपयोग नाही. माझ्या अपयशाला फ़क्त वरील गोष्टी कारणीभूत असतील, माझे तंत्र नाही.

Divya
Wednesday, May 09, 2007 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नामस्मरणाने ते बंधन घालून घ्यायची गरज काय?
नामस्मरणाने कसल आलय बंधन??? तुमचा नक्की प्रश्न काय आहे? नामस्मरण हे फ़क्त हिंदुच करतात बाकीच्या धर्मात काय त्यांच्या गॉडचे अल्लाचे नाव घेत नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुक आहे. जपाची माळ मौलवींच्या पण हातात असते आणि चर्च मधल्या पाद्रींच्या पण कदाचित त्याला नाव वेगळे असेल. थोडीफ़ार पद्धत वेगळीही असेल पण ती कुठल्याही एका धर्माची मक्तेदारी नाही. तो खर तर त्या इश्वराला स्मरण्याचा सोपा उपाय आहे आणि आस्तिक लोकांसाठी तर खुप काही. मी वर जी लिहीली ती पोस्ट ती नामस्मरण हे काही अगदी वेळखाउपणा आणि ते करणारे लोक बावळट अस वाटु नये म्हणुन लिहीली. फ़क्त नामस्मरणच करत बसणार्याना काही हाशील होणार नाही अस मलाही वाटत. जे करत नाहीत त्यांनी फ़क्त जे करतात त्यांची टिंगल उपेक्षा करु नये एवढाच माझा उद्देश आहे. तुम्हाला करायचे नसेल तर नका करु. आपल्या धर्मात आहे म्हणुन सगळेच थोडीच सगळ करतात.

Vikas_chaudhari
Wednesday, May 09, 2007 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नामस्मरण हे फ़क्त हिंदुच करतात बाकीच्या धर्मात काय त्यांच्या गॉडचे अल्लाचे नाव घेत नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुक आहे.

मला असं बिलकूल वाटत नाहि. मला एकंदरीत नामस्मरणापेक्षा दुसरा उपाय योग्य वाटतो एव्हढंच म्हणायच आहे कारण नामस्मरण करताना बर्‍याचदा डोळ्यासमोर प्रतिमा उभी रहाते. जसे की मी जर "जय जय रघुवीर समर्थ" म्हटले तर मला इतिहासाच्या पुस्तकातील हातात जपमाला घेतलेले रामदासस्वामी दिसतात. ह्या प्रतिमा प्रत्येकासाठी वेगळ्या असु शकतात. जसे कि राम, कृष्ण, ख्रिस्त, बूवा, बापु इत्यादींचे फ़ोटो जे माणसागणीक बदलत राहतात. कारण प्रत्येकाची श्रद्धा वेगळी. श्वासाचा स्पर्श, त्याचं तापमान ह्या सर्व सत्य, शास्वत आणी अनुभौतीक बाबी आहेत ज्या विश्वात कुठेही बदलत नाही. मी आपलं फ़क्त माझं मत मांडल त्याच्याशी तुम्ही सहमत असावं अशीही अपेक्षा नाही. तेव्हा रागाउ नका. कृपया दिवा घ्या :-)

Divya
Wednesday, May 09, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे छे रागावले बिगावले नाही. तुमच्या सारख सगळ्यांना जमतच अस नाही. तुमच्या दृष्टीने श्वास खरा आहे जे जे जाणवत ते ते खर आहे तर त्या अस्तित्वाला जिवंत ठेवणार्या चैतन्याला, आत्म्याला तरी तुम्ही मानत असालच ना. ते चैतन्य आत्मतत्व जो पर्यन्त शरीरात आहे तोपर्यन्तच तुम्हाला अर्थ आहे हो ना. मग तुम्ही जरी म्हणालात की मी नामस्मरण करत नाही मी फ़क्त श्वासावर लक्ष थेवतो तर ते ही नामस्मरणच आहे सोहंभावाने केलेल.
ह्या प्रतिमा प्रत्येकासाठी वेगळ्या असु शकतात. जसे कि राम, कृष्ण, ख्रिस्त, बूवा, बापु इत्यादींचे फ़ोटो जे माणसागणीक बदलत राहतात. कारण प्रत्येकाची श्रद्धा वेगळी.
श्रद्धा वेगळी नसते. श्रद्धा म्हणजे त्याच्यावर टाकलेला विश्वास. तो आहे ही श्रद्धा. मग ती कोणावरही असली तरी फ़रक पडत नाही. त्याला समर्पणाची जोड आवश्यक आहे म्हणुन उगाचच माझी माझ्यावरच श्रद्धा आहे अस फ़ुसक बोलु नये. आपला आपल्या श्वासांवर पण नियंत्रण नाही, मग कुणीतरी शक्ती आहेच हे चालवणारी तिलाच शेवटी सगळ सगळ जाउन मिळत हो अगदी व्यक्तीशा प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळ्या गोष्टीवर असली तरी.

Aschig
Wednesday, May 09, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I will express what Vikas is saying slightly differently

जर तुम्हाला मनाला शांत करायला नामस्मरणाची गरज भासत असेल तर फक्त तेंव्हाच नामस्मरण करा जेंव्हा अशांत वाटत असेल. ठरावीक वेळी करायची सवय नका लावुन घेऊ. तसेच, आलटुन पालटुन राम, रहिम, रावण, येशु, gilgamesh, venus, jupiter, helium, mercury , गोवींदा, माधुरी यांची नावे घ्या. उगीचच पोथ्या पुराणे पाठ करु नका. ई.


Vikas_chaudhari
Wednesday, May 09, 2007 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते ही नामस्मरणच आहे सोहंभावाने केलेल

माफ़ करा पण मला हे विधान समजलं नाही. नामस्मरणाला शब्द, उcचार किंवा कधी प्रतिमा ह्यांची जोड नसते का? मलातरी आनापाना आणि नामस्मरण ह्या दोन तंत्रात फ़रक आहे अस वाटतं.

मग कुणीतरी शक्ती आहेच हे चालवणारी तिलाच शेवटी सगळ सगळ जाउन मिळत हो अगदी व्यक्तीशा प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळ्या गोष्टीवर असली तरी.

असेलही, मी स्वत: ते मिळणं अनुभवलेलं नाही. सिद्धार्थ गौतम, येशुख्रिस्त, ज्ञानेश्वर इ. बुद्धांनी ते अनुभवलं असेल पण तो अनुभव त्यांच्यापुरता मर्यादित आहे. जे नक्की आहे की नाही ते माहित करुन घेण्यासाठी जे आहे त्याचा आधार घेउन चाललेलं बरं असं माझं मत. मी हे स्वत: अनुभवलय की श्वासावर लक्ष केंद्रित करुन (आनापाना) नामस्मरणाशिवाय मन शांत होतं. मला बौद्धिक आणि प्रात्यक्षिक पातळीवर जे तंत्र पटलं ते मी स्विकारलं. पण तेच सर्वोत्तम आहे असा काही माझा दावा नाही. समर्पण वगैरे वर्तमानाततरी माझ्या आवाक्याबाहेरील गोष्टी आहेत. शेवटी कुणी कोणताही मार्ग अवलंबिला तरी इप्सीत साध्य होण्याशी मतलब. सगळीकडे सुखशांती नांदली म्हणजे झालं. ह्यावर तर आपलं नक्कीच एकमत आहे. असो. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद :-)

Savyasachi
Wednesday, May 09, 2007 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशिष, योग्य शब्दात मांडलेस.

Upas
Thursday, May 10, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशिष छान मांडलास प्रश्न.. मला वाटतं केवळ मनाचा उद्वेग शांत करण्यासाठीच नव्हे तर मनावर ताबा मिळवण्यासाठी नामस्मरण हा सोप्पा उपाय आहे. आता माधुरी माधुरी सुद्धा नामस्मरण करता येईल पण त्याने मनात कोणते भाव येतील ते महत्वाचं. माउलीने हरीपाठात, रामदासानी मनाच्या श्लोकात नामहात्म्य सांगितलय. कलियुगात नामस्मरणाइतका सोप्पा उपाय नाही मनास इश्वर सान्निध्यात ठेवायचा आणि त्यायोगे संसार तापाचा आवेग कमी करण्याचा. दुसरं म्हणजे दररोज एका निशित वेळी नमस्मरण करावं हा फक्त शिस्तीचा भाग झाला पण नामस्मरण अखंड करता आलं तर त्यासारखं दुसरं काही नाही. शिवाय एखाद्या विशिष्टवेळी उदा. प्रातकाळी तसेच विशिष्ट ठिकाणी वगैरे मन जास्त लवकर स्थिर होऊ शकतं नामस्मरणासाने.. अर्थात हे व्यक्तिसापेक्ष सुद्धा आहेच..
तुकोबा म्हणतात..
कमोदीनी काय जाणे तो परीमळ..
तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम
आम्हीच ते प्रेमसुख जाणो!!



Divya
Thursday, May 10, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नामस्मरणाचे सुद्धा टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात नाम घेता तेंव्हा ते वैखरीने अगदी दुसर्याला स्पष्ट ऐकु जाईल असे घेतात. कारण या नाम घेण्यामागे मनाला त्याच्याशी बांधुन ठेवायच असत ते तर इतक अफ़ाट आहे कि कधी जर आपल लक्ष कुठल्या दुसर्या विचारात असेल तर आपण वाचत असु ऐकत असु ते सुद्धा डोक्यावरुन जात हे ही आपण बर्याचदा अनुभवतो. वैखरीने तोंडाने घेतलेले नाम हे एकदा मनात स्थिर झाले कि मग मनातल्या मनात घेता येते. जस तुम्ही जर घंटेचा आवाज सतत ऐकत राहीलात तर तो घंटानाद थांबला तरी आपल्याला कुठेतरी सतत चालुच आहे इतका स्प्ष्ट ऐकु यायला लागतो तसच नाम हे मनात स्थिर व्हायला लागत. त्याची सुद्धा लय साधते आतल्या आत. इथुन पुढे ते मध्यमेत जाते. हे नामस्मरण तुमचे बरेच राग लोभ शांत करते. हा सुद्धा एक सुक्ष्म आतल्या आत होणारा प्रवास आहे जे एका टप्प्यापर्यन्त मी सुद्धा स्वता अनुभवलय. हृदयाची धडधड जेंव्हा स्पष्ट ऐकु येते इतके तुम्ही जेंव्हा अंतर्मुख होत तेंव्हा तेच नाम या हृदयाचा तालावर घायचे अगदी सहज घेतले जाते हे अंगात मुरत जात आणि विश्वास ठेवा हे मी स्वता अनुभवल आहे या लेवलला तुम्हाला आनंद मिळायला सुरवात होते. बाहेरच्या जागात मिळणार्या आनंदापेक्षा याचे स्वरुप वेगळे आहे. या जगात खरा सगळीकडेच आनंद भरुन राहीला आहे आपण कारण नसताना दुखी कष्टी होतोय अस वाटायला लागत. एथुन पुढे मात्र मल अजुन तरी अनुभवता आलेल नाही पण तेच नाम पश्यन्ती मधे जात. आणि नंतर परेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार टप्पे. त्यात परेत फ़क्त जाणिवेचे स्फ़ुरण होते, पश्यन्ती मधे त्याचा अर्थ लागतो मध्यमेत त्याला शब्द प्राप्त होतात आणि वैखरीत ते वाणीने प्रकटतात. हृदयाच्या ठोक्यावर घेतलेले नाम हे नंतर श्वासावर घ्यायचे. श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना या लयीत घेतल जात आणि जेंव्हा हे नाम परेत पोचत तेंव्हा शब्द देखील गळुन पडतात फ़क्त श्वास जाणवत रहातो. कुठलाही मनात विचार नाही, विकार नाही, स्वताच अस्तित्व विरघळुन गेल्यासारख. त्या श्वासाशीच तुम्ही एकरुप होत. फ़क्त श्वास आत येतोय आणि बाहेर जातोय एवढीच जाणिव रहात असावी. या नंतर समाधीच लागते. हे सगळे टप्पे हे सहज व्हायला पाहीजेत ज्या टप्प्यात तुम्ही आहात तिथुन पुढे जाण्यासाठी काही विषेश बदल करावे लागत नाही ते आपोआप होत. असही नाही की चला आता तोंडाने नाम घेणे बास मी आजपासुन मनातल्या मनात घेतो, नाम घेता घेता डोळे मिटले जातात आणि तो नाद मनात उमटतो. हा प्रवास सहज आणि आपणहुन होतो. मागच्या जन्मी तुम्ही ज्या लेवल पर्यन्त साधना केली असेल तिथपर्यन्त जाण हे सहज जमत पण तिथुन पुढे मात्र तुमचीया जन्मीची साधना असते. म्हणुन चला मला इतक लगेच जमल म्हणुन हुरळुन जायच पण कारण नाही. एक अशी वेळ येते की आता पुढे जाण्यात कदाचित पश्यंती नंतरच्या प्रवासात गुरु भेटतात तिथुन पुढे गुरु नेतात अस ऐकलय. काहीजण स्वताच जातत तिथे परमेश्वरच त्यांचा गुरु होतो. आता तुम्ही म्हणाल कि पर्मेश्वर कसा काय बुवा गुरु बिरु. तर तो भाव तारुन नेतो. माधुरी माधुरी करायला मनाला गुंतवुन ठेवालही हो पण जेंव्हा नाम पश्यंती मधे जाते तेंव्हा काय हे नाम एका सिनेनटीचे आहे ती दिसावयास सुंदर आहे..... हेच अर्थ लागणारना. पण तेच जर त्या इश्वराचे घेतले तर त्या नामाचा अर्थ काय तर चैतन्य, आत्मतत्व, जो परमात्मा सगळीकडे आत्म रुपाने वास करतो तो माझ्यातही आहे, तो आफ़ाट आहे विराट आहे जो क्षुद्र अमिबा सारख्या जीवा पासुन ते या universe मधल्या सर्व ग्रह गोलां पर्यन्त व्यापुन आहे त्यांना चालवतो, तो काळासापेक्ष आहे.. असे कितीतरी जन्म झाले सृष्टीतही कितीतरी बदल झाले पुढे काय हे ही त्यालाच ज्ञात आहे. त्या आत्मतत्वाशी तुम्ही एकरुप होता.
असो मला जेवढ सांगता आल तेवढ सांगायचा प्रयत्न केला आहे तरी काही चुकल्यास क्षमस्व.
जय श्री कृष्णार्पणमस्तु.


Mansmi18
Thursday, May 10, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असं बिलकूल वाटत नाहि. मला एकंदरीत नामस्मरणापेक्षा दुसरा उपाय योग्य वाटतो एव्हढंच म्हणायच आहे कारण नामस्मरण करताना बर्‍याचदा डोळ्यासमोर प्रतिमा उभी रहाते
-------------------------------------------------
नमस्कार विकास,

नामस्मरण करताना प्रतिमा उभी राहिली डोळ्यासमोर तर काय हरकत आहे? तुमची बहुतेक आध्यात्ममार्गात प्रचन्ड प्रगती झालेली दिसते. अहो सगळ्यान्चे नसते तसे.

नामस्मरण हा मनाचे चाळे थाम्बवुन मन स्थिर करण्याचा एक सोपा उपाय आहे. सामान्य माणसाना मन स्थिर करायला प्रचन्ड परिश्रम करावे लागतात हो. नुसत्या श्वासाकडे लक्ष देउन मन स्थिर करणे हे म्हणायला सोपे आहे पण प्रत्यक्षात नामस्मरण करताना मनात असन्ख्य विचार येउन मन पतन्गासारखे भरकटायला लागते तेव्हा "फ़ोकस" करण्यासाठी देवाची प्रतिमा आली डोळ्यासमोर तर काय हरकत आहे?

दुसरे म्हणजे तुमच्या लिहिण्यावरुन तुमचा नामस्मरणापेक्षा देवावर किन्वा श्रद्धेवर आक्षेप दिसतो. परत मी सामान्य माणसान्चा मुद्दा मान्डेन. अहो माझ्यासारखी सामान्य माणसे स्वत्: काही शोधण्यापेक्षा सन्त तुकाराम, सन्त ज्ञानेश्वर, सन्त रामदास यानी सान्गितलेल्या मार्गाने जातात आणि त्यात त्याना आनन्द मिळतो त्यात वावगे ते काय? मला वाटते तुम्हाला नामस्मरणाने आनन्द मिळाला नाही यात तुमचे प्रयत्न आणि श्रद्धा(किन्वा श्रद्धेचा अभाव)कमी पडली असावी.

पुढे काही सन्तवचने देत आहे.
सन्त ज्ञानेश्वर्:
एक तत्व नाम द्रुढ धरी मना
हरीसी करुणा येइल तुझी
नामापरते साधन नाही रे अन्यथा
वाया आणिक पन्था जाशील झणी

सन्त तुकाराम्:
अठरा पुराणाचे पोटी
नामाविण नाही गोठी
हाकारोनी सान्गे तुका
नाम घेता राहु नका

सन्त कबीर्:
भजो रे भैया राम गोविन्द हरी
जप तप साधन कछु नही लागत
खरचत नाही गठरी

मी जे लिहिले त्यात तुम्हाला दुखावण्याचा हेतु नव्हता. तसे तुम्हाला वाटल्यास क्षमस्व.

||ओम नम: शिवाय्||
||श्री सद्गुरुनाथ महाराज की जय्||
||परमपुज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय्||















Aschig
Thursday, May 10, 2007 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्व्या, तुमची काही तरी गफलत होते आहे. एकदा तुम्ही म्हणता की नामस्मरण हे केवळ मनाला शांत करण्याकरता (i.e. not connected or concerned with the external world at all) तर दुसरीकडे म्हणता की या नामस्मरणाद्वारे, जे की प्रत्येक successive जन्मी प्रगल्भ होत जात, तुम्ही मोक्षप्राप्ती ( sort of ) मीळवु पहाता (i.e. not just connected with the external world, but also assuming a model of multiple birth cycles) .

दुसरे म्हणजे, इश्वर ज्याप्रमाणे निराकार आहे, त्याच प्रमाणे निनावी देखील. राम हे नाव त्याला जीतके सादर होते तितकेच माधुरी देखील होणार. माधुरी हे नाव घेतल्यावर तमाम पोहोचलेल्या लोकांच्या मनात एक सिनेनटी(च) का यावी?

तिसरे म्हणजे, कृपया सगळ्यांनी स्वतःला सामान्य समजणे सोडावे. स्वतःला महान समजण्या इतकेच ते वाइट आहे आणि एकप्रकारे जास्त हानीकारक.

नामस्मरण जर (जरुर पडेल तेंव्हा) मनःशांती करता केलेत तर उत्तम. पण त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आजुबाजुच्या जगाचा वीसर पडणार असेल तर मात्र ती केवळ पळवाट आहे. जर इतरांच्या सुखदुःखात सहभागी झालात, किंवा याच जगातील (जी की एकमेव शाश्वत शाश्वत गोष्ट आहे) एखादे ध्येय गाठायचा प्रयत्न केलात तर तुमच्याबरोबर इतरांना देखील मोक्षप्राप्ती होईल. तुमच्यातील अनेक ते करत देखील असतील. त्यांना त्रिवार प्रणाम. पण त्यांचे नामस्मरण करत बसण्यापेक्षा त्यांच्या पावलापलीकडे पाऊल ठेवुन पुढे चला.


Divya
Thursday, May 10, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा तुम्ही म्हणता की नामस्मरण हे केवळ मनाला शांत करण्याकरता
हो साधनेच्या सुरवातीला तरी सामान्य माणस जी रोजच्या जीवनात येणार्या अनुभवांनी त्रस्त असतात तेंव्हा नामस्म्ररण मनाला शान्त करण्यासाठीच आहे. आणि काहीजण खरच तेवढ्यापुरत मर्यादितही ठेवतात. फ़ारच थोडे जिज्ञासु पुढे जातात.
इश्वर ज्याप्रमाणे निराकार आहे, त्याच प्रमाणे निनावी देखील.
हो आधी मुळ रुप निर्गुणच त्यातुनच सगुण रुप तयार झाले. आधी काहीच नाम नव्हते आणि मुळ परब्रम्ह हे शब्दांच्याही पलिकडे आहे.
राम हे नाव त्याला जीतके सादर होते तितकेच माधुरी देखील होणार.
हो जर माधुरी हे नाम तुम्ही एक नाम म्हणुनच घेणार असाल तर चालेल कि हे पण जरुर चालेल. नाम कुठलही घ्या, सोप आवडेल अस... इथे झक्की नेहमी टायसन ची गोष्ट सांगतात ती आठवली. मरा मरा म्हणतच वाल्याचा वाल्मिकी झाला. पण एकच घ्यावे, आज एक उद्या एक अस नाही.
माधुरी हे नाव घेतल्यावर तमाम पोहोचलेल्या लोकांच्या मनात एक सिनेनटी(च) का यावी?
कारण त्यांना ते नाव धारण केलेली व्यक्ती ही जास्त तशीच माहीत आहे famous या अर्थाने तरी म्ह्णुन त्यांच्या डोळ्यांसमोर तीच येत असावी.
पण त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आजुबाजुच्या जगाचा वीसर पडणार असेल तर मात्र ती केवळ पळवाट आहे.
अजीबात नाही. ते अंतर्मुख होण आहे, क्षणभरासाठी विसरण हे मनाला परत पुन्हा उत्साही करणार टोनिक आहे.
र इतरांच्या सुखदुःखात सहभागी झालात, किंवा याच जगातील (जी की एकमेव शाश्वत शाश्वत गोष्ट आहे) एखादे ध्येय गाठायचा प्रयत्न केलात तर तुमच्याबरोबर इतरांना देखील मोक्षप्राप्ती होईल.
हो या बीबी वर पोस्ट करणारा प्रत्येक जण हा समस्त प्राणीमात्रांबद्दल कळवळा असणारे आणि त्यांनच्यासाठी स्वताचा स्वार्थ बाजुला ठेवुन धावुन जाणारे आहेत. मोक्षप्राप्ती ही कुणाच्या जीवावर मिळवण म्हणजे पुजा मला करायची आहे पण मला जमत नाही म्हणुन ती तु कर माझ्या नावाने अस म्हणण्यासारखच नाही क?
पण त्यांचे नामस्मरण करत बसण्यापेक्षा त्यांच्या पावलापलीकडे पाऊल ठेवुन पुढे चला.
तुम्ही चालला आहात ना मग ठीक आहे बाकिचे त्यांच्या बुद्धीनुसार कुवतीनुसार ठरव्तील काय करायच ते.
कृपया सगळ्यांनी स्वतःला सामान्य समजणे सोडावे. स्वतःला महान समजण्या इतकेच ते वाइट आहे आणि एकप्रकारे जास्त हानीकारक.
त्रिवार प्रणाम करण्याइतक कोणी इथे स्वताला महान समजत नाही की कारण नसताना सामान्यही समजत नाहीत. आपण काय आहोत हे ज्याचे त्याला माहीत आहे.
मला वाद घालायचा नाही त्यामुळे हे माझ्या दृष्टीने न संपणारे आहे ज्याना जे समजायचे ते समजावे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators