Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Meaning of pradakshina

Hitguj » Religion » Meaning of pradakshina « Previous Next »

Mansmi18
Friday, January 05, 2007 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Namaskar,

Mala kuni pudhil vakyanhca arth sangu shakel ka
"Dhanya dhanya ho pradakshina sadgururayachi
Zali twara surawara viman utarayachi"
what is meaning of second line?

Thanks

Prashantnk
Saturday, January 06, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mansmi18 ,
नमस्कार.

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्ग़ुरुरायाची/
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची// ध्रु. //

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी/
सर्वही तीर्थे घडली आम्हां आदिकरुनि काशी/ धन्य.//१//

मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती/
नामसंकीर्तने ब्रम्हानंदे नाचती/ धन्य. //२//

कोटि ब्रम्हहत्या हरती करितां दंडवत्/
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात/ धन्य. //३//

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि/
अनुभव जे जाणती ते गुरुपदिचे अभिलाषी/ धन्य. //४//

प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला/
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला/ धन्य. //५//


श्रीसद्ग़ुरुंचा अगाध महिमा वर्णन करणार्‍या ह्या 'प्रदक्षिणा-सोहळ्यातील' वरील ध्रुवपदात, 'सुर-वरां' म्हणजेच इंद्र-आदिदेवांनाही हा सोहळा पाहण्यासाठी लागलेली घाई ( त्वरा ) दर्शवतोय.

जस माणुस जन्म हा पूर्व पाप-पुण्याच्या मिश्रणाने मिळतो, तसाच फ़क्त पूर्व पुण्य असेल तर देवलोकात स्वर्गादि उपभोग मिळतात, हे उपभोग पूर्व पुण्याचासाठा असेपर्यंतच मिळतात. त्यानंतर त्यांनाही पुनरुत्थान असते. म्हणूनच इंद्रादिदेव काही काळाने बदलले जातात.

मूळ परब्रम्ह (विठ्ठल) हे न बदलणारे, अविनाशी तत्व आहे. श्रीसद्ग़ुरु म्हणजेच परब्रम्ह असतात आणि म्हणुनच 'सुरांना(देवांना)', श्रीसद्ग़ुरुच निष्काम-गुणगान ज्या ठिकांनी चाललय त्या ठिकानी जाण्याकरीता, त्यांच विमान उतरावयाची घाई झाली आहे.

सर्व देवांना हा श्री सद्ग़ुरुमहिमा माहीत आहे, तसाच सर्व संतानीही हे आपल्या कृतीने आणि अनूभवाने जाणले आहे. त्यामूळेच लोटांगण घालणारा 'मोक्ष' न मागता परत गुरूपदीची( श्रीगुरुचरणाचीच) अभिलाषा बाळगली आहे.

श्री तुकारामांनी म्हंटले आहे,

न लगे मुक्ति धन संपदा/ संतसंग देई सदा//

हे मागणेही तेच दर्शविते आहे.

ज्यावेळी मनाच्या आहारी जाऊन, काही स्व:केंद्रित कर्म माणसाच्या हातून होते त्यावेळी 'प्रपंचा' भोवतीच माणूस फ़िरत रहातो, पण 'परमात्मा-श्रीभगवंत-श्रीसद्ग़ुरु-आत्मा' हा केंद्रभूत मानून झालेल्या, त्याच कर्मांना 'प्रदक्षिणा' असे म्हणतात.

'प्रपंच' म्हणजे 'बायका-पोरे' नव्हेत, तर 'प्रपंच' म्हणजे 'वासना-आसक्ती' होय.


Mansmi18
Saturday, January 06, 2007 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prashantk

Dhanyavaad.

Very nice explanation.

Neetasudesh
Friday, February 23, 2007 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prashant thank u very much ! Very nicely explained by you. Even I am in Parmarth marg i believe in KALAWATI AAI and really her abangaas are so lovely that you really become stress free. Mala aai mhanjech sarv kahi aahe tya pavlo pavli majya borobar astaat.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators