Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
रताळ्याचा कीस

Hitguj » Cuisine and Recipies » उपवासाचे पदार्थ » रताळ्याचा कीस « Previous Next »

Lalu
Thursday, March 04, 2004 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रताळे किसून घ्यायचे, तुपावर जीरे फोडणीला टाकून त्यात रताळे घालायचे.आले, हिरवी मिरचीचे वाटण, दाण्याचे कूट, मीठ, थोडी साखर घालून एक वाफ आणायची. चालत असेल तर कोथिम्बीर घालायची वरून. घाईत प्रमाण नाही लिहिले. चालेल ना?

Manuswini
Friday, February 03, 2006 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रताळ्याचा हलवा

४ रताळी बारिक किस, Indian रताळी गोड असतात but yams in asian market are somewhat same like Inidan root ,
१ tsp शुद्ध घी,
१-१/२ वाटी साखर ( आपल्या चविप्रमाणे आणि ) kind of रताळी आहेत त्यानुसार,
१-२ लवंग,
किसलेल आलं,
ओलं सफ़ेद खोबरं,
काजु, वेलची, बदाम सालिशिवाय, केसर


टोपात शुद्ध तूप,लवंग काड्या,आलं घालून मंदाग्नीवर रताळा किस परतावा, साधरण खंमग वास सुटला की समजायच की रतळी शिजायला आलीयत. मग साखर टाकुन घोटत रहायचे. मग सगळ्यात शेवटी खोबर आणि वेलची,केसर,बदाम,काजु टाकायच.

खूप टेस्टी लागतो



Prady
Monday, February 27, 2006 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालुने दिलेल्या क्रुती प्रमाणेच कच्या केळ्याचा किन्वा सुरणाचा कीस देखिल करता येतो.साले काढून ही केळी किन्वा सुरण किसायचे आणी बाकी सर्व रताळ्याच्या किसा प्रमाणेच. आणी मुख्य म्हणजे सुरणाचा कीस अजिबात खाजरा होत नाही.


तसेच दुधी भोपळ्याचा कीस पण करता येतो वरील प्रमाणे. पण तो उपासाला चालणार नाही. पण कधीतरी सकाळचा नाश्ता किन्वा मधल्या वेळच खाण म्हणून करता येइल.


Prajaktad
Thursday, August 02, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मने!तुझ्या क्रुतिने रताळ्याचा किस(हलवा)केला..काय अप्रतिम होतो..ऽगदी गाजर हलव्याटाईप दिसतो.क्रुतिबद्दल आभार

Manuswini
Friday, August 03, 2007 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tahnks गं अभिप्राय दिलास त्याबद्दल. छान वाटले.
अगं हा मझा Fav असायचा लहानपणी, अगदी मोठा bowl भरून खायची. खुप सुंदर लागतो ना
आजीची रेसिपी आईनी चालवली नी मी आता.


Mepunekar
Friday, August 03, 2007 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, रताळ्याचा हलवा हा प्रकार छान वाटतोय, करुन बघायला हवाय. पण त्यात आलं घालायलाच लागेल का? नाही घातलं तर चवीत काही फ़रक पडेल का?
गोड पदार्थात (चहा सोडुन) आलं आवडत नाही.


Prajaktad
Saturday, August 04, 2007 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्यश्री ! आलं मीही नव्हत घातल ... तरी चव छान आली होती.

Manuswini
Saturday, August 04, 2007 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आले आजी घालायची कारण तीचे म्हणणे असे होते की पिठुळ पदार्थात आले चांगले, बाकी तुझा choice

Mepunekar
Monday, August 06, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks प्राजक्ता, अता करुन बघेन मी नक्की :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators