Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
दुधी भोपळ्याची जीर्‍या मिर्‍याची कढी...

Hitguj » Cuisine and Recipies » आमटी, कढी, पिठले » कढी » दुधी भोपळ्याची जीर्‍या मिर्‍याची कढी « Previous Next »

Moodi
Thursday, January 05, 2006 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कढी

साहित्य : १ किलो दुधी भोपळा, अडिच वाट्या पाणी, २ टीस्पुन जीरे अन १ टीस्पुन काळ्या मिर्‍याची भाजुन ताजी पुड, १ ते २ टेस्पुन तांदळाची पिठी, मीठ, २ चमचे तेल. हळद आवडीनुसार.

कृती : दुधी धुवुन साले काढुन बारीक चिरुन घ्या, त्यात थोडेच पाणी घालुन मऊ शिजवुन घ्या. मग डावाने वा चमच्याने नीट घोटा.
या शिजलेल्या दुधीत थोडे तेल, जीरेमिरी पुड,मीठ घाला. तांदळाची पिठी थोड्या पाण्यात कालवुन या मिश्रणात घाला, नीट हलवा अन थोडे पाणी घालुन परत २ उकळी द्या. गरमच वाढा.
ही सुपाप्रमाणे असल्याने नुसतीसुद्धा चालते अन पोळी वा भात कशाबरोबरही चालते. पचनास हलकी असल्याने आजारे माणसासही चालेल.


Savani
Sunday, February 05, 2006 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी छान आहे रेसिपी. मी आजच करुन पाहिली. छान लागते.

Megha16
Tuesday, February 21, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी
रेसीपी एकदम झकास आहे
मी यात एकबदल केला फोडणी देताना त्यात १-२ हिरव्या मिरच्या टाकल्या आणी १-२ चमचे दही.
मस्त झाल होती कढी


Prajaktad
Tuesday, February 21, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या सासुबाई नेहिमी करतात हि रेसिपी , त्या दहि आणि डाळिचे पिठ घालुन करतात.याला " दुधिचे सांबार " असेही नाव आहे.

Arch
Thursday, February 23, 2006 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज करून पाहिली ही कढी. मस्त लागते. Thanks मूडी. मी प्राजक्ताने लिहिल्याप्रमाणे दही आणि डाळीच पीठ लावल. वरून कोथिंबीर, कढिपत्ता आणि मिरचीची फ़ोडणी दिली.

Bee
Thursday, February 23, 2006 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्च मला तुझी कृती अजिबात कळली नाही. पिठ पेरणे हा प्रकार माहिती आहे पण पिठ लावणे म्हणजे काही कळले नाही. दही लावताना पिठ लावायच का? म्हणजे विरजण लावतानाच ना? जरा देतेस का तुझी आवृत्ती वेळ असेल तर..

Milindaa
Thursday, February 23, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, भो. आ. क. फ. :-)

Sampada_oke
Thursday, February 23, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तू मस्करी करतोयस का?

Arch
Thursday, February 23, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बी, तू खरच विचारतो आहेस का? पिठ लावल म्हणजे त्या कढीत दह्यात डाळीच पीठ मिसळून घातल. आपण नेहेमीच्या कढीला करतो तस.

Bee
Friday, February 24, 2006 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल, अर्च खरच विचारत आहे. मस्करी म्हणून नाही. असे असू शकते ना कारण रात्रभर दह्यात जर बेसन कालवून बाहेर ठेवले तरी दही खराब होत नाही. आता कळल. धन्यवाद!

Seema_
Monday, February 27, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हशीला आदल्या दिवशी बेसन चरायला दिल कि दुध आयते बेसनयुक्तच मिळेलच ना ?. मग त्याच दही लावायच.सोपच तर आहे .
बी दिवे घे रे. खरच गम्मत म्हणुण लिहिलय .


Milindaa
Tuesday, February 28, 2006 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Seema,

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators