Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आहार अन आरोग्य ...

Hitguj » Cuisine and Recipies » आहारशास्त्र » आहार अन आरोग्य « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 13, 200635 01-13-06  11:30 pm
Archive through April 02, 200620 04-02-06  11:58 am
Archive through June 10, 200620 06-11-06  3:05 am
Archive through August 12, 200620 08-13-06  12:11 am

Moodi
Sunday, August 13, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आस्मानी हे वाचुन बघ. विविधा मध्ये आहे.

/hitguj/messages/103383/104500.html?1133978155

Farend
Monday, August 14, 2006 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moodi धन्यवाद, अशीच माहिती मी पण शोधतोय.

अजून १-२ प्रश्न: मध लहान मुलांना (३+ वर्षे) दिला तर चालतो का? इथले डॉ सांगतात की अगदी लहान मुलांना देऊ नका, पण भारतात बहुधा देतात. त्या वयात त्याचा काही विशेष फायदा आहे का?

आणि आपण साखर जास्त खाण्याचे टाळत असलो, तर मध पर्याय म्हणून चालतो का :-)


Moodi
Monday, August 14, 2006 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल साखरेला पर्याय म्हणून गूळ चांगला आहे. मध चालू शकेल, पण तो गरम करता येत नाही. त्यामुळे त्यावर जरा मर्यादा येते. बाकी जाणकार सांगतीलच. काकवी तुला माहीत असेलच. काकवी लहान मुलांना ब्रेड किंवा पोळीबरोबर देता येते, मात्र जास्त स्वरुपात नाही. भारतात गेलास की जरुर आण. तिच्यात लोह असते. तरीही काकवी विषयी आपल्या भारतीय डॉक्टरना माहीत असते, परदेशातील नाही.

मात्र औषध रुपात आपण मध वापरु शकतो. म्हणजे चाटण वगैरे तयार करुन. लहान मुलांना तो कसा आणि केव्हा देतात याबद्दल आश्विनीच सांगू शकेल.


Moodi
Monday, August 14, 2006 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल ही लिंक बघ सकाळची, तू वाचली असशीलच. पण इथे असावी म्हणून देतेय. वाचनीय आहे.

http://www.esakal.com/esakal/08142006/NT00C2DAC2.htm

Kahikhas
Friday, December 01, 2006 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पांढरा मुळा व लाल मुळा (वरुन लाल, म्हणजे skin लाल पण आत नेहेमी सारखाच पांढरा), या दोन्हीच्या पोषणमूल्यात काय फरक आहे. तसेच लाल मुळ्यात आरोग्याच्या द्रुष्टीने काही विषेश गुणधम आहेत काय?

धन्यवाद.


Farend
Friday, January 19, 2007 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात मिळणार्‍या मनुका आणि येथे मिळणारे raisin यात काही फरक आहे का? का फक्त जास्त वाळवतात मनुका? raisin मधे बाहेरून साखर घातल्यासारखी वाटते टिकवायला.

Maku
Monday, February 12, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी विचारले पण कोनिच ans देत नाही. मी एकदा bee ला पण yoga चे विचारले होते पण त्याने सुद्धा ans दिले नाही. i think नवीन लोकांना तुम्ही ans देत नाही .

मला खरेच वाईट वाट्ते सान्गायला maayboli site चांगली नहीये.

Bee
Monday, February 12, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मकु, माझ्याकडून काय माहिती हवी आहे त्याबद्दल परत एकदा मेल करा किंवा योगाच्या बीबीवर लिहा. मला खरच तुमचा मेल मिळाला नाही. बहुतेक spam मधे अडकला असेल...

Zakasrao
Saturday, March 03, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीवनसत्वे -
-उपयोग -कशातून मिळते

अ(A) प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते------- पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी
ब१(B1) पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक ---------------हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस

ब२(B2) मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते --------यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध

ब३(B3) कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते --------हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट

ब५(B5) शरीरातील शक्ती वाढवते----------------------- धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक

ब६(B6) प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते -------------------------सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीया

ब१२(B12) पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग ---------------------------यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ

फॉलिक ऍसिड लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते) ---------------------------------------गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस

क(C) प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते-- ----------------------------------------लिंबूवर्गातील फळे (संत्रे, मोसंबी...) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे

ड(D) कॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक)-- ---------------सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक

इ(E) रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते ---------------लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळा

फ(F) कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते--- ----दाणे, काजू

के(K) रक्ताभिसरणासाठी उपयुक्त. (गर्भवतीला शेवटच्या महिन्यात अतिशय उपयुक्त) --------------------------यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक

खनिजे


लोह सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते, पेशींमधील महत्वाच्या कार्यांना चालना देते (गर्भवतीस अतिशय आवश्यक) ---चेरीचा रस, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, पुर्ण धान्य, सुकामेवा, कलिंगड, अंड्यातील पिवळा बलक, बीट

कॅल्शियम हाडांच्या व दातांच्या जडणघडणीसाठी आवश्यक, मज्जातंतू तसेच स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवते-- --------------दूध, गडद हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, संत्री, पपई, कलिंगड, गाजर

फॉस्फरस कॅल्शियम, तसेच ड जीवनसत्वाच्या कार्यात मदत करते, उत्तम हाडांसाठी आवश्यक, शरीरातील ग्रंथींच्या कार्यासाठी आवश्यक ---------------------------------------दुग्धजन्य पदार्थ, पूर्णं धांन्ये, धान्याचे मोड, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, काजू, बदाम

पोटॅशियम स्नायुंचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक, शरिरात सोडीयम ची आवश्यक पातळी कायम ठेवते------------------- केळी, खजूर, पपई, धान्याचे मोड, पालेभाज्या

मॅग्नेशियम प्रथिनांच्या पचनास, तसेच चरबीच्या वापरात मदत करते, कॅल्शियमची आवश्यक पातळी कायम ठेवते, तणावापासून मुक्ती देते ----------------------------------------हिरव्या पालेभाज्या, काजू, बदाम, दुग्धजन्य पदार्थ

झिंक उत्तम वाढीसाठी, मेंदू आणि चेतासंस्था निर्मितीस सहाय्यक, आजार लवकर बरे करते. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक)------------------------------ -- केळी, पुर्ण धान्ये, काजू, बदाम, धान्याचे मोड, दुग्धजन्य पदार्थ


इंटरनेट वर मिळालेली माहिती. कोणी तज्ञ असेल तर थोडे detail द्यावेत.

Dineshvs
Saturday, March 03, 2007 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, पुरेशी आहे कि ही माहिती !
पण आपल्या भारतीय स्त्रीयाना, हे कधी समजणार ? पंडुरोगाचे, भयानक प्रमाण आहे आपल्याकडे.


Ksmita
Monday, September 17, 2007 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Cholestorol control साठी आहाराच्या काही टिप्स देऊ शकेल का कोणी ? currently its 215 साधारण किती दिवस लागतील कमी व्हायला दुग्धजन्य पदार्थ पुर्ण बंद केले पाहीजेत का? trade mill शिवाय अजुन काय व्यायाम करता येईल?
Health च्या BB वर पाहिले पण जास्त माहीती नाही मिळाली.
Thanks in advance !

Karadkar
Monday, September 17, 2007 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मिता, जमले तर अभय बन्ग यांचे 'माझा साक्षात्कारी हृदयरोग वाचुन काढ. त्यात खुपच चांगली माहिती दिलेली आहे. आणि ते स्वत्: डॉक्टर असल्याने त्यानी खुप गोष्टीचा विचार करुन ते लिहीले आहे.

नक्की फ़ायदा होईल. दुधाबद्दल तर त्यामधे अतिशय उत्तम माहीती आहे.


Bee
Tuesday, September 18, 2007 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हे नक्की माहिती आहे की अनुक्रमे कपालभाती, प्राणायाम केले तर cholesterol कमी होती. एकूनच योगा शरिर आणि मन स्वास्थ्यासाठी लाभदायक आहे.

Ksmita
Tuesday, September 18, 2007 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Karadkar,bee
बघते कुठे मिळते का ते पुस्तक तसेच योगावर पण शोधते जरा माहीती.

Ksmita
Wednesday, September 19, 2007 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

karadkar तुला मेल केली आहे

Shonoo
Wednesday, September 19, 2007 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभय बंग ना ज्या पुस्तकावरून बरीच प्रेरणा मिळाली ते Dr Dean Ornish चे पुस्तक पण वाचायला हवे. इथल्या स्थानिक वाचनालयात सहज मिळतील Ornish ची पुस्तके.

Karadkar
Wednesday, September 19, 2007 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

smita, check your email.

shonoo, I was thinking abt the same thing ... may in few days.

Prajaktad
Wednesday, September 19, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ksmita इथे बघा!

/hitguj/messages/103387/106361.html?1172686478


Ksmita
Wednesday, September 19, 2007 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks prajaktad हा BB मी पाहीला होता.
Shonoo, आजच बघते Dr. Ornish याचे पुस्तक
मिनोती, तु दिलेली लिन्क खूपच helpful !! त्या पुस्तकासाठी तुला मेल करेन may be next week or so.
Thanks All !!

Sonalisl
Saturday, February 16, 2008 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पांढरा कांदा, लाल कांदा अन ब्राऊन कांदा यापैकी कोणता आरोग्यास चांगला? कांदा अतिशय उग्र, तिखट असेल तर तो कमी करण्यासाठी काय करावे?



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators