Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मुठिया

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » गुजराथी » मुठिया « Previous Next »

Dineshvs
Wednesday, December 14, 2005 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक वाटी कणीक आणि त्यात एक वाटी ज्वारीचे पिठ मिसळुन घ्यावे. त्यात अर्धी वाटी चण्याची पीठ घालावे. त्यात मेथीची पाने खुडुन घालावीत. मेथीची भाजी बारिक चिरुन घातली तरी चालेल. हिरव्या मिरच्या व आले वाटुन लावावे. लाल तिखट, हळद, ताजी धणे जिरे पुड, मीठ व चवीपुरती साखर, हिंग घालावे. मग अगदी थोडे ताक, बरेचसे तेल घालुन पाण्याने साधारण घट्ट मळावे. त्याचे लांबट गोळे करुन दहा पंधरा मिनिटे वाफ़वुन घ्यावेत. निवले कि हवे तर कापुन घ्यावेत किंवा तसेच ठेवावेत.
तेलाची मोहरी, हिंग व धणे घालुन फ़ोडणी करावी, त्यावर हे परतुन घ्यावेत. वरुन लाल तिखट व कोथिंबीर पेरावी.


Moodi
Wednesday, December 14, 2005 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश हे तर एकदम खुसखुशीत लागते. अहो आणी ते मठिया आणखीन आहे की मटकीच्या पीठाचे पातळ पापडासारखे लाटुन तळतात बघा. अर्थात, फाफड्यासारखेच आहे ते. पण हे तर फारच छान लागते.

Karadkar
Wednesday, December 14, 2005 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मुडी तुला मठरी म्हणायचेय का?

Sharmila_72
Thursday, December 15, 2005 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडीबेन, तमारी वात साची छे. मठीया बनावा माटे मठ ना लोटनोच वापर होय. मने रेसिपी मळशे तो चोक्कस आपीश. पछी तमे मठीया अने फाफडा बनावजो अने हुं उंधिया बनावीश. बहु मज्जा ने लाईफ ..... सुं कहो छो दिनेशभाय?

Moodi
Thursday, December 15, 2005 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर अन शर्मिला मला ज्या मठिया मठाची म्हणजेच मटकीच्या डाळीपासुन बनवतात त्याची रेसेपी पण हवीय. मठरी ही पंजाबी लोकात मैदा, ओवा असे मिक्स करुन ते भिजवुन त्याच्या पुर्‍या करुन तळतात किंवा मग बेक करतात.
मात्र मठिया हा गुजराथीच प्रकार आहे. भारतात माझ्या शेजारच्या गुजराथी काकुनी केल्या होत्या. मी विसरले पण थोडे अंधुक आठवतय की मठाची दळलेली डाळ ३ पावशेर म्हणजे पाऊण किलो अन त्यात पावशेर किंवा आतपाव उडिद डाळ असे एकत्र करुन घट्ट भिजवुन पातळसर लाटतात अन लगेच तळतात. मी इथे तयार घेतल्या पण त्यात खुप साखर आहे.


Moodi
Thursday, December 15, 2005 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला एवढे छान गुजराथी कुठे शिकलीस? दिनेश यांचा तर प्रश्नच नाही.

Sharmila_72
Thursday, December 15, 2005 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, रुचिरामध्ये मटकीचे पापड आहेत. तुझ्याकडे आहे का रुचिरा? त्यात पाऊण किलो मटकीची डाळ व पाव किलो उडदाची डाळ आहे. बाकी पद्धत नेहमीच्या पापडांप्रमाणेच.
आणि अगं मुंबईत राहिल्यावर गुजराती येतच बहुतेकांना. आणि माझी आई born and brought up in अहमदाबाद असल्यामुळे जरा polish चढलं त्यावर. तस तुझं पण छान आहे की गुजराती. वाचलं मी तिथे म्हणून तर मूड आला बोलायचा !


Dineshvs
Thursday, December 15, 2005 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर मठरी वेगळी आणि मठिया पण वेगळ्या. खाकरा पण मटकीच्या पिठाचा करतात. मटकीचे पीठ वापरले तर जास्त कुरकुरीत होतो.
आपण मात्र मटकी मोड काढुनच खातो. मटकीची डाळ पण आपण खात नाही.
मटकीच्या पापडाला पाऊण किलो मटकी डाळ घेतली तर पाव किलो ऊडीद डाळ घेतात.

घणु सारु सर्मिला बेन, जमवामाटे जरुर पधारो. ओळखाण थशे.


Moodi
Thursday, December 15, 2005 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश म्हणुन तर उड्या मारुन मी मटकी म्हणजे मठ घरुन दळुन इकडे पीठ आणले तर ते कडु अन चिकट लागतेय. त्याचा खाकरा कसा करणार भिजवले अन ३ पुर्‍या तळुन पाहिल्या अन खाववेना. दिले टाकुन. डाळ फार जुनी होती असे वाटते. पीठ भिजवले तर हातातुन कोरडे पीठ लावल्याशिवाय सुटेना.

Veenah
Thursday, December 15, 2005 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा गुजराथी तून छान गप्पा चालल्यात! मुडी, नयना शहा चे नवनीत publication चे "Aneri- My favourite recipes" पुस्तक आहे का तुझ्यकडे? ह्यात मटकीच्या पीठाच्या मठीया दोन तर्‍हेच्या पद्धतीने दिल्यात. नसेल आणि जर तुला रेसिपी हवी असेल तर टाकीन मी इथे. (पण ह्यात साखर पण घालाची असे आहे.)

Veenah
Thursday, December 15, 2005 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईग...! पीठ टाकुन पण दिलेस? आता कशी करणार ग मठीया?

Moodi
Thursday, December 15, 2005 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वीणा जरुर टाक रेसेपी. माझ्याकडे नाहिये ते पुस्तक. अन तू सांगीतलेले मश्रुम सुप टाकतेय मी आज. आता जरा काम आवरतेय एक १५ मिनिटे लागतील.

अग पुर्ण पीठ नाही टाकले, फक्त भिजवलेलेच टाकले.


Veenah
Thursday, December 15, 2005 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी उद्या नक्की टाकते मलाही इथे येऊन बराच वेळ झाला. अजून कामपण आहे. सुप साठी thanks in advance.

Dineshvs
Thursday, December 15, 2005 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मटकी भिजवुन, वाळवुन, दळायची असते. मग चिकट होत नाही. आता त्या पिठात कणीक मिसळायला हवी.

Moodi
Thursday, December 15, 2005 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश अन वीणा. दिनेश बघते तसे करुन. मात्र तरी कडु लागले तर कठिण आहे.

Veenah
Friday, December 16, 2005 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MATHIYA
Ingredients:
500 gms Muth flour.
150 gms urad flour
50 gms chowli flour
1 tsp sesame seeds
½ tsp omum(ajawain)
2 tbsp white chilli powder
a pinch asafoetida
5 tsp sugar
1 tbsp ghee
Oil for frying
Salt to taste.
Method:
1. Boil 1 cup of water Add salt and sugar to it. When it boils remove it from the flame.
2. Add 1 tbsp ghee to it. Mix flour, sesame, omum, white chilli powder & asafetida. Knead the dough with luke warm water. Knead a hard dough.
3. Knead well till the dough is soft. Divide the dough into small portions. Cream ghee and muth flour together light and fluffy(Do not heat the ghee). Roll each portion with this flour and ghee mixture.
4. Roll out into thin roti. Keep aside uncovered for sometime. Then cover them with a cloth. Fry them in very hot oil.
Note: the addition of chowli flour is optional.

THICK MATHIYA
Ingredients:
250 gms muth flour (fine)
Oil
1 ½ tsp red chilli powder.
½ tsp omum (ajawain)
½ tsp sesame seeds
1 tbsp powdered sugar
25gms wheat flour
salt to taste.
Method:
1. Mix flour, enough oil andall themasalas. Add wheat flour andknead the dough.
2. Knead very well till it becomes soft and smooth. Divide thedough into small portions. Roll out each portion into small andthick mathiya. Fry themathiyas in very hot oil.


Moodi
Friday, December 16, 2005 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वीणा दोन्ही कृतींबद्दल मनापासुन धन्यवाद. अग पण फक्त कणीक न घालता मी बाकी सर्व घालुन ही खालची २ नंबरची कृती केली होती पण खुप कडू लागले अन खाववेना. पण तू लिहिलेस तसे परत एकदा करुन पाहिन अन मग सांगेन.

Veenah
Friday, December 16, 2005 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, पीठ बर्‍याच दिवसापासुन आहे का? तर त्यामुळे कदाचित कडू नसेल ना लागत. पहीली कृती ने केलीस तर पातळ तू म्हणतेस तशा मठरी होतील. Good Luck!

Moodi
Friday, December 16, 2005 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वीणा पीठ ताजे आहे ग, पण कदाचीत डाळ जुनी असावी. बघेन करुन परत एकदा. thanks again

Nandita
Friday, December 23, 2005 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

idnaoXacyaa roisaip p`maanao kala mauizyaa kolaa Cana Jaalaa hÜta Dineshjii Thanx :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators