Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
थाई

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » थाई « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 13, 200620 02-13-06  4:40 pm

Anjalisavio
Tuesday, February 14, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश खरच सोप्पे प्रकार आहेत. ऊद्याच संध्याकाळी करुन बघते.

Charu_ag
Saturday, March 11, 2006 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन दिवसापुर्वी एक थाई रेसिपी पाहिली. विसरण्या आधी लिहुन ठेवते.

यात चिकन वापरायचे आहे. चिकन ऐवजी मशरुम वापरुन केले तरी चालेल.

ऑलिव्ह ऑइल मध्ये चिकण परतुन घ्यायचे. बाजुला ठेवायचे. याच कढईत लांब चिरलेला मोठा कांदा परतायचा. त्यात सिममा मिरचीचे उभे तुकडे, लेमन ग्रास चे लंबट तुकडे पण परतुन घ्यायचे. थाई रेड करी पेस्ट घालुन थोडा वेळ परतायचे. मग परतेलेल चिकन घालुन नारळाचे दुध घालुन उकळायचे. मीठ चवी प्रमाने.

ही करी करत असतानाच दुसरी कडे lasagne उकळत्या पण्यात शिजवुन घ्यायचे. एका कढईत बटर वितळुन त्यात नारळाचे पाणी घालुन त्यात शिजलेले lasagne घालायचे आणि उकळी करायची.

सर्व करताना अर्धा lasagne आणि त्यावर चिकन करी असे करावे.Maku
Tuesday, December 19, 2006 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dinesha da tofu india madhe kuthe milate sangata ka mala plzz

thanks
maku

Dineshvs
Tuesday, December 19, 2006 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maku तोफ़ु मुंबईत कुठल्याहि साधारण मोठ्या सुपरमार्केटमधे मिळु शकेल.
तो याच नावाने ओळखला जातो. सुटा मिळत नाही. फ़ॉईलमधे पॅक केलेला असा लांबट पाकिटात मिळतो. साधारण पनीरसारखाच दिसतो, पण जरा मऊ असतो व रंग जरा ऑफ़ व्हाईट असतो. अर्थात चीजप्रमाणे याचे अनेक प्रकार आहेत. याला पुर्वी बीन कर्ड असेहि म्हणत असत. त्यावेळी तोफ़ु हा शब्द फ़ारसा प्रचलित नव्हता.
त्याच्या जागी पनीर वापरता येते.


Maku
Tuesday, December 19, 2006 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माला वातले की फ़क्त japan मध्येच मिलतो तोफ़ु. health ल खुप चान्गला आसतो.

पुन्यामध्ये कुथे मिलेल तोफ़ु माला ज़रा सान्गता का.

thanks in advance

Maku
Tuesday, December 19, 2006 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तोफ़ु ला चव नसते ना. माज़्या friend ने आनले होते एकदा.

Nalini
Tuesday, December 19, 2006 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईशिका,तुझ्या मैत्रिणीने कुठून आणले होते? जपानहुन का? :-)
तु पुण्यात कुठे असतेस? म्हणजे तुला एखादे जवळचे मार्केट सुचवता येईल.


Dineshvs
Tuesday, December 19, 2006 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात आता बरीच सुपरमार्केट्स झालीत. कुठल्याहि मोठ्या दुकानात, खास करुन जिथे फ़्रोझन सेक्शन आहे, तिथे मिळायला हवा.
सोयाबीन भिजत घालुन, वाटुन त्याचे दुध काढतात. त्याचे वरचे पाणी काढुन ते शिजवतात आणि मग परत दाब देऊन त्यातले पाणी काढतात, तोफ़ु करायची साधारण हि रित आहे.
मी करुन बघितला नाही, पण प्रयोग करायला काय हरकत आहे ?


Maku
Wednesday, December 20, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तोफ़ु frozen मिलतो का. जर घरी करायची पद्धत सोपी आसेल तर मला पन सान्गा.

तोफ़ु ने वजन कमी होते ना.


Robeenhood
Wednesday, December 20, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तोफु म्हणजे मला वाटते सोयाबीन दुधाचे पनीर. त्याला स्वत:ची चव नसावी. त्यात जे टाकू त्याप्रमाणे चव येते..
तोफुने वजन कमी होत नाही वाढायचे थाम्बते.. अर्थातच carbohydrate intake कमी केला तरच...


Dineshvs
Wednesday, December 20, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही पद्धत ट्राय करुन बघा.
पाव किलो सोयाबीन घेऊन, दोन तीन वेळा धुवुन रात्रभर भिजत घाला. मग ते पाणी घालुन अगदी बारिक वाटा. तयार झालेले मिश्रण चारपदरी फडक्याने गाळुन घ्या.
वाटताना जर फार पाणी वापरले असेल तर जरा वेळ निथळु द्या. वरचे पाणी अलगद ओतुन टाका.
मग मिश्रण गरम करत ठेवा. उकळी यायच्या आधी गॅस मंद करुन, सात आठ मिनिटे, अगदी मंद आचेवर गरम करा.
एवढ्या दुधासाठी १० ग्रॅम कॅल्शियम सल्फेट, गरम पाण्यात विरघळुन घ्या, आणि ते या दुधात मिसळा. हलक्या हाताने ढवळुन, थोडा वेळ तसेच ठेवा. हळु हळु ते दह्यासारखे घट्ट होवु लागेल. मग पनीरप्रमाणे ते टांगुन ठेवा. झाले टोफ़ु तयार.
हा अगदी सोपा प्रकार, याच्या अनेक पद्धती आहेत.
सोयाबीनचा भारतात प्रसार होण्यापुर्वी, कच्च्या शेंगदाण्याचेहि दुध काढता येते, असा प्रचार केला जात असे.
पण काहिहि खाऊन वजन कमी कसे होईल, काहि खाल्ले नाही तरच वजन कमी होणार ना. ?


Zee
Sunday, December 24, 2006 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला पाड थाय नूडल्स ची रेसेपी माहिती आहे का?

Vrushs
Saturday, July 21, 2007 - 12:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, please pineapple fried rice ची recipe माहिती असेल तर टाका ना.

Dineshvs
Saturday, July 21, 2007 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vrushs दोन चार दिवस फ़िरकता आले नाही इथे. खरे तर जो चायनीज फ़्राईड राईस लिहिला आहे तीच कृति इथे चालेल. फक्त थोड्या ताज्या कोलंब्या, चमचाभर श्रींप पेस्ट परतुन घ्यावी लागेल. हॉटेलमधे टिनमधला अननस वापरतात. पण जर ताजा आणि घट्ट अननस, चकत्या करुन ग्रिल करुन वापरला तर आणखी खमंग होईल. जर मासे नको असतील तर मसाल्यात लाल मिरच्या, आले लसुण यांची पेस्ट करुन ती तेलात परतुन घ्यावी.

Vrushs
Saturday, July 21, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank U दिनेशदा, मी नक्की करुन बघेल. तुम्ही नवीन लोकांची सुध्दा नेहमीच लगेच दखल घेता त्यामुळे आम्हालाही participate करावेसे वाटते.

Amruta
Sunday, July 22, 2007 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hello दिनेश, कसे आहात?
zee, pad thai अतिशय सोप आहे. त्यासाठी लागणार्‍या वस्तु
rice noodles, brocolli, baby corn, bean sprouts, carrots शेंगदाणा कुट.
आता noodles उकडवायच्या आणि drain करायच्या.
भाज्या फ़्राय करुन त्यात noodles आणि fish souce घालायचा. मग प्लेट मधे घालुन वर bean sprouts आणि शेंगदाणा कुट घालुन खायच.
मी fish souce घालत नाही कारण त्यात नक्की काय काय असत माहित नाहिये.
दिनेश, वेज fish souce पण असतो अस ऐकलय पण त्यात नक्की काय काय असत सांगु शकाल का तुम्ही? वरिल साहित्य thai grocery store मधे मिळेल.


Prajaktad
Thursday, January 31, 2008 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोफ़ु ची एक (स्टार्टर) रेसिपी..
सेसिमी टोफ़ु:
फ़र्म टोफ़ुचे पसरट चोकौनी तुकडे करुन घ्यावे.. एका बॉउल मधे ईटालियन ड्रेसिंग, सोयासॉस, मिठ, मिरेपुड किंवा रेड पेपर फ़ेल्क्स एकत्र करावे.. ह्या मिश्रणात टोफ़ुचे तुकडे टाकुन ३ तास marinate करावे.
एका बेकिंग ट्रे मधे टोफ़ु पसरवुन वरतुन तिळ लावावे
ओव्हन ३५० F ला तापवुन त्यात बेक करावे..
broil असल्यास ३ एक मिनिट (लक्ष ठेवुन) ठेवावे..सुंदर रंग येतो..
चायनिज़ किंवा थाई वैगरे पदार्थ (पार्टिला ) असतिल तर
स्टार्टर म्हणुन किंवा एरविही स्नक्स म्हणुन मस्त लागत..


Vrushs
Friday, February 01, 2008 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, छान वाटतेय रेसिपी. पण ब्राॅईल असल्यास म्हणजे बेक केल्यावर ब्राॅईल करायचे ना?

Prajaktad
Friday, February 01, 2008 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो व्रुश ! बेक केल्यावरच ब्रॉईल करायचे म्हणजे वरतुन ही छान कलर येतो आणि क्रिस्पी चव येते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators