Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चिवडा

Hitguj » Cuisine and Recipies » दिवाळी फराळ » चिवडा « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 01, 200524 11-01-05  5:13 am
Archive through November 02, 200620 11-02-06  6:27 pm

Karadkar
Thursday, November 02, 2006 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मम्मी ३-४ घाण्यानन्तर तिखट, मिठ, पिठीसाखर आणि हळत घालते. काजु, शेंगदाणे पण ती तळणीतुन तळून घेते. फ़ोडणी खुप कमी घालायची असते ह्या चिवड्याला कारण पोहे तळलेले असतात. खसखस आवर्जुन घालायची.

Arch
Thursday, November 02, 2006 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्‍याच tips मिळाल्या. मिनोती खसखस कशी घालायची? भाजून का?

Karadkar
Thursday, November 02, 2006 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग भाजुन नाही फोडणीमधे घाल.

Manuswini
Friday, November 03, 2006 - 12:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, वरती तुला सर्वांनी टीप्स दिल्या आहेत पण पण तु विचारलेस म्हणून लिहिते की फर काही फरक नाही प्रत्येकाची एक style आहे.

मी लक्ष्मिनारायण चिवडा खाल्ला आहे तो कधी इथे US market मध्ये येतो, कधी बनवतात देवालाच माहीती म्हणून तो पर्यन्त तो बेचव नी तेल्कत लागतो. कधी कधी त्याला वास सुद्धा येतो.

आई खालील style ने करते,

भाजलेले पदार्थ :
शेंगदाणे, डाळी,खोबरे तुकडे, खसखस(आई फोडणीत टाकत नाही कारण ती जळते नी चव जाते असे तिचे म्हणणे),
भाजलेला जरा सुकवलेला कडीपत्ता,धने powder ,
बेदाणे(न भाजता),

फोडणीत :
वाटलेली हिरवी मिरची, किंचीत हळद,आई मोहरी टाकत नाही,

हिंग अगदी शेवटी टाकते जळून जाईल म्हणून,
सुकवलेला कडेपत्ता, खोबरे, शेंगदाणे,डाळी मग धणा powder ,मिट हे सर्व छान मिरचीत परतले की पोहे टाकते, जरा खंमग मिरच्याच्या वासात परतले की मग खसखस, बेदाणे टाकून परतते. सरते शेवटी साखर.

हे ह्या Sequence मध्येच करते ती.

बघ तुला जे आवडेल ते :-)


Arch
Friday, November 03, 2006 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, संपदा, आणि मिनोती मला ८ पौन्डाचा चिवडा करायचा होता. आताच मी करून आले. तुमच्या सगळ्यांच्या tips वापरल्या. चिवडा छान झाला आहे. भरपूर काजू, बेदाणे, बदाम घातले आहेत. तळून कोथिंबीरपण घातली. तळलेल्या पोह्यांचा चिवडा मी पहिल्यांदाच केला. पण छान झाला, तुमच्या सगळ्यांमुळे. संपदा, आईला thanks सांग ग.

Sampada_oke
Friday, November 03, 2006 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, महान आहेस गं. ८ पौंडाचा चिवडा म्हणजे झाले काय???? थोडासा इथे पाठव ना.:-):-)
आईला सुद्धा हे सर्व ऐकून चक्कर आली.:-):-):-)


Me_mastani
Monday, March 26, 2007 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विदर्भाकडे कान्दा घालून पातळ पोह्यान्चा चिवडा करतात त्याची क्रुती कोणाला देता येईल का?

Mrinmayee
Monday, March 26, 2007 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांदा पातळ (उभा) चिरून वाळवायचा. तेलात खमंग तळायचा. तेच तेल चिवड्याच्या फोडणीला वापरायचं. बाकी चिवडा करायला कृती कुठलीही वापरली तर चालेल. पोहे आणि मसाला एकत्र मिसळताना हा कांदा पण घालायचा.
ओवन १५०-२०० डिग्रीज वर प्रिहीट करून त्यात एका ट्रे मधे पोह्यांचा फार पातळ किंवा फार जाड नसलेला थर द्यायचा. आणि ८-१० मिनिटं बेक होउ द्यायचं. पोहे अगदी कुरकुरित!!!! अजीबात भाजायची-परतायची भानगड नाही! पोहे फक्त फोडणीत मिसळले की १० मिनिटात चिवडा तयार!!


Bee
Tuesday, March 27, 2007 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्याच चिवड्यात वाळलेले खोबर्‍याचे तुकडे तळून टाकतात. त्याची चव मस्त येते..

Vj1
Thursday, March 29, 2007 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Fodanit phoe uniformly mix karne jarase trasache kaam ahe. open bhandyat fidnit phoe takle ki uniform raang / distribution hone jarase kathinach kaam ahe. Distribution zale tari chivada dampata sampata lakshat yete ki dabbyat khalchya chivadyat tel jastach ahe..mhanun ek upay..

Mothasa dabba gheun tyat baryapaiki 50% phoe bharun tyat thodi fodni takavi. Zakan lavun dabba chan paiki halvala, ulta pulta kela tar changalech..

Ya procedure ne tel kami lagate.. phakt phodanit jarasha masala anik halad jasti takavi mhanje final ocncentration chhan jamte..Me_mastani
Thursday, March 29, 2007 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद बी आणि म्रुन्मयी. आजच लागते कामाला.

Supermom
Wednesday, November 07, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणीतरी ओव्हन मधे पोहे किती वेळ, किती तापमानावर ठेवायचे चिवड्यासाठी हे सांगेल का?त्याने चिवडा छान कुरकुरीत होतो हे माहीत आहे कारण याआधी केलाय तसा. पण वेळ अन टेंपरेचर काही केल्या आठवत नाहीय.

Karadkar
Wednesday, November 07, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सु.मॉ. मी १७५ वर सधारण १० मि. ठेवला. ५ मिनीटानंतर एकदा खालीवर केले पोहे. आणि परात बाहेर काढल्या काढल्या पेपरवर पसरले. नाहीतर वाफेने मऊ पडतात.

Prr
Wednesday, December 12, 2007 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

US मध्ये चिवडा करायला कुठल्या brandचे पोहे वापरता?
i tried Bansi -Deep(Thin/pressed rice) in US.
नेहमी पोहे ५minत् भाजले जातात्. पण ईथे पोहे 10-15min भाजुनही क़ुरकुरीत होत नव्हते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators