Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
pnaIr maaKnavaalaa ...

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » पंजाबी » पनीर भाज्या » pnaIr maaKnavaalaa « Previous Next »

Dineshvs
Monday, July 08, 2002 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पनीर माखनवाला अनेक प्रकाराने करता येतो. त्यापैकी एक असा. पाव किलो पनीरचे चौकोनी तूकडे करून तळून घ्यावे. ( वाटल्यास पनीर जिरापावडर, आले लसूण व लिम्बू रसात मूरवून घ्यावे) पाच सहा काश्मिरी मिरच्या पाण्यात भिजत ठेवाव्या. तीन कान्दे पाण्यात ऊकळून वाटून घ्यावे. आठ दहा काजू व दोन चमचे खसखस बारीक वाटून घ्यावी.

तूप तापवून त्यात वेलचीचे दाणे व दालचिनी टाकवी मग एक चमचा आलेलसूण पेश्ट टाकावी. ती परतून कान्दा पेश्ट टाकावी. मग तीन चार टोमाटो वाटून टाकावे व तूप सूटेस्तोवर परतावे. मग लाल मिरच्या ( फ़क्त साले) वाटून घालाव्या. थोडे परतून हळद धणेजिरे पावडर व गरम मसाला टाकावा. थोडे दही घालून परत तेल सूटेस्तोवर परतावे. मग हवे तेवढे पाणी व मीठ घालून ऊकळावे. मग त्यात पनीरचे तूकडे टाकून जरा गरम होऊ द्यावे. मग पाव कप साय घोटून घालावी. खाली ऊतरून बारीक चिरलेली हिरवी मिरची व कोथिम्बिर घालावी.


Mumbai12
Tuesday, March 07, 2006 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल पनीर माखनवाला करुन बघितला एकदम मस्त झाला

Thank u Dineshji for gr8 (perfect) recipe.


Anilbhai
Tuesday, March 07, 2006 - 7:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे त्या पाच सहा काशिरी मिरच्यांच काय करायच रे?. त्या तश्याच पाण्यात ठेवायच्या का?. :-)

Moodi
Tuesday, March 07, 2006 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो भाई वर लिहीलय की. त्या मिर्च्या साले काढुन फक्त ती साले वाटुन मग पदार्थात टाकायच्या. बीया फेकुन द्या.

Anilbhai
Tuesday, March 07, 2006 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ. मला वाटल त्या लाल मिरच्या वेगळ्या आहेत. काश्मीरी मिरच्या हिरव्या असतात ना.

Rachana_barve
Thursday, May 04, 2006 - 11:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही लाल च असतात वाटत. काश्मीरी तिखट नसत का?

Tanya
Friday, May 05, 2006 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काश्मिरी मिरच्या लालच, आणि आकाराने लांबट असतात. त्या जास्त तिखट नसतात.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators