Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Spring Rolls

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » Spring Rolls « Previous Next »

Archananj
Tuesday, July 29, 2003 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

spring rollsche covers frozen section madhye miltat te anavet.
cabbage agadi barik chirun ghyawa.
carrot kisun ghyawe.
sadharan 1 cup cabbagela 1/3cup carrot ghyawe.
eka bhandyat chirlela cabbage,kislele carot, pandhari mire pud, 2 chamche soy sauce, chavila mith ani 2 chimti sakhar ekatra karun ghyawe.
nantar packet waril instructions follow karun sring rollchya cover madhye saran bharawe.
he classic receipe ahe. waril saranat agadi barikchirleli broccoli, bell pepper wagare hi ghalta yete. tasech shrimps kinva shredded chicken ghalta yete.

Dineshvs
Sunday, June 11, 2006 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घ्या स्प्रिंग रोल्स.
स्प्रिंग रोल्सचे सारण करताना वर सांगितलेल्या भाज्या वापरता येतातच. ते लोक आणखी बर्‍याच भाज्या वापरतात. पण एकतर त्या ईथे मिळत नाहीत आणि त्यांची चवहि आपल्याला रुचणारी नसते.
मला पर्याय म्हणुन. ऊकडुन कुस्करलेला सुरण, शिजवुन किंचीत मॅश केलेली पांढरी चवळी वा लाल चवळी, सोया मीन्स वैगरे सुचवावेसे वाटतात.
सोया मीन्स आधी कोमट पान्यात १५ मिनिटे भिजवुन घ्यावा. मग पिळुन काढावा. तेलात आले लसुण पेस्ट परतुन किसलेला कांदा परतावा. तो सुकला कि त्यात तिखट, टोमॅटो प्युरी परतावे. मग सोया मीन्स घालुन कोरडे करावे. हे ईतर भाज्यांच्या बरोबरीने वापरता येते. आपल्या आवडीप्रमाणे सारण करावे. हे सारण एका थाळ्यात घालुन तो तिरका करुन ठेवावा, म्हणजे त्यातले अतिरिक्त तेल व पाणी निथळुन जाते.
कव्हरसाठी अर्धा कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ़्लोअर आणि अर्धा कप तांदळाचे पीठ एकत्र चाळावे. त्यात थोडे तेल व मीठ घालुन घट्ट मळावे. अर्धा तास मुरु द्यावे, मग सुपारी एवढ्या गोळ्या करुन पातळ लाटावे. गोल लाटण्यापेक्षा लंबगोल लाटले तर चांगले. मग त्यावर आधी केलेले सारण पसरुन घट्ट गुंडाळी करावी. मैद्याची पेस्ट लावुन ऊघड्या बाजु दाबुन बंद कराव्यात. डीप फ़्राय करणार असाल तर रोल गोलच असावेत शॅलो फ़्राय करणार असाल तर तो रोल जरा चपटा करुन घ्यावा. व सोनेरी रंगावर तळुन काढावे. मग कागदावर निथळुन तेल निपटावे. तुकडे करुन वा तसेच आवडत्या सॉसबरोबर खावेत.



Manishalimaye
Monday, November 13, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे रोल तळण्याएवजी बेक केले तर फार छान लागतात आणि डाएटही होते

Manuruchi
Tuesday, May 20, 2008 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्प्रिन्ग रोल्स कर न्यासाटी समोस पट्टी वापरली तर चालेल का

Dineshvs
Tuesday, May 20, 2008 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो चालेल की. फ़क्त डीप फ़्राय करायचे असेल तर मैद्याच्या पेस्टने दोन्हीकडून बंद करावे लागेल.

Anaani
Tuesday, May 20, 2008 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्प्रिन्ग रोल्स करायचे असेल तर : best website:
http://www.videojug.com/film/how-to-make-crispy-vegetable-spring-rolls

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators