Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
palak pnaIr

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » पंजाबी » पनीर भाज्या » palak pnaIr « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 13, 200620 04-13-06  7:06 pm

Gajeetha1
Saturday, March 17, 2007 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

इथे पालक पनीरच्या खूपच मस्त रेसिपिज मिळ्याल्या...

ही रेसिपी मी करते तशी...

1) प्रथम पालकाची पाने निवडुन व धूवून घ्यावित...mixer मधे हलकिशी वाटुन घ्यावी

2)ऊकळत्या पाण्यात टाकुन 2 मिनिटात बाहेर काढावित

3)पनीरचे चौकोनी तुकडे करावेत...

4)एका पातेल्यात 1 मोठा कान्दा व 2 टोमेटो चिरून एका कढईत परतून् घ्यावेत , त्याताच आल्, लसुण ,मिरच्या टाकव्यात

5)वरील् मसाला मिxएर् मधे वाटुन घ्यावा

6) non stick कढईत प्रथम तेल टाकुन वरिल मसाला परतुन् घ्यावा..यात हळद, मीठः, तिखट, गरम मसाला घालावा
त्यात नन्तर वाटलेला पालक आणि पनीर् व्यवस्थित शिजवून घ्यावा....

झाल पालक पनीर तयार ...



Gajeetha1
Saturday, March 17, 2007 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tips:

1) या पालक पनीर मधे लिम्बाचा रस टाकल्यास छान लागते..

2) किवा दहि सुधा चालेल..

3) मी पनीर तळत नाही..विकतचे पनीर थोडे warm करते..

4) diet concious असल्यास olive oil वापरले तरी चालेल

Gajeetha1
Saturday, March 17, 2007 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i m so sorry..
a little mistake i made...
u no..this is the 1st time i am posting receipe so plz..
प्रथम पालकाची पाने निवडुन व धूवून घ्यावित...mixer मधे हलकिशी वाटुन घ्यावी

2)ऊकळत्या पाण्यात टाकुन 2 मिनिटात बाहेर काढावित ..
i mentioned it wrong..
plz rd that..1st spinach should be boiled n then put it in a mixer..


Gajeetha1
Saturday, March 17, 2007 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i hope now thrs no confusion...

Velachi
Wednesday, May 16, 2007 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khada masala mhanun fakta lavang , dalchini ani velachi glalavi ki kali miri pan takavi?

Dineshvs
Thursday, May 17, 2007 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिरिदाणे पण घालावेत. चांगला स्वाद येतो.

Sharmila_72
Thursday, May 17, 2007 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक अजून छान रेसिपी सांगू का पालक पनीर ची? जाणकारांनी दिलेल्या वरच्या सर्व टिप्स तशाच. फक्त वाटण्याचा मसाला खालिलप्रमाणे : (तीन जुड्या पालकासाठी)

२ मोठे कांदे, १ इंच आल, ८ पाकळ्या लसूण, ३ हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून धणे, १२ टेबलस्पून जिरे, ३ लवंगा, १ मोठी वेलची, १ तमालपत्र, ४ काळे मिरे, १ तुकडा दालचिनी(२"), ३ हिरवी वेलची.
हे सर्व मिक्सर मध्ये वाटून घेणे. तेल गरम करून मसाला छान परतावा. मग टोमॅटो प्युरी किंवा blanch करून घेतलेल्या टोमॅटो चे तुकडे घालावे. परतून वाटलेला पालक, उकडलेले मटार दाणे, मीठ घालावे. तळलेले पनीर चे तुकडे घालावेत. serve करताना serving bowl मध्ये काढून साजूक तूप गरम करून त्यात लाल तिखट घालावे व वरून ओतावे. ही रेसिपी अप्रतिम होते to the perfection . मी कधी बदल म्हणून ह्या, कधीतरि दिनेश यांच्या रेसिपी प्रमाणे पालक पनीर करते.

* चुकून १२ टेबलस्पून जिरे आल. खर तर 1/2 म्हणजे अर्धा टेबलस्पून लिहायच होत. बर झाल वाचल म्हणुन edit केल लगेच.


Prady
Thursday, May 17, 2007 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पण एक टिप. मी पण शर्मिलाच्या रेसेपीनेच कराते. त्यात थोडीशी काजुची पेस्ट घालायची आणी उतरवताना थोडं क्रीम. पार्टी साठी करायचं असल्यास एकदम शाही पालक पनीर.

Supermom
Thursday, May 17, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला, तुझी रेसिपी खूप आवडली. या रविवारी करेन म्हणतेय. पण माझा असा अनुभव आहे की कांदा वाटून घेतला की कडू लागतो. यावर काही उपाय आहे का?

Sharmila_72
Thursday, May 17, 2007 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, मी mention करायला विसरले. ही रेसिपी निर्मला टिळक यांच्या 'पार्टी पार्टी' पुस्तकातली आहे. फार छान पुस्तक आहे. फक्त व्हेज रेसिपीज आहेत पण अगदी परफेक्ट आहेत. डोळे झाकून mechanically जस लिहिल आहे तस करत जायच. प्रमाण वगैरे जस्सच्या तस्स. कधी मिळाल तुला तर जरूर घे. माझी आठवण काढशील नेहमी बघ.
बाकी त्या कांदा कडु होण्याबद्दल मला वाटत दिनेशनी एकदा याबद्दल सांगितल होत I am not sure but . पुसटस आठवतय. पण मला तसा अनुभव आला नाही. मी छोले करताना कांदा मिक्सर मध्येच पेस्ट करते. उलट जरा गोडावरच जातात त्यामुळे मसाले जरा जास्तच घालते मी छोल्यात.

हो ग Prady , खरच या रेसिपीत काजूची पेस्ट व क्रीम घातल्यावर खरच शाही होत. मी घातली होती एकदा. सुपरमॉम, बघ छान टिप मिळाली. तू पण काजूची पेस्ट add करु शकतेस नंतर कांदा कडु लागला तर


Prady
Thursday, May 17, 2007 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम कांदा उकडून मग mixer मधून काढ. उकडलेलं पाणी टाकून दे. किंवा कांदा थोड्या तेलात वा तुपात परतून वाटून घे. अजीबात कडू लागणार नाही.

Supermom
Friday, May 18, 2007 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स प्रज्ञा, शर्मिला.
या रविवारी करतेच पालक पनीर.
शर्मिला, या वर्षी भारतात आले की घेईन हे पुस्तक. हे आणि 'हमखास पाकसिद्धी' दोन्ही घ्यायचीच आहेत


Mrinmayee
Monday, July 02, 2007 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला, थँक्यु (पर्यायानी निर्मला टिळक यांना पण)! काल तुझ्या पध्द्तीनं पालक पनीर केलं. सगळ्यांना आवडलं.
सु. मॉ. कांदा तेलात परतून घेतला. टोमॅटो आणि पालक पण वेगवेगळे परतून घेतले.) शर्मिलाच्या कृतीतला कोरडा मसाला फारच मस्त!


Addy
Thursday, August 09, 2007 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला, काल तुमच्या पद्धतीने पालक पनीर केले. खूप छान झाले. सगळ्यांना आवडले. धन्यवाद.

Sonalisl
Friday, February 29, 2008 - 1:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



ईथे वाचुन पालक पनीर बनवलं होतं. छान झालं होतं. सर्वांना धन्यवाद. :-)

Chinnu
Tuesday, September 09, 2008 - 9:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, सही झाले होते पालक पनीर. शर्मिलाने सुचविल्याप्रमाणे शेवटी तूप गरम करून तिखट घातले आणि वर ओतले. सुंदर रंग आला. मी फोडणीत आल्याच्या काड्यांबरोबर पाकळी लसून पण बारीक करून घातला.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators