Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
डोसा

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » दाक्षिणात्य » डोसा « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 09, 200535 08-09-05  12:03 pm
Archive through December 12, 200620 12-12-06  11:20 am
Archive through March 04, 200820 03-04-08  6:53 pm

Manuswini
Tuesday, March 04, 2008 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, उबदार पाणी घाल नी चांगले घोटून घे तांदूळ पिठ नी कणीक. नी तवा आधी गरम करून घ्यायचा मग किंचीत बारीक करून पेपर डोसा सारखे गोल गोल फिरवत पातळ करत जायचे. मग हे झाले की गॅस मोठा करायचा.

छान कुरकुरीत होतात.
बाकीचे सांगतीलच.


Bee
Wednesday, March 05, 2008 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, उबदार पाणी नसतं.. कोमट पाणी म्हण.

Psg
Wednesday, March 05, 2008 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु म्हणते तसंच केलं होतं, तवा तापेपर्यंत मोठा गॅस, मग मध्यम.. काही समजेना बुवा.. उडीद डाळ घालू का चक्क तांदूळाच्या डोश्यात घालतो तशी?

Manjud
Wednesday, March 05, 2008 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, मी तांदूळाच्या पीठाबरोबर थोडं डाळीचं पीठ(बेसन) पण घातलं होतं. आणि आंबोळीसाठी मिक्स करतो तसं नुसतंच डावाने न ढवळता त्यातून ब्लेंडर फिरवला होता. डोसे उरपतले पण छान आणि बर्‍यापैकी कुरकुरीत पण झाले.

Princess
Thursday, March 06, 2008 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, अग डोश्याचे पीठ खुप वेळ हलव. रवी/ ब्लेंडर वापरल्यास उत्तम. असे खुप वेळ ढवळ्यानंतर निदान पाच मिनिट बाजुला ठेवुन दे. तवा चांगला गरम होऊ दे. मगच बनवायला सुरुवात कर. डोसे हमखास कुरकुरीत होतील.
असल्यास थोडे मुगाचे किंवा बेसनाचे पीठ घाल.


Psg
Thursday, March 06, 2008 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! ही रवी/ ब्लेंडर फ़िरवण्याची आयडीया चांगली आहे.. करीन आता प्रयत्न.. धन्स सख्यांनो :-)

Shailaja
Thursday, March 06, 2008 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न आंबवता करण्याचा डोसा
३ वाट्या तांदुळ, १ वाटी उड्दाची डाळ रात्रभर वेगवेगळे भिजत घालुन
सकाळी वाटुन घ्यावे व चविप्रमाणे मिठ घालुन चांगले फ़ेटुन निर्लेप च्या तव्यावर फ़क्त पहिल्यांदा तेल लावुन डोसे करावे (नंतर च्या वेळेस थोडा पाण्याचा शिपका मारला तरी चालतो)छान डोसे होतात

Manuswini
Thursday, March 06, 2008 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg , अग खूप घोटून घ्यायचे लिहिले ना मी वरतीच :-)
दुसरे म्हणजे मी ही जरासे बेसन घातले होते.

माझे अगदी पेपर डोस्यासारखे कुरकुरीत होते.

थांब पुन्ह केले की फोटोच टाकते.


Jadoo
Thursday, April 03, 2008 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बटाटा डोसा

२ मोठे बटाटे
१ कप तांदळचे पिथ
१ / २ कप दहि
२ हिर्व्य मिरच्या
कोथिंबिर
मिठ, पाणी, तेल

बटाटे उकडुन mash करुन घ्या. त्यात तांदळचे पिठ, दहि, मिठ, बारिक कापलेल्या मिरच्या घालुन निट mix करुन घ्या. नंतर डोस्याचि consistancy येइल एवढे पाणि घालुन एकत्र करा. नेहेमिच्या डोस्यासारखे तव्यावर तेल लावुन डोसे बनवा.
छान कुरकुरित डोसे होतात न पटकन करायला चांगले


Shraddhak
Friday, April 04, 2008 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१२ कप दहि<<<<
जादू, अगं अर्धा कप ( १ / २ कप) म्हणायचंय ना तुला? :-)
नाहीतर इथे लिहिल्याबरहुकुम करताना भलताच पदार्थ तयार व्हायचा.
:-)

Jadoo
Friday, April 04, 2008 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग श्रद्धा, अर्धा कप दहि म्हणायचे होते मला.. मी edit कसे करु शकेल ते post ? admin please ते १ २ कप चे अर्धा कप करा ना?

Arch
Saturday, April 05, 2008 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जादू, छान आहे ही recipe .कालच करून पाहिले. मी अजून एक short cut वापरला. उकडलेल्या बटाट्याऐवजी इथे मिळणारे mashed potato flakes वापरले. १० मिनिटांत दोसे तयार.

Thanks ग.


Manuswini
Saturday, April 05, 2008 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पौष्टीक भोपळा डोसा :
पिवळा धम्मक भोपळ्याचा उकडलेला mashed pulp टाकून पण अतीशय सुंदर डोसे होतात. किंवा कीस टाकून.

हाताने तो पल्प तांदूळाचे पिठात मिक्स करायचा मग पाणी Adjust करायचे. त्यात बारीक पुदीना,कोथींबीर चिरून टाकायची.

हिरव्या मिरच्या बारीक चिरून, थोडे दही नी मिठ. आंबवायची गरज नाही.

मस्त केसरी डोसे तयार. नी पुदीना चटणी घट्ट दही. त्रीरंगी.
आजच केले. फोटो टाकतेच आता. नक्की करून पहा.Jadoo
Monday, April 07, 2008 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arch Thanks कसले ग. चांगलि idea दिलीस बघ मी सुद्धा try करुन बघेल mashed potato flakes

Chafa
Tuesday, April 08, 2008 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जादू, मी हे काल करायचा प्रयत्न केला. पण हे डोसे जाम सुटेनात. चवीला मस्त झाले होते पण तांदळाचे पीठ जुने होते की काय कळेना ते नॉनस्टिक तव्यावरुनही मुळीच सुटत नव्हते. मग आज ते सगळे पीठ एका कुकरच्या भांड्यात घेऊन चक्क वाफवून काढले. आणि मग वड्या कापून फोडणी वगैरे काही न देता तसेच शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाल्ले. अफलातून लागले! तर अशा फसलेल्या प्रयोगातून मस्त पदार्थ जन्मला. :-O

मी बटाटे मायक्रोवेव्ह मधे ५ मिनिटात सहज मॅश होतील असे शिजवून घेतले होते.

कोणाला मुद्दाम असाही प्रकार करता येईल म्हणून इथे लिहीले. डोसे घालत बसण्यापेक्षा अजूनच सोप्पे! आणि तेल बिल काही नाही!


Itsme
Tuesday, April 08, 2008 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोसे सुटत नसतील तर वरुन थोडे तेल टाकावे आणि मंद आचेवर झाकण घालुन ठेवावे. लगेच सुटुन येतो. पुढचा दोसा टाकतान तवा चांगला तापलेला आहे याची खात्री करुन घ्यावी.

मी पण बरेच वेळा कंटाळा आला की, कींचीत साखर - मीठ घालुन, पिठ कुकर च्या भंड्यात वाफवुन घेते, मग ढोकळ्या सरख्या वड्या कापुन त्यावर लसुण - सुक्या मीरचीची फोडणी घालुन खाते. मस्त खमंग चव येते


Runi
Tuesday, April 08, 2008 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण कालच हे डोसे केले होते जादु ने सांगीतलेले. मला वाटले की माझे पीठ फार चिकट झालय म्हणजे दोसे तव्यावर पसरवताच येत नव्हते, ते लगेच चमच्याला लागुन निघुन येत होते. बटाटा जास्त पडला असेल का की अजुन काही? मी वर सांगीतलेलेच माप वापरले. मी तव्याचे तापमान कमी जास्त करुन बघितले पण फरक पडला नाही.

Jadoo
Tuesday, April 08, 2008 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Runi शक्यता आहे बटाटे चिकट असण्याचि. पण अजुन काय चुकले असेल माहिति नाहि. थोडे अजुन पाणि आणि तांदळचे पीठ टाकुन बघ जमले तर.
chafa मी बर्‍याचदा हे अनुभवले आहे कि मी डोसे करण्यापुर्वी तवा जर wash केलेला असेल तर पहिले ३-४ डोसे कधिच येत नाहित. म्हणुन जेंव्हा डोसे करायचे असतिल त्या आधि मि तवा wash करत नाहि फ़क्त ओल्या फ़डक्याने पुसुन घेते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators