Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तंदूरी नान

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » तंदूरी नान « Previous Next »

Rajasee
Monday, September 02, 2002 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Naan

garajenusar maida - here is one vati
2 pinch - dried yeast/powdered one
mith - chavinusar
jire/ova/kalounjee - avadinusar

maida garam panyat bhijvun ghene, bhijvtana tyat dried yeast 2 chamche dudhalat kalavle ghalane ani mith ghalane. te sadharan ardha tass ubdar thikani thevane changale ferment honyasathi - (Conventional oven madhe daar band karun)

nanatar te bhijvalele pith ek sarkhe karun ghene. nanatar jevdhya aakarache naan pahje astil tevdhi maidyacha unda gheun to hatane stretch karne kivva latnyane latle tari chalte. var aavdhi nusar jire, ova kivva kalunji bhurbhurne. cookie sheet var kivva pizza tray var ti poli tevun oven set-up broil var nyaycha darr ardhavt ughade thevayche ani coil lal disali ki mag ti poli oven madhe sarkavun brown rangavar kharpus bhajun ghaychi ani mag ultun dusari bajoo pan bhajaychi mag tyavar batar kivva tup ghalun garam-garam sarv karne.

same kruti roti sathi pan aahe(tandoor style - north indian one) fakt maidya aaivaji kanik vapraychi ani jire etc vaprayche nahi.

garam-garm khalyas ekdam ultimate lagte pan jarr swayampak karnaryala pan sarvan barobar jevayche asel tar mag nan/roti zalya-zalya air-tight container madhe band karne cotton towel madhye lapetun ani aaytya vela micro-wave madhe garam karun ghene.



Nalini
Wednesday, November 15, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नान साठी, आधी एका वाटीत कोमट पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा साखर व थोडे दुध घालायचे. त्यात यीस्ट घालुन थोडा वेळ तसेच ठेवुन द्यायचे. १० मिनिटात ते फसफसुन आले पाहिजे.
मग दोन कप मैदा चाळुन घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ व थोडे तेल घालुन एक खळगा करुन वरचे यीस्ट चे पाणी मिसळायचे. हलक्या हाताने मळुन अर्धा तास झाकुन ठेवायचे. तेवढ्यात ते पीठ फुगले पाहिजे. मग ऊलट्या मुठीने थोडे तेल लावुन ते परत मळुन घ्यायचे. त्याचे गोळे करुन परत झाकुन ठेवायचे. मग हलक्या हाताने जाडसर चपाती लाटायची. त्यावर हवे तर कसुरी मेथी, बडीशेप वैगरे लावु शकतो. लसुण लावला तरी छान लागतो. त्यावर काट्याने टोचाय्चे. मग तो तव्यावर टाकायचा. थोड्याच वेळात त्यावर उंचवटे तयार होतील आणि तो फ़ुगु लागेल. असा फ़ुगलेला नान तव्यावर ऊलटला तर नीट भाजला जात नाही, म्हणुन तो अलगद गॅसवर शेकायचा किंवा ग्रील करायचा. गरम असतानाच वर butter लावायचे.

यीस्ट किती घ्यावे? मी अंदाजे चमचाभर घेतले होते.

ही कृती दिनेशदादाची आहे. ह्या पध्दतीने नान खुपच मस्त होतात.


Karadkar
Wednesday, November 15, 2006 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, पुढच्यावेळी नान भाजताना आपला जो लोखंडी तवा असतो ना तो उपडा ठेव गॅसवर आणि त्यावर नान भाज एकदम छान खरपुस भाजले जातात आणि अगदी तंदुर मधे भाजल्यासारखे लागतात.

Lajo
Thursday, November 16, 2006 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी तरी सांगितले होते की आपली लोखंडी कढई किंवा एखाद घमेलं गॅस वर उपड टाकायच आणि त्याच्या आत नान लावायचे. छान भाजले जातात, अगदी तंदूर मधे भाजल्या सारखे. मी कधी try केले नाही कारण माझ्याकडे इथे लोखंडी कढई ही नाही आणि इथल्या hardware store मधे घमेलं ही मिळाल नाही. कुणीतरी प्रयोग करुन बघा ना...

Dineshvs
Thursday, November 16, 2006 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाकरीचा जो खोल तवा असतो तो तवाच जरा तापवुन त्यावर नान टाकायचा आणि मग तो गॅसवर उपडा घालायचा. पण याला जरा कौशल्य लागते.
किंवा तो खालच्या बाजुने झाला कि ग्रिल करायचा.
नलिनी चांगले झाले होते का ? करणारिचे पण कौशल्य असतेच कि


Nalini
Thursday, November 16, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदादा अगदी मस्त झाले होते. माझ्या एका ईराणीय मैत्रिणीने सुद्धा शिकुन घेतले.
मिनोती, पुढच्या वेळी मी करुन पाहिन.


Prajaktad
Thursday, November 16, 2006 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे एकदा संजिव कपुरने बाहेरच्या झाकणाचा कुकर वापरुन नान कसे करायचे ते दाखवले होते..


Dineshvs
Thursday, November 16, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे कडेला थापुन ना ? पण मी मागेहि अनेकवेळा लिहिले होते कि प्रेशरकुकरचा असा उपयोग करु नये. तो धातु, डिझाईन वैगरे अश्या पद्धतीसाठी तयार केलेले नसते.

Chinnu
Friday, November 17, 2006 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलीनी, दिनेशदा thanks! . नान खुप मस्त झाले होते. मी बर्नरवरच भाजले, तरी छान आलेत.

Savani
Friday, December 01, 2006 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, दिनेशदा, मी काल ह्या नान करुन पाहिल्या. छान झाल्या हं. धन्यवाद.

Wel123
Saturday, November 17, 2007 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yeast na waparata naan banawata yeto ka?

Dineshvs
Sunday, November 18, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यीस्टशिवाय नानचे पिठ आंबणार नाही. तयार यीस्ट वापरायची नसेल तर नैसर्गिकरित्या पिठ आंबवावे लागेल. पण तसे केल्यास बुरशी येण्याची शक्यता असते.
नैसर्गिकरित्या पिठ आंबवायची रित इथे आहेच.
एक छोटासा मैद्याचा गोळा कपभर कोमट पाण्यात बुडवुन ठेवला तर साधारण चोवीस तासात तो आंबुन, फ़सफ़सतो.
त्याला टिपिकल बेकरीमधे येतो तसाच वास येत असेल, आणि त्यावर काळे, तपकिरी वा लालसर डाग दिसत नसतील, तर बहुदा ती नैसर्गिक यीस्ट असते. ( हा वास सवयीने नक्कीच समजतो. ) मग हे पाणी वापरुन साधारण अर्धा किलो मैदा भिजवला तर तो सहा ते आठ तासात फ़ुगतो.
यीस्ट वापरणे अजिबात गैर नाही, द्राक्ष, सफ़रचंद यासारख्या फळांवर नैसर्गिकरित्या यीस्ट असतेच.
पण काही जणाना यीस्टची अलर्जीही असू शकते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators