Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 28, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » दिवाळी फराळ » शेव » Archive through July 28, 2006 « Previous Next »

Priya
Tuesday, October 25, 2005 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ek vaaTI paNaIÊ caar maÜzo camacao tola ho hand blender nao BarpUr vaoL GausaLayacao. naMtr %yaat cavaIp`maaNao itKTÊ maIzÊ AÜvyaacaI puD AaiNa %yaat maavaola [tko baosana Gaalayacao. pIz saaQaarNa pÜL\yaaMcyaa kNako[tpt saOla Asalao trI caalaola. jaast Ga+ nakÜ naahI tr saÜáyaanao Xaova paDtanaa hat duKUna yaotat. saÜáyaamaQyao XaovaocaI caktI zovaUnaÊ ipzacaa gaÜLa Barayacaa. kZšt tola caaMgalao taplao kI %yaatca Xaova GaalaayacaI. AatUna sau$vaat k$na baahor yaayacao. eka baajaUnao tLUna JaalaI kI ]laTUna dusaáyaa baajaUna tLUna GyaavaI. ]laTlyaavar jaast vaoL laagat naahI. jaÜ ek GaaNaa Gaatlaa jaatÜ %yaalaa cavaMgaa Asaa gamatIXaIr Xabd vaaprlaa jaatÜ.

kahI izkaNaI ek vaaTI paNaI AaiNa ek vaaTI tola GaotatÊ tI KUp jaast KusaKuXaIt hÜtoÊ tola qaÜDo kmaI Asalao tr ikMcaIt kDkDIt hÜtoÊ pNa tola jaast pIt naahI tLtanaa. AaiNa %yaamaulao baroca idvasa raihlaI trI tolaacaa vaasa yaot naahI. AamhaMlaa Xaova AtI KusaKuXaIt AavaDt naahI %yaamauLo maI kmaI tola Gaalato.

AgadI baarIk BaÜkacaI caktI vaaprlaI Asaola tr baosanaÊ itKTÊ AÜvyaacaI pUD sagaLo sapITacyaa caaLNaInao caaLUna Gyaavao.


Vidyat
Wednesday, October 26, 2005 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

\Thanks priya, Tu sangitlya pramane shev keli. chan zhali

Priya
Wednesday, October 26, 2005 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ivaVaÊ Aavajau-na saaMigatlyaaba_la Qanyavaad. tulaa maahItca AsaolaÊ pNa XaovaÊ caklaIÊ icavaDa vagaOro kÜNatahI pdaqa- pUNa- gaar JaalyaaiXavaaya Dbyaat BaÉna zovaU nayaot. ma} pDtÜ.

Moodi
Thursday, July 27, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृती छान आहे गं प्रिया. दिवाळीतच काय इतर वेळी पण छान वाटते खायला.



Moodi
Thursday, July 27, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिखट शेव.

साहित्य : २ वाटी बेसन, २ चमचे तिखट, १ चमचा ओवा, १० पाकळ्या लसूण, चिमुटभर मीठ, तेल.

कृती : लसूण, तिखट, ओवा अन मीठ हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. बेसन चाळून त्यात हे वाटलेले मिश्रण घालावे. थोडे थोडे पाणी घालून चांगले मळुन घ्यावे. मळतांना तेल लावून मळावे. अन लगेच शेव बनवून तळावी.


Moodi
Thursday, July 27, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्नाटकी शेव.

साहित्य : तांदळाची घरी बनवलेली बारीक मऊ पिठी ३ वाट्या, अर्धी वाटी बेसन, पाव वाटी लोणी, मीठ, हिंग, तेल, तिखट

कृती : पिठी व बेसन चाळून घ्यावे. एकत्र करुन त्यात मीठ, जीरेपूड / ओवापूड, तिखट तसेच लोणी घालुन चोळून एकत्र करावे. पाण्यात थोडा हिंग घालुन त्या पाण्याने हे सर्व पीठ मळावे, मळतांना तेल लावावे. अन मग शेव करावी.


Moodi
Thursday, July 27, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लसूण शेव.

साहित्य : २ वाटी बेसन, २ टेस्पुन मटकीचे पीठ( नसल्यास कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा), मीठ, तिखट, १ लसणाचा गड्डा, ३ टेस्पून तेलाचे मोहन, ओवा किंवा जीरेपूड

कृती : मीठ अन लसूण बारीक वाटावे, त्यातच तिखट, ओवा घालून परत वाटावे. हे मिश्रण बेसन अन मटकीच्या पीठात घालावे. हळू हळू पाणी घालून तेलाच्या हाताने चांगले मळून शेव करावी अन तळावी.

दुसर्‍या प्रकारात लसूण थोड्या पाण्याबरोबर वाटुन ते पाणी गाळुन त्या पाण्याने बेसन भिजवुन शेव करावी. लसणाचे प्रमाण कमी केले तरी चालेल.


Moodi
Thursday, July 27, 2006 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टॉमेटो शेव.

साहित्य : १ वाटी टॉमेटोचा रस, बेसन अंदाजे, मीठ, जीरेपूड, तिखट, अर्धा ते १ टीस्पून, १ उकडलेला बटाट्याचा लगदा.

कृती : सर्व ओले साहित्य ( टॉमेटो रस, ३ ते ४ थेंब लिंबाचा रस तेल वगैरे) एकत्र करुन त्यात मावेल एवढे बेसन अन बटाट्याचा लगदा घालावा. सर्व एकत्र करुन मळून त्याची शेव करावी अन तळावी.


Rachana_barve
Thursday, July 27, 2006 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी पापडखार नाही टाकायचा? आणि त्याचा काय फ़ायदा असतो ते पण सांग ना? आंबटसर चव होते का त्याने?

Savani
Thursday, July 27, 2006 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पापडखार शेवेत पण घालतात का? मला वाटत होतं फ़क्त पापडांसाठीच वापरतात.

Seema_
Friday, July 28, 2006 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान वाटती आहे recipe , tomato च्या शेवेची मुडी . पण कुठला साचा वापरायचा असतो ? अगदी बारीक का medium ?.

Bee
Friday, July 28, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा साचा कुठलाही वापरू शकतेस पण चकती मात्र मध्यक छिद्रांची घे नाहीतर ओवा जिरे ह्यामुळे शेव बाहेर पडणार नाही. आणि जरा मलाही पाठव थोडे शेव.. एकटीच हादळू नकोस :-)

मूडी माझ्याकडे साचा नाही, अन्यथा ही कृती माझ्या हातची होती :-(


Moodi
Friday, July 28, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, सावनी पापडखारामुळे पापड जसा फुलतो तसा शेवेत खुसखुशीतपणा येत असावा. मी पापडखार तिथे लिहायचा विसरले सॉरी. पण जर पापडखार नसेल तर बेकिंग सोडा किंवा पावडर अर्धा टीस्पून घालु शकता. काल संध्याकाळी मी दिनेशनी लिहीलेला फाफडा करुन बघितला, छान झाला. पण त्यात बेकिंग सोडा घातला होता.

पापडखाराबद्दल दिनेश सांगतील.

सीमा मध्यम आकाराची चकती घे( मध्यम जाडसर शेव छान लागते, इथे मी विकतची हल्दीरामची निंबु मसाला शेव आणलीय, तिच्यात कांदा, लसूण अन टॉमेटो पावडर आहे.)

बी अरे शेवेत ओवा अन जीर्‍याची पूड घालायची असते, अख्खे ओवा चकलीला चालतात.

जर लसणाची शेव करायची असेल तर तो लसूण पाण्याबरोबर वाटुन ते पाणी गाळून त्या पाण्याने बेसन भिजवा म्हणजे तिखट अन उग्र चव येणार नाही. लसूण कमी वापरला तरी चालेल, म्हणजे पूर्ण गड्डा नकोच.

बी भारतीय स्टोअर्समध्ये मिळेल की साचा.


Bee
Friday, July 28, 2006 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक कल्पना सुचली आहे. जर मेणकापडी थैलीला बारीक छिद्र पाडले आणि त्यात जर शेवाची कनीक भरली तर शेव पडणार नाही का? मेंदीच्या कोणातून मेंदी शेवासारखीच तर पडते. शिवाय घासाबिचायची गरज नाही..

मूडी, शेवाची कणिक किती पातळ भिजवायची. भजीच्या पिठाप्रमाणे की मेंदीसारखी घट्टसर?


Moodi
Friday, July 28, 2006 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीठ फार घट्टही नाही अन सैलही नाही अशा पद्धतीने भिजव.


Nalini
Friday, July 28, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी छान प्रकार सांगितलेस शेवेचे.
मला वाटते की शेवेत पापडखार किंवा बेकींग सोडा ह्या दोन्हींचीही गरज नसते. जाणकार सांगतीलच.
बेसन भिजवताना जर त्यात पालक मिक्सरला बारीक वाटुन व गाळुन घातला तर हिरव्या रंगाची शेव होते.
बी, शेवेचे पिठ हे पातळ कधीच नसते. सोर्‍यातुन दाबायला सोपे जावे म्हणुन जर पिठ सैलसर ठेवले तर शेव कुरकुरीत होत नाही.


Sanash_in_spain
Friday, July 28, 2006 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी टोमॅटो शेवेच्या कृती साठी thanks गं. मी बर्‍याच दिवसांपासून शोधत होते. पण एक सांग आपण जी विकत आणतो त्या टोमॅटो शेवेची चव आंबट, तिखट आणि किंचीत गोडसर असते बघ. तर ती गोड चव काय टोमॅटोच्या रसानीच येते का? लाल तिखटा बरोबर थोडी मिरपूड घातली तर आणखी थोडी spicy लागेल नाही का?

Moodi
Friday, July 28, 2006 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आश्विनी घालून बघ चिमूटभर मीरेपूड. अन गोड चवीसाठी मला वाटत त्या पीठात चिमुटभर साखर पण घालतात. तसे तुमच्याकडील टॉमेटो फार रसरशीत अन लालबुंद असतात, चव पण काहीशी आंबट गोड असते ना. कारण सारासाठी मी तेच टॉमेटो वापरते.

Savani
Friday, July 28, 2006 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, म्हणते ते बरोबर आहे. मी पण कधी पापडखार किन्वा सोडा घातला नाहीये शेवेत किन्वा ऐकले पण नाहिये. मला वाटते सोडा घातल्याने शेव तेल जास्त पिईल नाही का? मी प्रिया नी सांगितल्याप्रमाणे तेल +पाणी खूप फ़ेसून घेते.

Moodi
Friday, July 28, 2006 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पापडखाराची तशी जरुर नसतेच. माझ्या सासुबाई पण कधीच घालत नाहीत पापडखार. पण एकदा आमच्या इथे घरगुती उद्योग करणार्‍या एका कुटुंबाने पापडखार वापरलेला बघीतला होता. त्यांची शेव होती चांगली पण पापडखार वापरुही नये असे मलाही वाटते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators