Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नाचणीचे लाडू ...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » लाडू » नाचणीचे लाडू « Previous Next »

Dineshvs
Thursday, June 26, 2008 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कपभर नाचणी १२ तास पाण्यात भिजत घालावी. मग निथळून फ़डक्यात बांधून ठेवावी. तिला नाजूकसे मोड येतात. ते आले कि नाचणी उन्हात वाळवावी आणि मग त्याचे पिठ करावे. हे सगळे करण्या ऐवजी तयार नाचणीचे सत्व एक कप घेतले तरी चालेल.
एक कप सोयाबीनचे तयार पिठ. एक कप अख्या गव्हाचे पिठ, अर्धा कप रवाळ बेसन किंवा मूगडाळीचा रवा, हे सगळे तूपात खमंग भाजून घ्यावे.
पाव कप तीळ, पाव कप खसखसहि भाजून घ्यावी. अर्धा कप राजगिर्‍याच्या लाह्या घ्याव्यात. अर्धा कप मेथी भाजून त्याची पूड करावी ( यापैकी एखादा घटक नसला वा वगळला तरी चालेल )

हे सगळे घटक मोजून त्याच्या पाऊण पण, गूळ घ्यावा. ताडाचा गूळ मिळाल्यास उत्तम. तो बारिक करुन घ्यावा.
वरची पिठे गरम असतानाच एकत्र करावीत. भांडेही गरमच असावे. मग गॅसवरुन खाली उतरुन त्यात बारिक केलेला गुळ घालावा. भरभर ढवळावे. या उष्णतेने गूळ पातळ होतो, मग त्यात थोडे साजूक तूप घालून लाडू वळावेत.
आपल्या आवडीप्रमाणे यात स्वादाला, जायफळ, वेलची, केशर वगौरे घालता येते.
शक्य असल्यास, चिमुटभर सुंठ, चिमुटभर लवंगाची पुड घालावी.


Rupantar
Thursday, June 26, 2008 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thank you Dineshda......:-)
but there is just one issue, nachni che tayar pith waparle tar chalel ka... baki sagle ingredients miltil pan whole nachni seed milat nahiye(English naav mahit nahi ) . ladut dry fruits- kaju, badam , walnuts taktaa yetile ka? pregnancy madhye roj ha 1 ladu khalla tar safe aahe na?

Dineshvs
Friday, June 27, 2008 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाचणीचे तयार पिठ नक्कीच चालेल. फक्त ते चाळून घ्यायचे.
सुका मेवा, अर्थातच चालेल, पण तो आवश्यक नाही.
हा लाडू रोज खाल्ला तरी चालेल, पण हा पुर्ण जेवणाला पर्याय नाही. नेहमीचा आहार घेतलाच पाहिजे. शिवाय जर कॅल्शियम, आयर्न च्या गोळ्या घ्यायला सांगितल्या असतील तर त्याही घेतल्याच पाहिजेत.


Rupantar
Monday, June 30, 2008 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

THANK YOU DINESHDA...LADU KELYAWAR RESULTS JARUR KALWEN

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators