Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
दह्यातला साबुदाणा आणि थालीपिठ ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपवासाचे पदार्थ » दह्यातला साबुदाणा आणि थालीपिठ « Previous Next »

Dineshvs
Wednesday, March 26, 2008 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दह्यातला साबुदाणा

वाटीभर मोठे साबुदाणे घेऊन तव्यावर कोरडेच थोडे भाजून घ्यावेत. एखादा साबुदाणा तोंडात ताकुन चावून बघावा. तो खुटकन तुटून त्याचा चुरा झाला पाहिजे. न भाजलेला साबुदाणा चावायला चिवट लागतो.

दोन वाट्या पातळ ताक घेऊन त्यात मीठ साखर व जिरेपुड घालावी. त्यात हा भाजलेला साबुदाणा तासभर भिजु द्यावा. मग हलक्या हाताने तो मोकळा करावा. तुपाची जिरे आणि हिरव्या वा लाल मिरच्यांची फ़ोडणी करुन त्यावर ओतावी. मग घट्ट गोड दहि घेऊन त्यावर अलगद घालावे. हवी तर यावर थोडी मिरपूड घालून खावे.

साबुदाण्याचे थालीपिठ.

उपवासाची जी भाजणी मिळते त्यात साबुदाणा, वरी आणि राजगिरा यांचे मिश्रण असते. त्यात मीठ, मिरची घालुन सहज थालीपिठ करता येते. ती उपलब्ध नसल्यास.

अर्धी वाटी साबुदाणा एक वाटी पाण्यात भिजत घालावा. साबुदाण्याच्या आकाराप्रमाणे पाणी कमी जास्त लागते.
लाल भोपळा, कच्चा बटाटा, कच्चे केळे, सुरण, कोनफ़ळ, रताळे यापैकी जे उपलब्ध असेल त्याचा किस दीड वाटी घ्यावा. एखादा उकडलेला बटाटा त्यात कुस्करुन घालावा. त्यात आवडीप्रमाणे मीठ व मिरच्या घालाव्यात. चांगले मिसळुन घ्यावे. मग त्यात हलक्या हाताने भिजलेला साबुदाणा मिसळावा. तवा तापत ठेवुन त्यावर थोडे तुप लावावे. मग एका प्लॅस्टिकच्या तुकड्यावर किंवा फ़ॉईलवर आपल्याला हव्या त्या आकाराचे थालीपिठ थापावे. हवी असतील तर त्याला बोटाने आरपार चार भोके पाडावीत. कुठल्याही थापलेल्या प्रकाराची वरची बाजुदेखील सपाट असावी. त्यावर बोटांचे खळगे असतील तर ते नीट भाजले जात नाही. थालीपिठाचा आकार आपल्याकडे किती मोठा कालथा आहे त्यावर ठरवावा. छोट्या कालथ्याने मोठे थालीपिठ उलटवता येत नाही.
हे थापलेले थालीपिठ अलगद तव्यावर ठेवावे. झाकण ठेवायची गरज नाही, पण आच मंद असावी. आजुबाजुने व वरुन थोडेसे तूप सोडावे. खालुन सोनेरी झाले कि थालीपिठ उलटुन घ्यावे. व दुसर्‍या बाजुने भाजावे. उपवासाला नको असेल तर यात कणीकही घालता येईल, कांदा सुद्धा घालता येईल.



Bee
Wednesday, March 26, 2008 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश, खूप छान!

Sanghamitra
Tuesday, April 01, 2008 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> त्यावर बोटांचे खळगे असतील तर ते नीट भाजले जात नाही.
अगदी अगदी दिनेशदा. हे असे डिटेल्स सहसा कुणी सांगत नाही. हे लक्षात ठेवले की रेसिपी चुकायचा प्रश्न येत नाही.
मला दह्यातला साबुदाणा हवा होता. करून बघितला की सांगेन. एकदा केला होता पण ताक जास्त झाले आणि भाजलेल्या साबुदाण्याचे पीठ ताकात विरघळले त्यामुळे पिठुळ लागत होते. आता तुम्ही दिलेल्या प्रमाणात करून बघेन.


Dineshvs
Tuesday, April 01, 2008 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हो आणखी एक लिहायचे राहिलेच. हाताने थापणे अनेकजणाना जमत नाही. त्यानी दोन जाड प्लॅश्टिकचे कागद, पिठाच्या गोळ्याच्या खाली वर ठेवुन वरुन थोडे थापून हलक्या हाताने लाटणे फ़िरवून हे प्रकार करायचे. दोन्ही कागदाना पुसटसा तेलाचा हात फ़िरवून घ्यायचा.
एखाद्या जाड कागदाची पिशवी, ( म्हणजे मीठाची, दूधाची वगैरे ) यासाठी छान उपयोगी पडते.
लाटून झाले कि वरचा कागद हळून सोडवून घ्यायचा. आणि खालच्या कागदासकट, ते उचलून तव्यावर उलटे करायचे, आणि कागद झरकन सोडवून घ्यायचा. कागद गरम तव्याला टेकवायचा नाही. हे जरा अवघड वाटत असेल तर फ़ॉईल किंवा केळ्याचे पान वगैरे वापरायचे.


Prajaktad
Tuesday, April 01, 2008 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किचन टॉवेल ओला करुन , घट्ट पिळुन त्यावर सुद्धा छान थापता येतात..तव्यावर उलटताना चिकटायची भिती नाही.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators