Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 04, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » दाक्षिणात्य » डोसा » Archive through March 04, 2008 « Previous Next »

Sayonara
Tuesday, December 12, 2006 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार सगळ्यांचे. खरंतर मी पण केलाय डोश्याच्या पिठाचा उत्तप्पा. पण म्हटलं उत्तप्प्याकरता रवा आणि उडीद डाळ भिजत घालायची असेल तर ते प्रमाणही विचारुन घेऊ.

Dineshvs
Saturday, March 03, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्यंतरी कुणीतरी नाचणीच्या पिठाचे काय करता येईल, असे विचारले होते. या पिठाचा दोसा पण खुप छान होतो. दिसायला तो तपकिरी दिसला तरी, चवीला उत्तम लागतो. नाचणीची भाकरी करायला जरा अवघड आहे, शिवाय ती सगळ्यानाच पचते असेहि नाही, त्यामानाने हा दोसा, पचायला हलका व करायलाहि सोपा आहे.
१०० ग्रॅम उडदाची डाळ भिजत घालुन चार तासानी, डाळ भिजवलेलेच पाणी वापरुन वाटुन घ्यावी. पाणी राखुन ठेवावे.
आता हि वाटलेली डाळ घेऊन त्यात, एक वाटी ताक घालावे, रविने घुसळुन त्यात अर्धी वाटी तांदळाचे पिठ घालावे. मग त्यात दोन वाट्या नाचणीचे पिठ घालावे. घुसळुन एकजीव करावे. जरुर वाटली तर डाळ भिजवलेले पाणी घालावे. हे मिश्रण रात्रभर किंवा सात आठ तास आंबवण्यासाठी ठेवावे.
त्यानंतर त्यात थोडा आल्याचा रस व वाटलेली मिरची व मीठ घालावे. थोडी कोथिंबीर व जिरेपुड घालावे.
आणि नेहमीप्रमाणे डोसे करावेत. यावर गाजराचा बारिक किस वा बारिक चिरलेला कांदा व कोबी देखील घालता येईल.
याच पिठाचे ढोकळे देखील छान होतात.


Chakali
Tuesday, August 28, 2007 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moogacha Dosa:
me moogacha dosa karun baghitla. khup chan lagto...nakki karun paha...
http://chakali.blogspot.com/2007/08/moog-dosa_1635.html

Wel123
Tuesday, November 20, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

please,mala koni paper dosa chi exact recipe deal ka....karan maza dosa changala hot nahi

Wel123
Tuesday, November 20, 2007 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

parboiled rice ani idli rice same aahet ka wegle aahe.

Chioo
Wednesday, November 21, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जेव्हा डोशासाठी पीठ आंबवते तेव्हा दुसर्‍या दिवशी त्यात खूप बुडबुडे बनतात. पीठ तसे मस्त दुप्पट झालेले असते पण त्यात डाव घातला की ते बसत बसत पहिल्याइतकेच होते. बुडबुडे खूप असल्यामुळे नीट पसरवता येत नाही तव्यावर. मधेच पातळ आणि मधेच जाड होते. माझे कुठे चुकते? मी पीठ आंबवताना थोडे पोहे टाकते. नक्की काय गडबड आहे?

Dineshvs
Thursday, November 22, 2007 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोसे करायच्या आधी पिठे नीट ढवळुन घ्यायचे.
असे केल्याने मोठे बुडबुडे निघुन जातात. बाकिच्या पिठाचा डोसा पसरवताना, जरा दाब देऊन पसरवायचा. ( न पसरवताही काही डोसे करतात )
एनीवे, पिठ फ़ुगले म्हणजे त्यात हवा आहे आणि तिच्यामूळे डोसा हलका होतो.
पिठ असे फ़ुगण्याचे कारण म्हणजे हवामान गरम आहे किंवा हवेत नैसर्गिकरित्या यीस्टचे जिवाणु आहेत.
जवळपास बेकरी, द्राक्षाची वा सफ़रचंदाची बाग, वगैरे असेल तर असे होते.


Chioo
Thursday, November 22, 2007 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेशदा. इथे हवा खरं तर थंड आहे. आणि जवळपास अशी बाग किंवा बेकरीही नाही. मी जिथे पीठ फुगायला ठेवते ती जागा मात्र खूप गरम आहे. दुसर्‍या दिवशी पीठ हातालाच कोमट लागते. मी मग थोडं कमी वेळ भिजवून बघेन.

Prr
Wednesday, February 20, 2008 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गव्हाच्या पीठाचा डोसा
माझ्या मैत्रिणीने cooking Video केला आहे.
http://youtube.com/watch?v=j0BT5AowK1w&feature=user

Arch
Wednesday, February 20, 2008 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, छान आहे ग recipe अजिबात तयारी लागत नाही. thanks सांग तुझ्या मैत्रिणीला. मुलांना तर pancake पेक्षा जास्त चांगला.

Prr
Wednesday, February 20, 2008 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांगते मी तिला...अग ती एकटीच Video shootin आणि simultaneously cooking पण करते. मी तर विचारच नाही केला की गव्हाचा डोसा करता येईल.

Manuswini
Wednesday, February 20, 2008 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केले आहेत हे डोसे, खुप यम्मी लागतात. मी किंचीत हिरवी मिरची अगदी बारीक चिरून टाकते नी थोडेसे बेसन टाकले तर मस्त खमंग लागतात.

२ वाट्या गव्हाला, पाव वाटी रवाळ तांदूळाचे पिठ नी दोन tbs बेसन, त्यात जीरे, मिरची बाकी सेम वरच्या youtube सारखे.
बेसनाने एक आणखी चविष्ट लागते.
एकदम झकास.


Manjud
Thursday, February 21, 2008 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, आर्च, मनु youtube आमच्या ऑफिसात चालत नाही. त्यामूळे गव्हाच्या डोश्याचे साहित्य आणि कृती इथे टाका प्लिज.

Prr
Thursday, February 21, 2008 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wheat Dosa With Dal Chutney
Is a Indian-style whole Wheat, thin, savory crepe-like Pancake with split chickpea condiment. By Bhagyashri

Makes:15-20
Cooking Time:20-30 min
Skill: Easy

Ingredients for Wheat Dosa:
2 Cups Atta/Wheat Flour
1/2 Cups Rice Flour (for crispiness)
3-4 Tbsp Coconut finely grated (Optional)
it gives some crunch to dosa
About 3 Cups Water
1 Tbsp Oil + oil for making dosas
1/2 Tsp Black Mustard Seeds
1 Tsp Cumin Seeds
Pinch of Hing/Asofedita
Salt to taste

सगळे dry ingredients mix करायचे व Seasoning/ tampering- राई,जिरे,हिंग फोडणी घालायची.
Tip : Blend until fluffy -when you see some bubbles on the surface, the more bubbles the better is the batter.
Manjud ...अग खुप छान करते आहे ती video जमले तर बघ Youtubeवर.

Amruta
Thursday, February 21, 2008 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, अग मस्त दिसतायत ग डोसे. माझ्या मुलीला डब्यात देण्यासाठी perfect दिसतायत.
आणि विडिओ पण खरच छान आहे सांग तुझ्या मैत्रीणीला नक्की.


Runi
Thursday, February 21, 2008 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पर्र मी कालच केले होते हे डोसे तो व्हिडीओ बघुन. छान झाले होते.

Arch
Friday, February 22, 2008 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीपण काल केले हे दोसे. batter ला फ़ोडणी टाकायच्याऐवजी आलंलसूण वाटून लावल आणि २ चमचे दही घातल. छानच आणि पटकन होतात हे दोसे.

thanks ग पूनम परत. तुझ्या मैत्रीणीला जरूर सांग.


Psg
Tuesday, March 04, 2008 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केले होते हे डोसे आज.. एक शंका.. आपले तांदूळाचे डोसे कसे कुरकुरीत होतात तसे झाले का तुमचे? माझे डोसे मस्त पसरत वगैरे होते, पण क्रिस्प नाही झाले, मऊच राहिले..

Amruta
Tuesday, March 04, 2008 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे अर्धे क्रिस्पी आणि अर्धे मौ. अग बारिक आचेवर आरामात केले कि क्रिस्पि होतात आणि नंतर कंटाळा येउन आटपायला पाहिल की मौ (हे म उ लिहिता का येत नाहिये मला??) :-)

Sonalisl
Tuesday, March 04, 2008 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मऊ maU असं लिही. :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators