Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Istoo-idli barobar khynyas best

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » दाक्षिणात्य » Istoo-idli barobar khynyas best « Previous Next »

Meeradha
Thursday, December 20, 2007 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईश्टु
हा पदार्थ ईडली बरोबर किंवा आपम बरोबर खुपच छान लागतो.
साहित्य
१ कप नारळाचे घट्ट दुध
३ कप नारळाचे पातळ दुध
४ उकडलेले बटाटे
२ मोठे कांदे
६-७ हिरव्या मिरच्या
३ ईंच आले
१ मोठि जुडी कढीपत्ता

क्रुती



उकडलेले बटाट्याचे मोठे तुकडे,लांब चिरलेले कांदे लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या,लांब चिरलेले आले,कढीपत्ता,मीठ हे सर्व नारळाच्या पातळ दुधात घालावे आणि उकळत ठेवावे,कांदा शिजल्यावर त्यात १ कप नारळाचे घट्ट दुध घालुन ढवळावे.(परत उकळवु नये)हवे असल्यास थोडे खोबरेल तेल वरुन घालवे.
खुप पटकन होणारा ह पदार्थ तेवढाच चवीष्टहि आहे.
नारळाचे दुधासाठी मी Maggi Coconut Milk Powder वापरते.




Bee
Wednesday, April 30, 2008 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नारळाचे दुध हाच नेमीचा प्रश्न आहे कारण मला नारळ खोवता येत नाही. तशी विळी पण नाहीये जवळ. जर मिक्सर मधे फ़िरवले तर तो जो काळा भाग असतो नारळाचा तोही त्यात एकजीव होतो. विकतचे दुध मी कधीच वापरूण पाहिले नाही.

Shonoo
Wednesday, April 30, 2008 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिंगापूरमधे तुला नक्किच ओलं खोबरं खोवलेलं फ़्रोझन मिळालं पाहिजे. तू जरा चौकशी करून पहा. माझ्या माहिती प्रमाणे थाय वा मलेशियन दुकानात नारळ विकत घेतल्यावर तिथेच तो फोडून, खोवून मिळावा. तुझ्या कलिग्सना विचारून पहा.

Bee
Wednesday, April 30, 2008 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो इथही मिळतं नारळ पण त्याच दुध काढायला मला जमत नाही असे मला म्हणायचे होते. तसे डब्यातील साठवलेले दुध पण मिळते पण चवीला ते इतके काही खास लागत नाहीत. संरक्षक घटक घातल्यामुळे (preservatives) चवीत फ़रक पडतो. दुधाला जो एक नैसर्गिक गोडवा असतो त्याला एक रासायणिक वास येतो.

एकदा मी खोबर्‍याचे छोटे छोटे तुकडे केलेत आणि मग मिक्सर मधून ते काढलेत. तसे करताना पाणी खूप ओतावे लागले. हवे होत तसे घट्ट दुध नाही मिळाले. माझ्याकडे जी विळी आहे तिला नारळ खवण्याची ती जी वरची चकती असते धारदार ती नाही. खरे म्हणजे घरच्याघरी नारळाचे दुध कसे काढतात हे मला माहिती नाही.


Meeradha
Thursday, June 19, 2008 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,तु Maggi चे coconut milk powder वापरुन पहा.त्याने वरील रेसिपी छान होते.तसेच सोलकढी पण छान बनते.मी भारतातुन येतानाच पाच सहा पाकिटे घेवुन येते.

Lajo
Thursday, June 19, 2008 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बी, तुला सिंगापूर मधे कुठल्याही एशिअन शाॅप मधे किंवा सुपरमार्केट मधे कोकोनट मिल्क आणी कोकोनट क्रीमचे टिन्स मिळतील, तेच वापरायचे. घरी करण्याच्या भानगडीत कशाला पडतोस?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators