Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 08, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » दिवाळी फराळ » करंज्या » Archive through November 08, 2007 « Previous Next »

Bee
Wednesday, November 01, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेळगाव भागाला करंजांचा एक वेगळाच प्रकार असतो. त्याला 'चौडे' म्हणतात. ह्यात आधी करंजीची पारी तळून घेतात आणि मग त्यात सारण भरतात. हे सारणही जरा वेगळे असते आणि करंजी चापट असते. पिठी साखरेच्या करंजीप्रमाणे फ़ुगीर नसते.

Dineshvs
Wednesday, November 01, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी त्यात राजगिर्‍यांच्या लाह्याचे पुरण भरतात. ( खरे तर ते पुरणहि नाही कि सारणहि नाही ) तळणीतुन पुरी काढल्याबरोबर त्यावर हे सारण टाकुन चौघडी घालतात. त्याला करंजी का म्हणतोस ?

Bee
Thursday, November 02, 2006 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला काकूंनी सांगितले तेंव्हा कळले ती करंजी नाही त्याला चौडे म्हणतात. आता तुम्ही चौघडी शब्द वापरला म्हणून चौडे का म्हणत असावे हे कळले थोडे. दिसायला हे चौडे करंजी सारखे दिसतात म्हणून मी करंजी म्हंटले.

राजगिर्‍याचे पुरण असते हे नविन माहिती झालं.


Rupali_rahul
Wednesday, July 11, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साठ्याच्या रंगीत करंज्यांची प्रतिकृती इथे बघा...
प्रथम तीन रंगांचे तीन गोळे घ्यावेत, मग एक डार्क कलर बेस ठेवुन त्यावर साठे लावुन घ्यावे.


Rupali_rahul
Wednesday, July 11, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्ये लाईट कलर ठेवावा आणि शेवटी परत एक डार्क कलर आणि फोटोत दाखविल्याप्रमाणे कृती करावी...

Rupali_rahul
Wednesday, July 11, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Rupali_rahul
Wednesday, July 11, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Rupali_rahul
Wednesday, July 11, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Rupali_rahul
Wednesday, July 11, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Rupali_rahul
Wednesday, July 11, 2007 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Prajaktad
Wednesday, July 11, 2007 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली ! सही आहेत फोटो

Manuswini
Wednesday, July 11, 2007 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूपाली सेम सेम अगदी गं माझी आई असेच करते त्या करांज्या.

काय आठवण दीलीस. काय मेहनत आहेत त्यात. झाकायला special गावची सुपं असायची. .. करंजी लाटुन ठेवायला नी तळुन झाली की काढायला.


Sai
Friday, October 26, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=706599#POST706599

मनःस्विनी , oven मधे bake कसे करयचे ग?



Manuswini
Friday, October 26, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिहीते थोड्या आरामात. साठ्याच्या oven baked करंज्या. ह्या वर्षी त्याच करणार आहे मी.

Manuswini
Sunday, October 28, 2007 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई तुझ्यासाठी,
oven baked करंजी,

१ वाटी मैदा,
१ वाटी रवा,
४ tbs दूध थंडगार,
पाव वाटी पाणी थंड(लागेल तसे),
३ मोठे TBS वितळलेले शुद्ध तूप,
किंचीत मिठ,
१ tsp बेकिंग पॉवडर,

सारण्: तु मागील link refer कर, आम्ही घरी पंचसारण करतो.
/hitguj/messages/103383/92017.html?1130721099

साठा : refer back page of my post(sorry,lazy to type here) .
कृती :
मैदा चाळुन घे, रवा बारीकच घे, दोन्ही मिक्स कर नी त्यात बेकिंग पॉवडर टाक, मिठ टाक. वितळलेले तूप टाक, हातानेच मिक्स करून crums बनव.
थंडगार दूध मिक्स कर, हळु हळु पाणी टाकून भिजव.
पाणी अगदी गार पाहीजे. एकदम घट्ट असायला हवे. ओल्या कपड्याने झाकून ठेव.
अर्धा तासाने चांगले मळ किंवा कुटून घे. खुप कुटलेस तर फोड येतात,मला ते आवडत नाहीत करंजी बेक झाल्यावर.

तीन पोळ्या लाट, त्यात वर जसे रूपालीने दाखवले आहेना तसे साठा लावायचा ह्या बेक करंजीत भरपूर लावू नकोस.
वळी करून कापणे वगैरे सेम वरील्प्रमाणे. करंजीला ओवन मध्ये ठेवायच्या आधी ब्रुशने वितळलेले तूप लाव दोन्ही बाजूने. मध्ये एक लवंग टोच तुला आवडत असेल तर.

३०० c degree C ला १५ ते २० मीनीटे बेक कर. अती लाल करो नकोस.
वेगळा प्रकार म्हणून :
ह्याच्यात रवा नी खवा भाजून खवा करंजी बनवू शकतेस किंवा नुसत्या खव्याच्या.
किंवा नुसत्या
Dry fruits च्या less fat करंजी बनव.
goodluck!


Prady
Thursday, November 08, 2007 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी साट्याच्या करंज्या केल्या. पण साटं थोडं पातळ झालं आणी तळताना करंज्या विरघळायला लागल्या. शेवटी सरळ बेक करायला ठेवल्या. ३५०F वर १० मिनिटं बेक केल्या. सुंदर झाल्यात. पदर पण छान सुटून आलेत.

Manuswini
Thursday, November 08, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, प्रॅडी, मी कालच baked करंजी केली साठ्याची.

पूजा झाल्यावर फोटो टाकतेच थांब.
यार तु पण ताक ना फोटो. मजा वाटते बघायला.
असच एक सुचवते,साठा पातळ असेल तर freez मध्ये ठेवून मग त्यात पुन्हा आरारूट टाकून फेसून वापरायचा.


Savani
Thursday, November 08, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा,
सारण ओल्या नारळाचं केलं होतस का ग? बेक करायच्या म्हन्जे जरा झटपट होतील का? मग मी करून बघते.


Prady
Thursday, November 08, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी मी सारणाला एक वाटी डेसिकेटेड कोकोनट, एक वाटी साखर( वर पर्यंत भरून), नानकचा मावा अर्ध्याहून अधीक स्लॅब, सुका मेवा,अर्धी वाटी कणीक असं सारण केलं होतं. खोबरं ३० सेकंद मायक्रोवेव मधून काढलं. मावा किसून घेतला आणी गॅसवर थोडासा मोकळा परतून घेतला.कणकेला चमचाभर साजूक तूप चोळून घेतलं आणी मायक्रोवेव्ह मधे ३० सेकंद भाजून घेतलं. जरासा गुलाबी रंग येउ दिला. करंज्या बेक करताना पण ५ मिनिटांनी उलटल्या होत्या. मनू अगं वळकट्या करून घेतल्या आणी मग आईला फोन वर विचारलं की थोडं पातळ वाटतय एकूणच प्रकरण. आई ओरडलीच " इतकी वर्ष मदत करायचीस. एवढही लक्षात नाही का? आणी वरून लाट्या झाल्यावर विचारतेस." पण झाल्या बाई एकदाच्या नीट करंज्या. बघते फोटो जमला तर टाकेन. मी जरा challenged आहे त्या बाबतीत.

Savani
Thursday, November 08, 2007 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म्म... कोणी ओल्या नारळाच्या करून पाहिल्यात का?
कारण आमच्या ह्या दुष्काळी भागात खवा कुठुन मिळायचा? आणि सुक्या खोबर्‍याच्या आमच्याकडे आवडत नाहीत.
मला वाटतं की ओल्या नारळाचं सारण बाहेर येईल बेक करताना. कोणी केल्या असतील तर सांगा. यावर्षी साग्रसंगीत फ़राळ करायला वेळ नाही म्हणुन झटपट प्रकार असेल तर हवं होतं.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators