Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 12, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » दिवाळी फराळ » अनारसे » Archive through November 12, 2006 « Previous Next »

Manuswini
Thursday, October 12, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे ही अनारसे छानच झाले.
अगदी मेहनत करून केले होते.
तीन दिवस तांदूळ भिजवून गूळ कुटुन

आई चाट पडली म्हणाली खुपच बाई तु खटपटी :-)

पण तेलकट झाले.
हेच आईला सागीतले तर ती म्हणाली की एवीतेवी अनारसे तसे तूप पितातच पण दूधात साधारण मी कुटले म्हणून असे झाले असतील.

अमया,
तु दूधाचा हात लावला का?

म्हणून तेलकट झाले असतील.


Amayach
Thursday, October 12, 2006 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, कच्चे नव्हते आणी दुसर्या दिवशिहि बर्यापैकी ख़ुसख़ुशित होते.
मनु, हो गं मी पण दुधाचा हात लावला होता करतांना. पण आता पुढच्या वेळी केले की पोह्यांवर टाकुन निथळते.
कुठेतरी वाचले म्हणुन पाच दिवस तांदुळ भिजवले होते या वेळी आणि बाकी कृती दिनेशनी वर दिल्याप्रमाणेच होती.


Manishalimaye
Wednesday, October 18, 2006 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज मी अनरसे केले पण हा माझा पहिलाच प्रयत्न असल्याने ते कसे झालेत तेही कळत नाहीये, म्हणजे आत कच्चे आहेत की काय असं वाटतय पण जास्त तळले तर काळे......मल एक शंका आहे..ऽनारसे आतुन थोडे कच्चेच असतात काय? [मी लग्न झाल्यास खाल्लेच नाहीयेत त्यामुळ्वे आईचे कसे होतात तेहि आठवत नाही आता]
आणि हो मी तुपात तळुन ते पेपरावर टाकले त्यामुळे तुपकट नाही झाले पण फार साजुक तुप वाया गेल्याच दु:ख मात्र होतय आणि तळणीच्या बर्‍याच उरलेल्या तुपात खुपशी जळलेली खसखस आहे त्या तुपाचे पुढे काही करता येईल का की टाकुनच द्यायचे....
फार प्रश्न विचारले मी पण खरच मला मदत करा...उत्तरे द्या. धन्यवाद आगावुच देउन ठेवत्ये हं


Manuswini
Wednesday, October 18, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिशा,

कच्चे नाही रहात.

माझी दुसरी batch काल संपवली.
gas हा एकदा का तूप तापले की मंद ठेवायचा असतो.
कुठलेही तूप का तेल एवढ्या जळणानंतर वापरू नये.

वाईट वाटून घेण्यापेक्षा खावून अपाय होवु शकतो.



Nalini
Wednesday, October 18, 2006 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा, अनारसे एकाच बाजुने तळलेस कि दोन्ही बाजुने? ते एकाच बाजुने(खसखसशीची बाजु वर ठेवून) तळल्यास खसखस फारशी जळत नाही.
नाही, अनारसे आतुन कच्चे नसतात कधी.


Manishalimaye
Thursday, October 19, 2006 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु आणि नलिनी धन्स. मी खसखषीची बाजु वर असेल असे तळणीत टाकले आणि वर तुप उडवत तळले,तरीही थोडी खसखस तुपात उतरतेच ना[म्हणजे बहुदा उतरत असवी]आणी कळे काळे झालेत पण आतुन कच्चे आहेत, आत पंढरे आहेत. आता पुन्हा तळताही येणार नाहीत; आता मी काय करु?

Dineshvs
Thursday, October 19, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा, तळताना तुप फारच तापले होते म्हणुन असे झाले.
खसखसीवर दाबुन अनारसा थापायचा असल्याने, खसखस सुटत नाही कधी.
आणि तळलेले तुप अगदीच टाकवत नसेल तर दिवाळीच्या पणत्यांमधुन घालावे.


Shonoo
Thursday, October 19, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत ज्यांनी अनारसे केलेत त्यांना प्रश्न

तांदूळ टिल्डा टाईप बासमतीच वापरला का? त्यात जुना नवा कसा ओळखावा? मी या वर्षी तांदळाची एक बॅग घेऊन ठेवून दिली तशीच तर पुढच्या दिवाळीला तो 'जुना तांदूळ' होईल का? की तांदूळ पण बाल्सामिक व्हिनेगर सारखे किंवा व्हिस्की सारखे एकदा ते पॅक झाले की मग त्यांचं वय वाढत नाही?

तांदूळ मिक्सर मधून दळून घेतले का? आणि पीठ कुटले कसे?

मी बरेच वेळा पार्ल्याच्या विजय स्टोअरमधून अनारशांचं पीठच आणत असे. पण आता करून पहावे असं वाटतय म्हणून या शंका!


Amayach
Thursday, October 19, 2006 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, मी तरी रोजचाच एलिफ़ंट ब्रांड्चा बासमती तांदुळ वापरला आहे. तो जुनाच असावा कारण पुलावासाठी वापरते, छान मोकळा होतो भात!

Seema_
Thursday, October 19, 2006 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनारसे वरुन काळे आणि आतुन कच्चे म्हणजे खुप प्रखर आचेवर तळले असणार . मी कधी केले नाहीत पण आईला करताना बघितलय . ती शिस्तीन , मंद आचेवर तळायची अनारसे.

Manuswini
Thursday, October 19, 2006 - 9:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शूनू,
मी इथे US ला अनारसे केले अगदी scratch पासुन,
चांगले झाले.

मी royal baasmatee तांदूळ तीन्-चार दिवस हो चार दिवस भिजवला. रोज रात्री पाणी बदलायचे.

मग तो पंच्यावर वाळवला अगदी कोरडा नाहे वाळवला(आईची सुचना .....).

मग तो target मधून आणलेल्या tenderizer च्या soft बाजुने एका दह्याच्या plastic साफ़ container मध्ये टाकून दोन तास कुटले कारण मी apartment madhye rahaate tevhaa khaalee jaaD towel घातला.

बघ try करून. पिठी चालली की हालाला थंड लागते. पुर्ण पिठीत हात ठेवलास की थंडगार लागते. ती तशीच लागली पाहीजे.

माझे तांदूळ ३ वात्या होते.

तीन चमचे शुद्ध तूप वितळून गार करून हाताने mix केले.
मग किसलेला गूळ मळला अलगद.
लाडू बांधून ठेवून दीली त्याच दह्याच्या डब्यात.
बरोबर १० दिवसाने लाडूचा रंग जरासा पिवळट होतो लाडू तोडला तर छान चिकटपणा जाणवतो.
मग दूधाने मळून (किंचीत दूध) वापरून भरपूर खसखसीवर थापून emdium आचेवर तलले.

माझे आधी तेल्कट वाटले पण मी दुसर्‍या दिवशी सकाळी दब्यात भरताना ठिक होते. कुरकुरीत लागले. गोड पण मस्त झाले.


mixer मध्ये तांदूळ वाटले की त्याचा ओलेपणा निघून जातू गरम होवून नी आंबवण्याची प्रक्रिया चांगली होत नाही.

एक प्रकरचा ओलेपणा required असतो तो निघून जातो नी तांदूळ कोरडा होतो.

म्हणून आई खलबत्यात कुटायची.


Prady
Friday, October 20, 2006 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु भारीच बाई तू खटपटी. कौतूक वाटतं तुझं. किती काय काय करत असतेस.

Sami
Friday, October 20, 2006 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही तेच म्हणायचं होतं. मनु, नवर्‍याला खुश ठेवशील.

Manuswini
Friday, October 20, 2006 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks गं prady नी sami

खरे सांगु सगळ्या मैत्रिणी हेच अगदी म्हणतात जेव्हा माझ्या घरी येतात तेव्हा
आणी मी मनात म्हणते पण मला खुष ठेवणारा असेल ना तो जो कोणी भेटेल तो??.. .. आजकाल कौतुक कमी पण व्यावहार बघतात लोक हेच दुख.
anyways मी एवढा विचार नाही करत पण वाटते खरे तर असेच आले ते लिहिले...
आईला खुप कौतुक आहे मात्र.
अग मला जेवण करायची खुप आवड आहे. ते पण चमचमीत,निरनिराळे पदार्थ. खाते मात्र कमीच :-(


सगळ्यांना खुप खुप दिवाळीच्या शुभेच्छा!!


Rachana_barve
Friday, October 20, 2006 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनारसे direct तांदुळाच्या पिठाचे नाही का करता येत? तांदुळ भिजवावेच लागतात?

Dineshvs
Saturday, October 21, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहि करता येत. त्याला जाळी पडणार नाही. कडक वडे होतील.

Nalini
Saturday, November 11, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Manuswini
Sunday, November 12, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनि,
हे सर्व from scratch केलेस का ग?
छान दिसताहेत
एखद दुसरा इथे मिळाला असता तर
माझे अनारसे संपले पण
I just love anarasa खायला मला अगदी specific पदार्थ आवडतात त्यातलाच हा एक

घरी आईने अनारसे केलेत तर मीच नाही आणि तीला खुप वाईट वाटते की मी खायला नाही


Surabhi
Sunday, November 12, 2006 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, अनारसे तुझ्या नेहमीच्या करण्याप्रमाणे झक्कासच आहेत!
पण तुझ्या रेसिपी सोबत काय, किती, कसं ते दाखवणार्‍या चित्रफितीची पण आता आम्हाला सवय झालीय ग.... ह्या खेपेला तसे फोटो नाही काढलेस?


Dineshvs
Sunday, November 12, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, छान करतेस आणि छान फोटोहि काढतेस. आता पदार्थाची चव आणि स्वाद आमच्यापर्यंत पोहोचत नाही, तो या माध्यमाचा दोष.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators