Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 17, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » दिवाळी फराळ » चकल्या » Archive through November 17, 2006 « Previous Next »

Mrinmayee
Tuesday, October 17, 2006 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, ज्या ssss ऊ ss तोरे चरणकमलपर वारी...!!!माझ्यातर्फे पण खूप खूप थॅंक्स!!!! आजच तुझ्या पध्द्तीनी चकल्या केल्या. केवळ अप्रतीम!! माझ्या अमेरिकन शेजारणीनं खूप हादडल्या! तिला पुढल्यावेळी साचा आणि रेसीपी देईन म्हणते:-) बाकीचे इन्ग्रेडिएन्ट्स तर ती अमेरिकन दुकानातून आणु शकते! :-)

Manuswini
Tuesday, October 17, 2006 - 11:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणमयी तु नुसते तांदूळ पिठ घालून केलेस की भाजणी पिठ वापरून?

ह्या वेळेला मी भाजणी करून sour cream टाकणार आहे.

बाकी सेम style ना sour cream मध्ये जितके पिठ मावेल तितकेच ना



Mrinmayee
Tuesday, October 17, 2006 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग मनुस्विनी, मी निव्वळ तांदाळच्या पिठाच्या केल्या. त्यात आल्याबरोबर हिरव्या मिरच्या पण वाटून घातल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीव जाईपर्यंत दाब द्यावा लागत नाही साच्याला. पीठ फारसं घट्ट न करता अगदी हलक्या आणि खुसखुशित चकल्या झाल्या. मी १ lb (१६ oz ) चे दोन डबे घेतले. भरपूर चकल्या झाल्या.

Manuswini
Wednesday, October 18, 2006 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चकलीचा साचा इथे bay area कुठे मिलेल माहीती आहे कुणाला?
ह्या वेळेला पुन्हा कोणाकडून मागायला लाज वाटते आहे ;(

last time इथील एका अनोळखीच बाई कडून मागितला
कोणीतरी सांगितले की ती मुंबईतील आहे असेल बघ नंबर घेवून फिरवला तिला आणी निर्लजपणे साचा मागितला कारण आर्च recipe वाचुन कधी करते असे झाले होते. गेल्या महिन्यातच केल्या नी दोन,तीन दिवसात संपवल्या होत्या


Prady
Wednesday, October 18, 2006 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साकेत तेल खूपच कमी आचेवर ठेवलं आहे का. आच मंद असावी पण दोन घाण्यांच्या मधे जरा आच मोठी करून तेल परत तापवून घ्यावं आणी मग चकली टाकल्यावर पुन्हा मंद करावी आच. तेलाचं तपमान कमी असल्यामुळे कदाचीत त्या विरघळत असतील आणी तेल पीत असतील. वर सांगितल्या प्रमाणे जरा आच कमी जास्त करून पहा.

Saket
Wednesday, October 18, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स प्रॅडी. मी वाट बघितली पण कोणाचेच उत्तर नव्हते आले म्हणून मी माझा मेसेज डिलीट करुन टाकला.
मग मी पिठ खुप मळले आणि तेल छान गरम होउ दिले आणि मग झाल्या नीट चकल्या.
तुला भाजणीच्या आयडियासाठीपण थॅंक्स आणि थॅंक्स आर्च इतकी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल.


Prady
Wednesday, October 18, 2006 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाल्याना छान चकल्या.. आता नमुना पाठव बघू.

Saket
Wednesday, October 18, 2006 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग हो न छान झाल्या पण मला शनिवारपर्यंत नुसते बघुनच समाधान मानावे लागणार आहे नैवेद्य दाखवल्याशिवाय खाता नाही येणार नं. :-(

Me_mastani
Thursday, October 19, 2006 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मदत करा.......मी आर्च च्या रेसिपी प्रमाणे सोअर क्रिम च्या चकल्या करण्याचा प्रयत्न केला. केप्र च्या रेडिमेड भाजणीत सोअर क्रिम टाकले. पण चकल्या विरघळत आहेत. क्रुपया आपले बहुमोल सल्ले द्या.

Manuswini
Thursday, October 19, 2006 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केप्र ची भाजणी जुनी असेल

किंचीत गरम पाण्याने मळून जरा घट्ट भिजव
म्हणजे sour cream कमी घालून बघ प्रयत्न करून.
म्हणजे sour cream कमी घाल नी गरम गरम पाण्याच्या हाताने नीट मळ




Me_mastani
Friday, October 20, 2006 - 9:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग मनू जुनीच होती भाजणी. ते सर्वच वाया गेल. आज प्रज्ञाने लिहिल्या प्रमाणे करून पाहिल्या. आता मात्र जमल्या. धन्यवाद प्रज्ञा.

Ketaki_dixit
Sunday, October 22, 2006 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dhanyavad vin.
Mala devonla kharach chan chakalya milalya.

Rupali_county
Monday, October 23, 2006 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च तुझी चकलिची रेसिपि एक्दम विनर आहे बघ, एक्दम नाजुक आणि कुरकुरित झाल्यात चकल्या... पहिल्यान्दाच बनवल्या मी.... फ़र्स्ट क्लास!

Milindaa
Monday, October 23, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=877424#POST877424

भावना, तू लिहीलेल्या या कृतीने भाजणी केली होती... खूपच छान आणि खुसखुशीत झाल्या आहेत चकल्या.. तुझ्या आईला (आणि तुला) धन्यवाद! :-)

Lopamudraa
Wednesday, November 01, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खास archlaa धन्यवाद देण्यासाठी.. लिहितेय..
तुझ्या पद्धतीने sourcream च्या चकल्या केल्यात खुप छान झाल्या... खाल्ल्या सुध्दा खुप..!!!
तु कसा काय हा शोध लावला.. great आहेस


Prajaktad
Wednesday, November 01, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च!तुझ्या सुपरहिट चकल्या करुन पाहिल्या , चांगल्या झाल्या... मी २ चमचे सोअर क्रिम घेवुन करुन पाहिल्यात..मला एक दोन प्रश्न आहेत.. चकली उचलताना अवघड जात होति... मोडायची..म्हणजे अजुन घट्ट हवे का ग पिठ...
दुसरा प्रश्न या आपल्या नेहमिच्या चकली सारख्याच तळायच्या का ?.. का आच एकदम कमि हवि?


Prady
Wednesday, November 01, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता मी सांगू का. चकल्या नेहेमीच्या चकली सारख्याच तळायच्या. मी झिपलॉकच्या छोट्या पिशवीवर चकली पाडली त्यामुळे उचलायला सोपी पडली.

Prajaktad
Wednesday, November 01, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स! प्रज्ञा
(अजुन दोन शब्द काय लिहु बर!!!???)


Bee
Thursday, November 02, 2006 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधी धन्यवाद पुर्ण लिहायचे कष्ट घे प्राजक्ता. हे देखील त्या मी अमक्याचा पंखा आहे सारखे होईल नाहीतर :-)

Prajaktad
Friday, November 17, 2006 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा ! तुझी झिपलॉकची ट्रिक उपयोगी पडली बघ.. तसच आपल्या उत्साही मनुचिही.. मी यावेळेला बेसन राईस फ़्लोअर अस एकत्र भिजवल सोअर क्रिम मधे अगदी मस्त, खुसखुशित झाल्या चकल्या.
आर्च ! तु पेटंट घेवुन टाक या चकलीचे....


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators