Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
रसगुल्ला

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » रसगुल्ला « Previous Next »

Prr
Monday, August 20, 2007 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला रसगुल्ला करायची recipie हवी आहे. घरीच पनीर तयार करून रसगुल्ला करता येतो. कोणाला माहित आहे का?

Dineshvs
Monday, August 20, 2007 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रसगुल्ल्यासाठी पनीर करताना, थेट लिंबु घालुन न करता, आधी केलेल्या पनीरमधुन गळलेले पाणी वापरावे.
एक लिटर दुध असे पाणी घालुन नासवुन घ्यावे. रसगुल्ल्यच्या पनीरमधे गुठळ्या असायला नकोत म्हणुन ते चांगले मळुन घ्यावे. शक्यतो मिक्सरमधुन ब्लेंड करुन घ्यावे. ब्लेंड करताना, त्यात दोन छोटे चमचे अरारुट व चिमुटभर सोडा मिसळुन घ्यावा. त्यात हवा तर रंग घालुन त्याचे गोळे करुन ठेवावेत.
एक वाटी साखरेत पाच ते सहा वाट्या पाणी घालुन ते गरम करावे. तो पाक सतत उकळत ठेवावा, त्यात तयार केलेले गोळे हळु हळु सोडावे. आधी एक सोडुन बघावा, तो विरघळला तर आणखी थोडे अरारुट घालावे. व परत मळावे.
हा पाक उकळत असताना, दोन तीन वेळा अर्धी अर्धी वाटी थंड पाणी घालावे.
पाकातला एखादा रसगुल्ला घेऊन, तो थंड पाण्यात सोडावा, एकदम बुडला तर रसगुल्ले तयार झाले असे समजावे.
मग खाली उतरुन थंड होवु द्यावे. थंड झाले कि रोझ इसेन्स घालावा.


Prr
Monday, August 20, 2007 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks Dineshvs.
हे अरारुट म्हणजे काय?? सोडा नाही घातला तरी चालतो काय???

Dineshvs
Tuesday, August 21, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरारुट हा एक कंद असतो. त्याची पावडर करुन वापरतात. दुकानात सहज उपलब्ध आहे. त्याच्याजागी तांदळाचे पिठ वा मैदा वापरला तरी चालेल. पण काहितरी वापरलेच पाहिजे, नाहीतर गोळे पाकात विरघळतात.
सोड्याने रसगुल्ले जाळीदार होतात. तो नाही घातला तर हलके होत नाहीत. नकोच असेल तर गोळ्यात एखादा खडीसाखरेचा दाणा घालुन गोळे वळावेत. पाकात साखर विरघळुन आत, पोकळ जागा तयार होईल.


Prr
Saturday, August 25, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या अरारुटला english मध्ये काय म्हणतात ?

Dineshvs
Sunday, August 26, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरारुट हाच इंग्लिश शब्द आहे. Arrow root हा मूळ शब्द

Prr
Monday, August 27, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh sorry ...... thanks for ur information.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators