Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी ...

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » चटण्या » दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी « Previous Next »

Shyamli
Thursday, August 16, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी
साहित्य:साधारण वाटीभर दुधीची सालं,
चमचाभर तीळ,
पाव वाटी दाण्याचा कूट,
३ हिरव्या मीर्च्या,
फोडणीचं साहित्य,मीठ
कृती:जराश्या तेलावर दुधीची सालं थोडा रंग बदले पर्यंत परतून घ्यावी.
यातच जरा वेळानी मीर्च्या,आणि तीळ टाकावे
गार झालं की दाण्याचा कूट आणि मीठ घालून वाटून घ्यावं.
वरून कढिपत्ता, हिंगाची फोडणी घालावी.
*************

मस्त होते ही चटणी :-)
अजीबात ओळखता येत नाही कशाची चटणी आहे ते :-)


Alpana
Friday, August 17, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशीच दोडक्यांच्या सालाची पण चटणी करता येते..

Dineshvs
Friday, August 17, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशीच रताळे, बटाटा आणि लाल भोपळ्याच्या सालीचीही होते. लाल भोपळ्याच्या सालीची खुप छान लागते. त्यावेळी चणाडाळ घालतात, आणि ती चटणी भरड वाटतात.

Prajaktad
Thursday, August 23, 2007 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली ! मी केली आजच भोपळ्याच्या सालीची चटणी,मस्त होते.. मी तेलावर भोपळ्याच्या साली,जिरे,हिरव्या मिरचीचे तुकडे अस परततल.जरा कुरकुरित झाल्यावर मुठभर ताजी कोथिंबिर चिरुन घातली आणी जरा जाडसर वाटल..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators