Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कांदा वड्याची भाजी ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » कांदा वड्याची भाजी « Previous Next »

Prajaktad
Wednesday, June 13, 2007 - 8:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांदा वड्याची भाजी साठी लागणारे वडे तमाम मराठी जनतेला माहितच असणार...तरी इथे कुठे दिसले नाही म्हणुन लिहते..
वडे (सांडगे):-उन्हाळी काम , लग्न ठरल्यावर घाणा भरायच्या आधी वडेच घातले जातात..
वड्यासाठी हरभरा डाळ धुवुन रात्रि भिजत घालावी..सकाळी उपसुन कमित कमि पाणी घालुन भरड वाटावी.. आवडिप्रमाणे पुढिल जिन्नस घालावे.तिख़ट ,/ हिरवी मिरची , आल , धना जिरा पुड , कोथिंबिर , मिठ.मिष्रण जरा तिखट्च असु द्यावे.
दोन तिन पाट स्वच्छ पुसुन घ्यावे.मधुन वडे तोडण्यास सुरवात करावी.पिठाचा गोला हातात घेवुन पाची बोट एकत्र आणुन छोटे एकसारखे सांडगे(वडे)घालावे.पाट भरले कि कडक उन्हात खुट्खुटित होईस्तोवर वाळवावे.(मुहुर्तावर करायच्या वड्यासाठी पाटावर मध्यभागी सुपारी ठेवावी.पाच सुवासनींनी त्याची पुजा करुन पाच वडे घालावे मग,पुढिल वडे घालावे..)
बरणीत / डब्यात भरुन ठेवावे.

भाजी साठी वडे घेवुन चमचाभर तेलावर जरा डाग पडेस्तोवर भाजुन घ्यावे...गार झाल्यावर जरा अर्धवट कुटुन घ्यावे.
तेलावर कांदा , लसुन परतवावा.तिखट , काळा मसला घालुन वडे घालुन हलवावे.वडे शिजण्यापुरते पाणी घालावे.आधी भाजुन घेतल्याने पटकन शिजतात व भाजी गिचका होत नाही , फ़ार रस्सा करु नये.
हि भाजी आणी गरम भाकरी ... झटपट आणि चविश्ट मेनु.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators