Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गुळ कसा करतात. ...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » गुळ कसा करतात. « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 06, 200720 02-07-07  3:44 am

Limbutimbu
Wednesday, February 07, 2007 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटील, स्वतन्त्र बारा बलुत्यान्नी परीपुर्ण ग्रामव्यवस्था मोडकळीस आणणार्‍या आणि शेतकर्‍यान्च्या (जे खरे अन्नदाते हेत) डोळ्या पाणी आणुन त्यान्चे धिन्दवडे उडविणार्‍या सिस्टीम्स कोणत्या सहकारी कारखानदारी व पान्ढर्‍या गान्धी टोपी खालच्या फुडारी टाळक्यान्नी रचल्या हे आता खर तर नविन राहिल नाही हे, पण पाचशे हजाराची हिरवी पिवळि पत्तीवर अन खम्ब्या वर जेव्हा मतदान होवुन हे असलेच राज्यकर्ते पुन्हा पुन्हा निवडुन येतात तेव्हा सुधारणेची आशा अन्धुक भासायला लागते......! एनिवे

तुम्हाला शुभेच्छा......!
:-)

Lopamudraa
Wednesday, February 07, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म लिंब्या.. ५वर्ष खुप होतात system change करायला.. जमले नाही तेव्हा गुळ खतात खाता च वेळ मिळाला नाही.(आता सत्ता मिळणे अवघड आहे) बाकी चालु द्या आपल्या कड वेळ नाही या veiw and comment laa..

Patilchintaman
Wednesday, February 07, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा जाऊ दे! गुळावर बोलु ना!

Storvi
Wednesday, February 07, 2007 - 10:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>अरेवा.. लिंबुचे गुर्हाळ का छान... >>काहितरी नविन गवसल्यासारखे का बोलतेस लोपा? :-O
बाकी माहिती लई ब्येस.. :-)

Patilchintaman
Tuesday, April 03, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

L&T नि गुर्हाळाची छानच माहिती दिलीती. गुर्हाळ यंदा नाही पण पुढल्या वर्षी सुरु करायचा ईरादा होता. पण यंदा गुळाचे भाव कीती पडले? काय करता! आता सध्या प्लान बासनात गुन्डाळ्तोय. पुढे पाहू.

Limbutimbu
Friday, March 21, 2008 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटील भाऊ, एक सान्गतो, भावाकडे बघाच हो, पण आधी प्रयोग म्हणुन, जमल तर, थोडासा तरी गुळ करुन बघा! अगदी घागरभर उसाचा रस बाहेरून विकत आणुन घरातल्या घरात मॉडेल तयार करुन औन्दाला सुपारी येवढ्या ढेपा तयार केल्यात तरी चालतील! जोक नाही करीत, पण त्याचा फार मोठा उपयोग होईल! :-)
आईस्क्रीम च्या काड्यान्चे साचे बनवा, खोलगट तवा किन्वा स्वयम्पाकातील काहिल वापरा अन रस आटवा, कराच हे! :-)


Dineshvs
Friday, March 21, 2008 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु खरेच होईल का गूळ, या पद्धतीने ? निदान काकवी तरी होईल का ?
मळी काढण्यासाठी काहि अधिक घालावे लागणार नाही का ?
मी बघितलेल्या गुर्‍हाळात, भेंडीची रोपे वगैरे घातली होती, पण त्यालाहि बरेच दिवस काय, वर्षे झाली.

एकदा करुन बघायला हवे.


Limbutimbu
Saturday, March 22, 2008 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशभाऊ, शम्भरटक्के व्हायला हवा, मात्र साहित्त्याची जुळवणुक परफेक्ट करायला हवी, ऐनवेळेसची धावपळ अजिबात चालणार नाहि, लिम्बीन परवानगी दिली तर पोरान्ना मी पण करुन दाखवाव म्हणतो, फक्त मला बीडाच्या काहिलीची सोय करावी लागेल! :-) कोळशाची शेगडी अन कोळसे आहेत माझ्याकडे! उलथन, सोडा, भेन्डी, चुन्याची निवळी, वेलची, साचे, कापड सगळ सगळ आहे! उसाच गुर्‍हाळ पण कोपर्‍यावरच आहे! येवुन जावुन नवसागर मिळणार नाही आमच्या इथे! :-) रस गाळुन घेतला की मळी काढायचा फारसा प्रश्ण नाही! :-)
अन हे सगळ करायला भरपुर उत्साह अन आरडा ओरडा आदळ आपट करायला पोर अन लिम्बी आहेच दिमतीला, अन जेकाय घडल बिघडल ते हाणायला पोर एका पायावर तयार असतील!
अगदीच बिघडला गुळ, म्हणजे पातळ झाला तर चुरमुरे तयार ठेवतो बाजुला......! कालवुन त्याचे लाडु वळुन गिळायला घालीन, कसा वाटतो बेत?????
तुम्ही पण करा राव असच!
अन त्या गिर्‍याला बोलावुन घ्या गिळायला सोबत! कस?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators