Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
केळाची कोशिंबीर ...

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » कोशिंबिरी » केळाची कोशिंबीर « Previous Next »

Sonu_aboli
Sunday, January 28, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तीन पिकलेली केळी
एक वाटी घट्ट गोड दही
दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे किंवा ठेचलेली मिरची
मुठभर कोथिंबीर
मीठ, साखर चवीनुसार

केळी सोलुन बारीक कापावीत.वरील सर्व साहित्य मिसळून कालवून घ्यावे.
पटकन होते आणि नेहमीच्या कोशिंबीरींपेक्क्षा थोडा change म्हणून छान लागते.
१)आवडत असेल तर अर्धी वाटी खवलेला नारळ घालावा.
२)एक सफ़रचंद बारीक चिरुन कोशिंबीरीत घालून वरून डाळींबाचे दाणे घालून सजवावे.पार्टीसाठी सुंदर डिश होते.
३)जीरे भाजून केलेली पूड किंवा चाट मसाला घालून ही वेगळी चव लागते.


Dineshvs
Sunday, January 28, 2007 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यात काहि जण, फ़ेसलेली मोहरी पण घालतात.

Prajaktad
Sunday, January 28, 2007 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनु ! अशीच पेरुची हि कोशिंबीर करता येते.आमच्याकडे पुर्वी गौरी च्या नवैद्याला ५ कोशिंबिरी , ५ चटण्या असा बेत असायचा.तेव्हा मग केळाची कोशिंबीर असायची फ़क़्त दही साखर आणी केळ.

Sonu_aboli
Sunday, January 28, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, यात खूप विविधता आणता येते.दह्या ऐवजी एका लिंबाचा रस,एक चमचा जीरे भाजून केलेली पुड, सफ़रचंदासोबत पेरूच्या फ़ोडी करून घातल्यास फ़्रुट चाट सारखी लागते

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators