Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 09, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » आहारशास्त्र » ज़नरल मोटर कंपनीचा Diet Program » Archive through October 09, 2006 « Previous Next »

Boss
Thursday, July 13, 2006 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Any dieticians here?
People with Diabetics can not eat rice or banana, so any idea what are the alternatives for these items?

Athak
Thursday, July 13, 2006 - 10:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Diet program ची किमया बघितली , आमच्याआपल्या जयाने हे ७ दिवसांचे व्रत यशस्वीपणे पार पाडले . आम्हा खादडांसाठी भरपुर पदार्थ बनवले अन ती कसा control करु शकते हे सिध्द करुन दाखवले . मी उद्यापासुनच हे व्रत सुरु करायचे म्हणालो पण मला झेपणार नाही असा मैत्रीचा सल्ला देवुन तुर्तास पुढे ढकलले , कठिन दिसतोय प्रोग्राम पण सुट्टीवरुन परत आल्यावर घरच्या डॉक्टरच्या देखरेखेखाली नक्की करुन बघणार तेव्हडेच weighing machine ला बरे वाटेल :-)
Good program


Sunilt
Friday, July 14, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधारण एक महिन्यापूर्वी हा BB सुरू करताना माझे तीन प्रमुख हेतू होते -
१) ह्या Diet program बद्दल आणि एकंदरीतच Diet ह्या प्रकाराबद्दल एक प्रकारचे awareness निर्माण करणे.
२) हा Diet program ज्यांनी पूर्वी केला आहे त्यांचे अनुभव समजून घेणे.
३) स्वतचे अनुभव सांगणे.

आता, महिन्याच्या आत ८२ पोस्ट झाल्यामुळे यापैकी पहिला हेतू पूर्णपणे साध्य झाला आहे असेच दिसते !

दुसरा हेतूदेखिल बर्‍यापैकी साध्य झाला आहे (many thanks to लोपामुद्रा and others !!)

आता तिसरा हेतू -

पहिल्या आठवड्यात माझे वजन ३ किलोंनी कमी झाले. माझ्या अंदाजानुसार, पुन्हा नेहेमीचे जेवण वगैरे चालू केल्यावर अर्धा-पाउण किलो वजन वाढेल असे वाटत होते. परंतु, आता महिन्यानंतरही माझे वजन ३ किलो कमीवर स्थिर आहे.

ह्या diet मध्ये तसे quantity वर निर्बंध नसले तरी रोज थोडाफार व्यायाम अपेक्षित आहे. मी दररोज चालण्याचा व्यायाम करीत होतो ( अजूनही करीत आहे !) Brisk walking करताना तुमचा वेग तासाला किमान ३ मैल तरी असायला हवा. आणि तुम्ही किमान अर्धा तास तरी चालायला हवे. मी हे करीत होतो आणि आहे. घरी परत आल्यावर हवेतर थोडाफार streaching excercise करायला हरकत नाही. ( मला Gym मध्ये जायला वेळ नसतो )

दुसरे म्हणजे त्यांनी जे Wonder soup दिले आहे ते अजिबात घेऊ नये. कारण मग diet चा मूळ हेतूच नष्ट होतो.

चौथ्या दिवशी (दुध-केळीचा), शक्यतो skimmed किंवा no-fat दुध घ्यावे. साखर वगैरे घालून शिकरण बनवू नये !!

भाज्या वाफविताना, नुसत्या एकाच भाजीऐवजी, दोन-तीन भाज्या एकत्र वाफवाव्यात. शक्यतो त्यात एखादी पालेभाजी घालावी. त्याने रंगसंगती आणि चव दोन्ही साधले जाईल

भात बनवताना किंचित पातळ किंवा पेजेसारखा करावा. म्हणजे खायला बरे वाटेल.

शेवटच्या दिवशी fruit juice घेताना त्यात साखर अजिबात घालू नये.

आणि हो त्यांनी जरी शेवटच्या दिवशी champagne घ्यायला सांगितले असले तरी आपण थोडा संयम ठेवावा !!!!!!

आता पुढच्या महिन्यात 2nd iteration करायचा विचार आहे. ( अनायसे श्रावणदेखिल येतोच आहे !!!)

Happy dieting !!!



Lopamudraa
Friday, July 14, 2006 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया काय झाल ग... तुझ्याकडुन ऐकायची उत्सुकता आहे..
आणि पाहुण्यानिच post टाकली म्हणजे पाहुणे किति खुश झाले हे सांगायलाच नको?


Manmouji
Friday, July 14, 2006 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक शंका आहे. please चेश्टा करु नये. ह्या प्रकारात मलावरोधाचा त्रास होत नाही का? आणि होत असल्यास काय उपाय? आणि नसल्यास काय कारण असु शकेल?

Maitreyee
Friday, July 14, 2006 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wonder soup दिले आहे ते अजिबात घेऊ नये>>>>सूप का घेऊ नये?सुनिल चे म्हणणे नीट समजले नाही मला! त्यांच्या प्रोग्रम चा भाग म्हणून च दिलेय ना त्यांनी त्यात?

Nalini
Friday, July 14, 2006 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनमौजी ह्या प्रकारात मलावरोधाचा त्रास बिलकुल होत नाही.
दिवसभर खुप पाणी पितो हे एक कारण.
खाण्यातुन तेल, मिठ, साखर आणि मसाले हे पुर्णपणे वर्ज्य असतात.
जरी आपण पोटभर खात असलो तरी सगळे प्रकार पचायला हलके असतात.
माहितकार ह्यावर अधिक आणि शास्त्रीय माहिती देतीलच.
चू. भू. द्या घ्या.


Jayavi
Friday, July 14, 2006 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, खल्लास!!!!!!! यशस्वीरीत्या diet completed! चक्क साडे तीन किलो कमी झालं वजन. याहू :-)
खूप छान आणि हलकं वाटतंय. शेवटच्या दिवशी मात्र प्रेमळ मित्रांच्या आग्रहाने थोडी खीर खाल्ली.
मला एकदम आवडला हा diet prog . पण ह्या ७ दिवसात थोडा stamina नक्कीच कमी होतो असं वाटलं. घरी असल्यामुळे कदाचित जास्त सोपं झालं असावं. लोपा....... आता पुन्हा करायची तयारी सुद्धा आहे हं. पण लगेच नाही. मला इथे वर दिलेली प्रत्येक आठवड्यात एक दिवस फ़लाहार करायची कल्पना एकदम पटलीये. ३-४ महिन्यातून हे diet आणि आठवड्यातून एकदा फ़लाहार........ sounds simple!
मनमौजी, मलाविरोधाचा अजिबात त्रास होत नाही उलट सगळं सोपं होतं :-) कारण आपण न पचणारं काहीच खात नाही शिवाय भरपूर पाणी पितो.
मैत्रेयी, मी सुद्धा सूप घेतलं नाही. सूप म्हणजे शेवटी processed food झालं ना. मी तर भाज्या सुद्धा न शिजवताच सॅलडच्या स्वरूपात खाल्या. थोडा चाट मसाला मात्र घातला.
प्रसादनी लिहिलेलं एकदम पटलं. प्रत्येक दिवशी काय खायचं हे कळलं की तुम्ही त्यात variations करु शकता तुमच्या आवडीप्रमाणे.
मी साखर, तेल अजिबात घेतलं नाही. चौथ्या दिवशी केळांसोबत skimmed milk घेतलं. पाचव्या दिवशी पनीर आणि सहाव्या दिवशी chiken frankies फ़क्त defrost करुन खाल्लं. टमाटे मात्र चिरुन त्यावर मीठ आणि मीरेपूड घालून खाल्ले. व्यायाम मात्र फ़क्त पहिले २ दिवस करु शकले कारण बाकीच्या दिवशी सकाळी खूपच भूक लागायची. रिकाम्या पोटी व्यायाम अगदीच नाही करता आले. आजपासून मात्र पुन्हा व्यायाम सुरु केलाय.
तर मित्रांनो, सगळं तुमच्या इच्छाशक्तीवर आहे. जे हा diet prog करु इच्छितात त्यांना best luck !:-)


Chinnu
Friday, July 14, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सर्वांचच अभिनंदन!
diet हा मुळात संयम शिकवितो, जो आपल्या फार उपयोगी पडतो. मी पण कधीतरी हा प्रकार नक्किच करेन. सध्या मात्र उपवास नेमाने करते.


Chiku
Saturday, July 15, 2006 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

6 days to go....
माझा आजचा पाहिला दिवस आहे या डाएट चा, तो जवळ जवळ संपलाच आता.


Kalandar77
Monday, July 17, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Finally, GM Diet Day One! :-)

काल रात्री पोळी, भाजी, भात वगैरे सगळे संपवायचे म्हणून दुप्पट जेवण झाले!

Savani
Monday, July 17, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kd, good luck :-) माझा प्रोग्राम काल यशस्वीरीत्या पार पडला. यशस्वीरीत्या एवढ्यासाठी म्हणतीये कारण चक्क ७ पौंड वजन कमी झालं. आणि खूप छान हलकं हलकं वाटतयं. many thanks to sunil, lopa, Jaya

Chiku
Monday, July 17, 2006 - 11:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

3 days to go..
चक्क ४ दिवस पार पडले.


Saket
Friday, September 15, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सोमवारपासुन हे डाएट सुरु केले.आजचा ५ वा दिवस आहे पण वजन फ़क्त २ lb नीच कमी झाले आहे आणि तेही १ल्या दिवशी फक्त टरबूज खाऊन राहिल्यामुळे असावे. आता माझा उत्साह मावळायला लागला आहे. डाएटच्या बरोबरीने मी jogging and exercise पण करते आहे.
हा प्रोग्राम ज्यांनी-ज्यांनी केला त्यांना फ़रक ८ व्या दिवशी जाणवला की मधुन-मधुन पण वजन कमी झाले?


Saket
Friday, September 15, 2006 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून १ शंका, ५व्या दिवशी बीफ-मीट चे substitute म्हणून टोफू किंवा एग-व्हाईट चालेल का? कोणीतरी लवकर सांगा कारण आज माझ्या डाएटचा ५वा दिवस आहे.

Sanash_in_spain
Saturday, September 16, 2006 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साकेत, अगं तुझा मेसेज आत्ताच वाचला, तु काल काय केलेस माहिती नाही...मी पाचव्या दिवशी मोड आलेली मटकी आणि मूग आणि टोमॅटो खाल्ले होते. आणि माझे वजन पहिल्या दिवशी १ किलोनी, दुसर्‍या दिवशी १.५ किलोनी आणि तिसर्‍या २ किलोनी, शेवटी २.५ किलो कमी असं झालं होतं. तुला मेल केली आहे.

Saket
Monday, September 18, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅन्क्स आश्विनी. मी सकाळी थोडेसे पनीर(५०ग्रॅम्स) आणि रात्रि फ़क्त टोमॅटो खाल्ले.
तुझ्या मेलला उत्तर दिले आहे.


Rupali_county
Monday, October 09, 2006 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा आणि इतर

मि सुद्धा हे डायट काल पासून सूरू केल आहे. आज २ रा दिवस. माझ डोक खूप दूखतय हे डायट सूरू झाल्या पासून? का बर?

मला वाटत मी कमी खात असेन!


Manuswini
Monday, October 09, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज इथे आले हे नजरेस पडले.
no offense to anybody out here but please remember before doing this diet to check out if you have any other ailments or trouble. one of my friend had at young age low blood pressure(offcourse she was not aware until she started this diet and fell off.

its not to scary anybody but have check. every body has different needs. and with no excersize this fails.

initial weight is PURE WATER LOSS in the body. so people feel excited. but later if body needs protien , it starts brekaing down muscles. so if you have noticed you would have 'loose poppoing fat or dimpled thighs becoming more prominent 'hanging outside' or layers of stomach loose.
PLEASE NO OFFENSE TO ANYBODY HERE OR TO SCARE ANYBODY. everybody has to follow it properly and work out and start doing muscle tonning or else skin would be flabby if you start breaking down muscles.

THE ABOVE INFO IS NOT BASED ON PEROSNAL EXPERIENCE BUT BY DOCTOR and tried and implemented.

credit to my mom who is practicing nutrition and diet here.

when you eat fiber, some stomach get upset ,so sudden load of fiber can harm people if thye ar enot used to it.
for instance, one of my friend ate brokolli, red beans(rajama), moog together. so people select the fibers veggies properly.

people having low blood pressure can feel more tired. most of the people DO NOT KNOW also till they hit plateu.

if anybody wants more info ,i can provide.

personally, I follow 'nothing in excess, less of carbs, less of sugar, daily workout keeps your weight. dont starve. I have bowl of kheer at times and work out too to burn.

people who are working ,they feel more tired specially 'cravings times' between 3 to 6.
so please check yourself.


रुपलि headache is initial way of adjusting to this diet. you might have acidity or body being dyhydrated. when body looses water , you tend to get headache.
have some warm water.


Manishalimaye
Monday, October 09, 2006 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच दिवसांपुर्वी हे सार वाचल आणि मलाही हे वाचुन diet चा मोह होतोय, दर आठवड्याला ठरवत्येय की पुढचा आठवडा diet साठी राखीव पण हे मी दरच आठवड्याला ठरवते. प्रत्यक्षात मात्र येत नाहीये. diet करणार्‍य सगळ्यांचेच मनापासुन अभिनंदन. जरा please मलाही गाईडन्स द्या.
आणि दर वेळी पुढच्या आठवड्याच्या नावावर या आठवड्यात जरा जास्तच गोड आइस्क्रीम वगैरे होतय मग डिप्रेशन येतय पुन्हा खात्ये असं होतय.
आणखी कोणाला माझ्यासारखा अनुभव आहे का? की हे माझ्याच बाबतीत घडतंय?
}

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators