Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सात घडीच्या रोट्या ...

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » गुजराथी » सात घडीच्या रोट्या « Previous Next »

Dineshvs
Monday, December 11, 2006 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सात घडीच्या रोट्या

दोन वाट्या कणीक, चिमुटभर मीठ आणि तेल घालुन, चपातीला भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट पण पुरीला भिजवतो त्यापेक्षा थोडे सैल मळुन घ्यावे. अर्धी वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी तांदळाचे पिठ एकत्र चाळुन घ्यावे. आणखी अर्धी वाटी तांदळाचे पिठ बाजुला ठेवावे. अर्धी वाटी तुप पातळ करुन घ्यावे.

भिजवलेल्या कणकेच्या सुपारी एवढ्या गोळ्या करुन घ्याव्या. त्याच्या बिस्किटाएवढ्या पुर्‍या लाटुन पसरुन ठेवाव्या.
ताटात एक पुरी घेऊन त्यावर पातळ तुप पसरुन लावावे. गाळणीत तांदळाचे पिठ आणि पिठी साखरेचे मिश्रण घेऊन त्या तुप लावलेल्या पुरीवर ते चाळावे. त्यावर दुसरी पुरी ठेवुन त्याला तुप लावावे व परत मिश्रण चाळावे. अश्या एकावर एक सात पुर्‍या ठेवाव्यात. अगदी वरच्या पुरीवर तुप वैगरे लावु नये.
मग हि चवड जरा झटकुन पोलपाटावर घ्यावी. अगदी नाजुक हाताने, सगळीकडे सारखा दाब देत नेहमीच्या चपाती एवढी लाटावी.
मग मंद आचेवर फडक्याने दाब देत ती भाजावी. गुलाबीसर डाग पडले कि वरती तुप लावावे. जरा थांबावे. ते तुप आत जिरले कि उलटावे. दुसर्‍या बाजुलाहि तुप लावुन जिरु द्यावे.
मग उतरुन ती उभी आपटावी. जाळीवर ठेवुन जरा निवु द्यावी. गुजराथी पद्धतिच्या दूधपाकाबरोबर खावी.

हा प्रकार लाटायला व भाजायला थोडेफार कौशल्य आवश्यक आहे. रोजची कणीक भिजवली कि त्यावर प्रयोग करुन बघावा. साठ्याच्या करंज्याना साठा लावतो, तसा साठा करुनहि हि रोटी करता येते. पण तो प्रकार लाटायला फारच कठीण जातो.



हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators