Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 03, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » दिवाळी फराळ » करंज्या » Archive through October 03, 2006 « Previous Next »

Arch
Monday, September 25, 2006 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pie shell वापरून bake केलेल्या करंज्यांची recipe लिहा बर जरा कोणीतरी. Thanks in advance

Prady
Monday, September 25, 2006 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा pizza cutter ने काप त्या करंज्या

Bee
Tuesday, September 26, 2006 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा किती सुरेख अर्थ सांगितले आहेत तुम्ही..

लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रांमधेही कानवल्यांचा काहीतरी संदर्भ येतो तो पण आता माझ्या लक्षात नाही..


Mrinmayee
Tuesday, September 26, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु, तुझ्या कानोल्यांच्या रेसिपीची वाट बघीतली :-)
खाली दिलेली कृती आईच्या पध्द्तीची आहे. (सी. के. पी. पध्दतीचे खाजाचे कानोले). आईचे हे कानोले अप्रतीम होतात. यात काही वेगळं माहिती असेल तर जरूर सुचवा.
सारणासाठी:
१ खोबरं डोल. काळी पाठ काढून किसलेला. (किंवा बाजारात मिळणारा खोबर्‍याचा चुरा)
अर्धी वाटी कणिक चाळून
१ डाव खसखस
वेलदोडा जायफळ पावडर (जायफळ ऐच्छिक)
कुठलाही सुका मेवा नाही (कानोला तोंडात विरघळायला हवा, त्यात सुका मेवा चावायला लागायला नको :-) )
साखर (प्रमाण कृतीत दिलंय)

पारी:
२ वाट्या बारिक रवा
दुध पाणी एकत्र करून (१:१)
अर्धी वाटी साजुक तुप
१ डाव लोणी
१ डाव कॉर्न फ्लावर

कृती:
सारणाची:
* खोबरं किसून अगदी मंद आचेवर गुलाबी भाजावं. थंड करून हातानी चुरून घ्यावं
* चाळलेली कणिक साजुक तुपावर (मंद आचेवर) भाजावी. फार खरपूस नको.
* खसखस भाजून घ्यावी
* खोबरं, कणिक आणि खसखस एकत्र करून (थंड झाल्यावर) हे मिश्रण जितकं असेल तितकीच पिठीसाखर घालावी.

पारीची: हा सगळ्यात ट्रिकी भाग. पारी छान झाली तरच पापुद्रे सुटून कानोला छान होतो.
* रवा दुध्-पाण्यात घट्ट भिजवून घ्यावा. तासभर ओल्या (पण घट्ट पिळलेल्या) कापडाखाली झाकून ठेवावा.
* या रव्याच्या गोळ्याला थोडं थोडं तुप टाकून व्यवस्थीत कुटून घ्यावं. (साधारण अर्धी वाटी साजुक तुप लागेल)
* कुटलेल्या रव्याच्या दोन पोळ्या लाटाव्या. एकीला बोटांनी खड्डे करून त्यात कॉर्न फ्लावर्-लोण्याचं मिश्रण लावावं (खड्ड्यात जरा भरपूर मिश्रण मावेल). त्यावर दुसरी पोळी ठेवून खड्डे-कॉर्न फ्लावर मिश्रण प्रकार रिपीट करावा.
* या दोन्ही पोळ्यांची लांबट गुंडाळी करून १ इंचाचे तुकडे करावे.
* प्रत्येक तुकड्याची दोन टोकं दोन्ही हातांच्या बोटात धरून उलट दिशेला अलगद फिरवावीत आणि अलगद दाबावी. हे झालं पागोटं.

* १ डाव लोणी आणि कोर्न फ्लावर एकत्र फेसून घ्यावं.

कानोला भरताना:
* पागोट्याची ओवल शेपमधे पोळी लाटावी. (फार दाब न देता, नाहीतर पापुद्रे सुटणार नाहीत). लाटताना कोर्न फ्लावर घ्यावं. लाटताना उरलेली पागोटी ओल्या फडक्याखाली झाकावी म्हणजे कोरखंडणार नाहीत.
* अर्धी पोळी हातानी झाकून उरलेल्यात सारण भरावं.
* किंचित दुधाचा हात लावून कानोला बंद करावा. कडा कातरणीनी कातरून कानोले ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावे.
* ८-१० कानोले झाले की मध्यम आचेवर तुपात गुलाबी रंगावर तळावेत.

*** ही कृती फार खटाटोपाची वाटल्यास कानोल्यांसाठी सोपा उपाय्: चिटणिस, टिपणिस, कर्णिक वगरे आडनावाची मंडळी गाठून आयत्या कानोल्यांची सोय होते का ते बघावं


Lalu
Tuesday, September 26, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आली का रेसिपी. Thanks गं.
मी साठ्यात तांदळाची पिठी वापरते. cornflour नाही. आणि लोण्याऐवजी इथे एकदा margarine वापरलं होतं.


Shonoo
Tuesday, September 26, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत Fantes किंवा Kitchen Kapers सारख्या दुकानात ravioli कापण्याकरता जे gizmo विकतात ते आपल्या करंजीशंकरपाळे कातणी सारखं असतं

Manuswini
Tuesday, September 26, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हीपण तांदळाचे पिठ वापरतो साट्याला.
आणी आई रंगीत करते.

मधली पोळी गुलाबी,बाहेरच्या दोन पांढर्‍या

मी करणार आहे इथे. मट्टण tenderizer वापरून कुटते पिठ मी


Karadkar
Tuesday, September 26, 2006 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arch, this is for you - Karanji using pie crust.
My aunt's recipe -
http://massala.com/diwali-karanji.htm

Arch
Tuesday, September 26, 2006 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks , ग मिनोती. करून बघीन. हल्ली मी तळणं टाळते. त्या pie crust मध्ये बर्‍यापैकी shortening असत म्हणा.

Dineshvs
Wednesday, September 27, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणमयी ने सविस्तर कृति दिली आहेच. त्यात थोड्या सुचना. रवा मैदा व्यवस्थित कुटुन मऊ करुन घ्यावा लागतो. त्यासाठी पाटा वरवंटा मिळाला तर छान.
साटा लावण्यापुर्वी खड्डे केलेल्या पोळीवर आई गरम तुपाचे काहि थेंब टाकते.
वळकटीचे तुकडे करायला खुप धारदार सुरी हवी. ही चकती दोन्ही तळव्यात किंचीत तिरपी दाबावी. ( चिरोट्यासाठी उभी दाबतात ) असे केल्याने पारीला तडे जात नाहीत व पापुद्रे ओव्हरलॅप होतात.
याच प्रकारात ओल्या खोबर्‍याचे सारण भरले तर मस्त कानोले होतात. अर्थात ते टिकत नाहीत.

नाहीच जमले तर सुळे, गुप्ते, प्रधान, मथुरे, भिसे, गडकरी, ठाकरे, चौबळ आदी मंडळीना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला जावे.

बी, चुक सुधारली आहे रे आता.



Bee
Wednesday, September 27, 2006 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तुम्ही बाकी छान मनुस्विनीला लाडीगोळी लावून तिच्याकडून कानवले करुन घेणार आहे असे दिसते.. कृती लिहिली आहे म्रुबाईंनी आणि नाव केले मनुचे.. :-)

Chetu08
Wednesday, September 27, 2006 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manu,
Ya tenderizer baddal jara sangshil ka? ektine kanavle karyche mhanje jiv jato tyat rava kutun kutun hat dukhayla lagto.

Manuswini
Wednesday, September 27, 2006 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.मला वाटले दिनेशदा तुम्ही मी मागल्या वर्षीच्या कृतीबद्दल बोलत आहात

खालील लिंक मध्ये मी साट्Yआच्या करंज्या लिहिल्या होत्या आईची recipe
/hitguj/messages/103383/92017.html?1130721099

anyways, never mind तुम्ही चुक सुधारली दिसतेय.


ह्या करंज्या नाही जमले तर चिपळुणकरांना ही contact करू शकता ए. ख. सल्ला.
बी,
काय रे तु फटकळ आहेस दिवे घे

Manuswini
Wednesday, September 27, 2006 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेटु,
मला माहीती आहे इथे US ला कुटणे प्रकार जडच आहे.
पण मलाच आवड इतकी ना करंज्या खाण्यापेक्षा ह्या करण्यातच ज्यास्त मजा आहे.

तु कुठेही supermarket मध्ये जा,
तुला दोन side ला वेगळे वेगळे Style चे tenderizer मिळतील.
Actually ही idea भावाने दीली, नाही तर मी वेलची कुटण्याचा बारका दंडू घेवून बसायची.

सोपे म्हणजे रवा आधी थोडा भिजतच ठेव आणे मग तो मैद्यात mix कर.
कडकडीत तूपाचे मोहन घाल. आणी घट्ट मळून ठेव.

एक एक गोळी घ्यायची जर तुझे स्वःताचे US मध्ये घर आहे तर प्रश्ण नाही नाहीतर खालचे शेजारी येतील धावत.

मी एक towel घेते जाडसर खाली ठेवते Veggei cutter वर आणी पिठ आपटून घेवून मग सपाट भागाच्या Tenderizer ने कुटते.
मेहनत नक्किच आहे पण हौस फिटते.
आणी केले आहेच तर करु असेही होते.

मुंबईला पाटाच वापारायची आई.
एक मोठो रंगीत program असायचा.

दुपारची जेवंण झाली की करंज्या.
मावशीच्या आणी आमच्या एकत्र.
शर्यत लागयची की माझी करंजीला पदर सुटले का बहिणीच्या?
का फुटली तीची करंजी?

कारण ही गोळी लाटणे पण एक कला आहे.
लाटणे अलगद फिरवायचे. घट्ट पुरण भरून सुद्धा करंजी फुटली नाही पाहिजे. आई थकायची त्या दिवशी. तूप गाळा बदला Gas वर लक्ष ठेवा..

मी जेमतेम १०-१२ करते हौसेने.

बघ मी केवढे पुराण लिहिले तुझ्या एका प्रश्णावर. :-)


Bee
Wednesday, September 27, 2006 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, थांब तुलाही दिवे देऊ म्हणतो मी.. काय बावळत आहेस तू कशालाही फ़टकळ म्हणतेस... विनोदाचा जराही गंध नाही तुला :-)

Manuswini
Wednesday, September 27, 2006 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
अरे बाबा i was kidding



Shonoo
Wednesday, September 27, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Meat Tenderizer म्हणून एक पावडर पण मिळत अमेरिकेत ती नव्हे. चौकोनी हातोडी टाइप एक gizmo असतं. त्याच्याने चिकन किंवा बीफ़ चे बोनलेस पीसेस ठोकून थोकून पातळ करता येतात. व्हील साल्टिम्बोका वगैरे प्रकारांमधे जेंव्हा मीट पातळ करून गुंडाळी करायची असते त्याला वापरतात.

मला इथे चित्र अपलोड करता येत नाहीये पण amazon वर
बघितलं तर सापडेल याला दोन बाजू आहेत असल्या tenderizer च्या सपाट बाजूने कुटणे सोपे जात असावे.

OXO Good Grips 26191 Meat Tenderizer

Pampered Chef च्या साइटवर जो आहे त्याला फक्त एकच काटेरी बाजू दिसते. तसला असेल तर करंजीचे पीठ कुटायला चालणार नाही.




Manuswini
Thursday, September 28, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

meat tenderizer म्हणजे साधा एक दंडूका असतो, एका बाजुला सपाट नी दुसर्‍या बाजुला टोकेरी...

हे वरील पुराणात लिहयचे राहेलेच शेवटी.
त्यानेच कुटते मी पिठ.

कुठेही supermarket मध्ये मिळेल.


Chetu08
Tuesday, October 03, 2006 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manu,
thanx ga baghte shodhun.

Dineshvs
Tuesday, October 03, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीट टेंडरायझर म्हणुन एक क्षार देखील असतो. मुरवण्यात तो घातला तर मटण मऊ होते आणि लवकर शिजते. कच्च्या पपईने पण असेच होते.
त्यामुळे नावाने गोंधळ व्हायची शक्यता आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators