Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
शेवयांचे लाडू

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » लाडू » शेवयांचे लाडू « Previous Next »

Moodi
Wednesday, August 02, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवई लाडु

साहित्य : शेवयांचे एक पाकिट साधारण २०० gram चे, १ वाटी साखर, अर्धी वाटी भरुन नारळाचा चव, अर्धा कप सायीसकट किंवा पूर्ण fat चे दुध, बेदाणे, वेलदोडा पावडर.

कृती : नारळ थोडा परतुन घ्यावा, त्यातच शेवटी शेवया बारीक चुरुन घालुन त्याही परताव्या. दरम्यान साखरेत दुध घालुन पाक करावा.. एकतारी झाला की बंद करावा. त्यात हे नारळ शेवईचे मिश्रण व वेलदोडा पावडर घालुन अर्धा तास मुरु द्यावे. नंतर बेदाणे लावुन लाडु वळावे.


Sanash_in_spain
Wednesday, August 02, 2006 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तू दिलेल्या शेवयाच्या लाडू बद्दल एक सांग त्यातल्या शेवया शेवट पर्यंत कुरकुरीत राहतात का? कि मऊ पडतात? मी अशी कुरकुरीत शेवयांची बर्फी खाल्ली आहे पण मला माहित नाही कशी करायची ते आणि त्यात कंडेन्स्ड मिल्क वापरलं होतं वाटते.

Moodi
Wednesday, August 02, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दमट हवा नसेल तर काही दिवस रहातात तशा कुरकुरीत नाहीतर मग मऊ पडतात, पण चव चांगली असते, मात्र नारळाच्या चवातील ओलसरपणाने कधी कधी मऊ पडु शकतात. पण एअरटाईट डब्यात ठेऊन बघ.

Sanash_in_spain
Wednesday, August 30, 2006 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी तुझे शेवयांचे लाडू करुन बघितले गं. छान कुरकुरीतच राहिले होते. पण मी मात्र दूध-साखरे ऐवजी कंडेन्सड मिल्क वापरुन केले.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators