Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 25, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » दिवाळी फराळ » करंज्या » Archive through September 25, 2006 « Previous Next »

Soanpari
Monday, August 28, 2006 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ब्रिटन मद्दे राहते ईथे मला खवा मिळत नाहि करन्जी करायला, सी के पी पद्धति चि करन्जी करायल खवा लागतोच ना. कोणी सान्गु शकेल का मला दिवाळी साठी आणख़ी कुठचि रेसीपी खवा नसेल तर काय वापरावे? साजुक तुप ही गाई च (पीवळ )मीळत त्यामुले रव्याचे लादू ही पिवळे होतात. ह्या गोड पधार्थान साठि मी कुठचे तुप वापरु? मला माहित आहे मी खुपच लवकर विचरत आहे, आजुन गणपति विसर्जन होउन नवरात्र ही व्हायचि आहे, पण तरिहि कोणी सान्गु शकेल का?कणिक मिक्षर मधे बारिक केली तर चाल्ते का? कि आपटुनच पापुत्र्या येण्यासारख पीठ भिजवाव लागत.

Mrinmayee
Monday, August 28, 2006 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोअनपरी, CKP पध्दतीच्या कानोल्यांना (म्हणजे करंजीला) खवा लागत नाही. आईला विचारून १-२ दिवसात रेसिपी टाकते. इतर कोणाला माहीती असल्यास कानोल्याची पध्दत सांगतीलच.

Soanpari
Monday, August 28, 2006 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ok malaa vaatala khajyache kanavle hee ckp speciality aahe aani tya karta khava must aahe ki kaay. me aaila naahi vicharlay kaaran diwalit karun tila surprise dyaycha vichar aahe. me tila madat keliye pun kadhi ektine kele naahiyet, yanda karaaycha vichar aahe. aai-baba india madhe aahet aani maajhe lagna aahe january madhe so karun pahaayche aahe swatahun,practice karaaychi aahe. Thanks,Mrinmayee.

Lalu
Monday, August 28, 2006 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनपरी, नाही लागत खवा. इथे archives मधे बघा, यावर discussion झालं होतं, पण व्यवस्थित रेसिपी आहे का ते बघा.

Milindaa
Tuesday, August 29, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खवा भारतीय दुकानात मिळेल, पाहा.
कधी Wembley ला आलात तर VB मध्ये नक्की मिळतो. तुम्हाला तसं जवळ आहे.


Soanpari
Wednesday, August 30, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank you everyone. mee archives madhe baghen. Milindaa thanks for the wembley option, pun mee southampton la shift honaar ahe, i will try to search there. otherwise i will prepare without khavaa as everyone says.

Bee
Thursday, September 21, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला कानूल्याची कृती माहिती आहे का? आणि करंज्या आणि कानूल्यात जो सूक्ष्म फ़रक आहे तो सांगता येईल का? आधुनिक कानूले नकोत.

Prady
Thursday, September 21, 2006 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी त्याला कानवला म्हणतात. कदाचीत विदर्भात कानुला म्हणत असतील. कानवल्याच्या कडा ह्या हाताने वळवलेल्या असतात. करंजी च्या कडा आपण कातण्याने कापतो. कानवले करणं ही एक कला आहे. आणी ckp बायका expert असतात हे करण्यात.

थोडसं विषयांतर पण सहज आठवलं म्हणून जसं करंजा करताना जोडीला एखादा मोदक तळला जातो त्याप्रमाणेच मोदक केले की जोडीला एखादा कानवला पण केला जातो. त्याच्या मागचं नक्की कारण माहीत नाही मला.लक्ष्मीबाई टिळकांची या वर कवीता पण आहे." करंजीतला मोदक" असं काहिसं नाव आहे. आजी म्हणते शास्त्र आहे करंजीचा भाऊ मोदक म्हणून तो तळायचा. बहुदा उरलेली कणीक आणी सारण संपवायला म्हणून पण करत असतील.


Bee
Thursday, September 21, 2006 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कानूल्याचे सारण पण वेगळे असते ना? पिठीसाखरेचे कानूले मी कधीच बघितले नाही, मैद्याचे पण नाही.

आमच्या घरी संकष्टीला २१ मोदक आणि ५ कानुले तळले जातात. मलाही कारण माहिती नाही.


Lalu
Thursday, September 21, 2006 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती मृण्मयी रेसिपी टाकणार होती कानवल्याची, तिने नाहीच का टाकली अजून? मी जमल्यास टाकते एक दोन दिवसांत.
बी, तू करणार आहेस काय कानवले? ~d


Prajaktad
Thursday, September 21, 2006 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे दिवाळिच्या फ़राळाची सुरवातच करंज्या पासुन होते.पहिला करतात तो ' मोदक ' च. पहिला मोदक आणी करंजिचा नवेद्य(हा शब्द चुकिचा लिहला आहे) देवाला दाखवुन मग पुढचे घाणे निघतात.
'मोदक' बाप्पाचा आवडता म्हनुन श्रीगणेशा त्यानेच करायचा.

कानवल्याचा नवेद्य ,'परत फ़िरुन येण्याचे आवाहन ' करण्यासाठी असतो. चतुर्थिला येणारा गणेश दर चतुर्थिला यावा. याच कारणासाठी गौरी ला विसर्जनाच्या दिवशी कानवल्याचा नवेद्य असतो.
ckp कानवल्याची अगदी authentic क्रुति मला माहिती नाही. माझी एक घाट्टमुट्ट मैत्रिण ckp असल्याने थोडिफ़ार माहिति आहे. हा जरा निगुतिने करायचा प्रकार आहे.
लालु आणी म्रु तुम्हि टाका रेसिपी.


Bee
Friday, September 22, 2006 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो ताई आमच्याकडेही असतात कानवले.. आम्ही पण महाराष्ट्रीयन आहोत की.. :-)

लालु, मी नाही करणार कानवले पण त्या ताई आहेत ना बाजूला घराजवळ त्यांना जरा कृती हवी होती. मी जर त्यांना कृती दिली तर मला पाच सहा कानूले फ़ुकट मिळतील तेन्ह्वा इथे येऊन तेवढे परिश्रम मी करू शकतो :-)


Seema_
Friday, September 22, 2006 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी करणार आहे करंज्याचा प्रयोग यावेळी.
माझा एक अगदीच basic प्रश्न आहे . हसु नका.
माझ्याकडे तो करंज्या कापायचा चमचा नाही . तुम्ही कशा कापता करंज्या ?


Nalini
Friday, September 22, 2006 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्त्ता, नैवद्य naivadya असे लिहतात.

Dineshvs
Friday, September 22, 2006 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, कातण नसल्यास साध्या सुरीने कापायच्या. जमल्यास मुरड घालायची. किंवा जेवणाच्या काट्याने कडा दाबत नक्षी काढायची.

Dineshvs
Friday, September 22, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे करंज्या कानवल्यांची सविस्तर चर्चा झाली होती. लालुनेहि लिहिले होते. करंजी आणि मोदक हे बहिणभाऊ मानतात, त्यामुळे एकमेकांची सोबत लागते त्याना. करंजीला मुरड घालायची कारण परत करंज्या करायचा योग लवकर येतो, असे आई म्हणते.
हम आपके है कौन मधे रेणुका शहाणेच्या एंट्रीलाच ती करंजीला मुरड घालताना दाखवलीय.
सलत सुर सनईचा, या कादंबरीत एक मजेदार उल्लेख आहे. कायस्थ लोकात, मुलगी बघायला गेल्यावर कानवले समोर ठेवले जातात. त्यावर मुलाची आई रुपया टाकते, तो रुपया जर कानवल्याच्या पापुद्र्यात अडकला, तर तिथल्या तिथे कुंकु लावुन मुलगी आपली म्हणायची.
हे दोन्ही संदर्भ मी आधी लिहिले होते.


Karadkar
Friday, September 22, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, हवा असेल तो चमचा तर सांग. देशातुन घेउन येइन.

Savani
Friday, September 22, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. की मुरड घातली की लवकर करायचा योग येतो. माझी आजी पण हेच सांगायची. म्हणुनच गौरी माहेराहुन निघतात तेव्हा त्याना त्याचा नैवेद्य असतो कारण त्या लवकर याव्या.
अर्थात हे झालं माझ्या आजीचं सांगणं. काही वेगळा अर्थही असेल त्याला.
आम्ही पण मोदक पहिला करतो आणि मग करंज्यांना सुरवात करतो.


Shmt
Friday, September 22, 2006 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, इथे जे plastic/steel च्या knife आपण खाताना वापरतो, ते पण वापरु शकतेस.

Seema_
Monday, September 25, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shmt दिनेश thanks. नक्की करुन पहाते तुम्ही सांगितल्याप्रमणे.
मिनोती messege टाकला आहे ग .


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators