Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
षटरसात्मक चटणी ...

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » चटण्या » षटरसात्मक चटणी « Previous Next »

Surabhi
Tuesday, September 12, 2006 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"षटरसात्मक चटणी"
रोज इथे नव्या नव्या चटणींच्या varities वाचून एका आयुर्वेदिक मासिकात आलेली गुढी पाडव्याच्या दिवशी, चैत्रात बनवायची ही चटणी आठवली. गुढी पाडव्याला वेळ आहे तरी ती आताच लिहितेय. चटणी खरच छान लागते.
किंचीत कोवळी मध्यम आकारची एक कैरी,
कडुनींबाची (गुढी पाडव्याला वापरला जातो तो) पंधरा पाने,
अर्धा नारळ,
पाव वाटी शेंगदाण्याचे कूट,
सुपारी एवढा गूळ
एक चमचा तिखट,
अर्धा चमचा मीठ.
फोडणीसाठी एक चमचा तेल, १ / २ चमचा मोहरी, १ / २ च. जिरे, एक चिमूट हिंग, पाव चमचा हळद.
कैरी साल काढून किसावी. इतर साहित्या बरोबर वाटावी. वरून फोडणी दिल्याने ह्या चटणीची लज्जत वाढते.
कोवळ्या कैरीत आंबट बरोबर तुरट रस ही असतो. कडुनिंबाचा कडू रस, गुळाचा मधुर रस, तिखटाचा तिखट रस, मीठाचा खारट रस अशा सहा रसांनी ही चटणी आरोग्यकारक आहे.


Prady
Tuesday, September 12, 2006 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच वाटतेय गं ही चटणी. आणी कोवळी कैरी... पाणीच सुटलं तोंडाला.

Sadhi_manas
Tuesday, September 12, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लागते पण कडू लागते बरका ही चटणी... आठवत आहे ना सगळ्यांना?....

Dineshvs
Tuesday, September 12, 2006 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या घरी गुढीपाडव्याला हि चटणी पानात हवीच. ती खाऊनच जेवणाची सुरवात करायची असते.
ख्रिशचनामधे पण नववर्षाची सुरवात कारल्याचा रस पिवुन करतात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators